दुधासोबत अँटीबायोटीक्स घेणे योग्य कि अयोग्य? बघा तज्ज्ञ काय सांगतात

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2021 09:39 PM2021-06-11T21:39:03+5:302021-06-11T21:40:56+5:30

अनेकांना असा प्रश्न पडतो की दुधासोबत अँटीबायोटिक्स घ्याव्यात की घेऊ नये. दुधात प्रोटीन, कॅल्शियम, मॅग्नीशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, सोडियम, जिंक, कॉपर, शुगर, कॉलीन, व्हिटॅमिन ए, के, बी ६, बी २ इत्यादी गुणधर्म भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे बऱ्याच जणांना असे वाटते की दुधासोबत औषधे घेणे चांगले.

Is it right or wrong to take antibiotics with milk? See what the experts say | दुधासोबत अँटीबायोटीक्स घेणे योग्य कि अयोग्य? बघा तज्ज्ञ काय सांगतात

दुधासोबत अँटीबायोटीक्स घेणे योग्य कि अयोग्य? बघा तज्ज्ञ काय सांगतात

Next

आपण अनेक आजारांसाठी अँटीबायोटीक औषधे घेतो. कधी डोकेदुखी, कधी कोणत्या जंतुसंसर्गावर उपाय म्हणून. पण अनेकांना असा प्रश्न पडतो की दुधासोबत अँटीबायोटिक्स घ्याव्यात की घेऊ नये. दुधात प्रोटीन, कॅल्शियम, मॅग्नीशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, सोडियम, जिंक, कॉपर, शुगर, कॉलीन, व्हिटॅमिन ए, के, बी ६, बी २ इत्यादी गुणधर्म भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे बऱ्याच जणांना असे वाटते की दुधासोबत औषधे घेणे चांगले. याच प्रश्नाचे उत्तर आम्ही तुम्हाला देणार आहोत. डॉ. नवीन प्रकाश शर्मा यांनी ऑन्लीमाय हेल्थ या वेबसाईटला ही माहिती दिली आहे. त्या आधी आपण अँटीबायोटीक्स औषधांचे तोटे जाणून घेऊ.

अनेकदा अँटीबायोटीक्स औषधांचे विपरीत परिणामही होतात. अ‍ॅलर्जी, उलट्या, पित्त, त्वचारोग आदी विकारही निर्माण होऊ शकतात. डॉक्टर शक्यतो त्वचारोग, जुलाब, मुत्राचे विकार, डोळ्यांचे विकार आदी आजारांसाठी अँटीबायोटीक औषधे देतात.
डॉ. नवीन शर्मा यांच्या मते अँटीबायोटीक औषधांचे सेवन पाण्याबरोबच करणे योग्य आहे. याचा अर्थ असा नाही की सर्वच अँटीबायोटीक पाण्याबरोबरच सेवन कराव्यात. काही अँटीबायोटीक्स अशा आहेत ज्याचे दुधाबरोबर सेवनही केले जाऊ शकते. अँटीबायोटीक्स पाण्यासोबत सेवन अशासाठी केले जाते कारण पाणी हे दुधाच्या तुलनेत पचायला हलके आहे. तरीही अशीही काही अँटीबायोटीक्स औषधे आहेत ती दुधाबरोबर सेवन केली जाऊ शकतात. 

Web Title: Is it right or wrong to take antibiotics with milk? See what the experts say

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.