International Yoga Day 2019: पहिल्यांदाच योगाभ्यास करत असाल तर, 'ही' 5 सोपी योगासनं करा ट्राय!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2019 12:56 PM2019-06-20T12:56:35+5:302019-06-20T12:57:18+5:30

आंतराष्ट्रीय योग दिवस 2019 यावर्षी 21 जून रोजी साजरा करण्यात येतो. संपूर्ण देशातील लोक फिट राहण्यासाठी योगाभ्यास करताना दिसत आहेत. तसेच दररोज योगा केल्यामुळे अनेक आजार दूर राहण्यास तसेच शरीराच्या अनेक समस्याही दूर होण्यास मदत होते.

International yoga day 2019 five basic easy yoga asanas that can help you get started | International Yoga Day 2019: पहिल्यांदाच योगाभ्यास करत असाल तर, 'ही' 5 सोपी योगासनं करा ट्राय!

International Yoga Day 2019: पहिल्यांदाच योगाभ्यास करत असाल तर, 'ही' 5 सोपी योगासनं करा ट्राय!

आंतराष्ट्रीय योग दिवस 2019 यावर्षी 21 जून रोजी साजरा करण्यात येतो. संपूर्ण देशातील लोक फिट राहण्यासाठी योगाभ्यास करताना दिसत आहेत. तसेच दररोज योगा केल्यामुळे अनेक आजार दूर राहण्यास तसेच शरीराच्या अनेक समस्याही दूर होण्यास मदत होते. तसेच योगाभ्यासावर करण्यात आलेल्या अनेक संशोधनातूनही योगाचे महत्त्व सिद्ध झाले आहे. ज्या व्यक्ती योगाभ्यासाची सुरुवात करण्याचा विचार करत असतील, त्याच्यासमोर एकच प्रश्न असतो की, योगाभ्यासाची सुरुवात कशी करावी? तसेत योगाभ्यासाची सुरुवात करण्याआधी कोणत्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं असतं? 

जर तुम्हीही आंतराष्ट्रीय योग दिवसाच्या निमित्ताने योग्याभ्यासाची सुरुवात करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी काही खास योगासनं सांगणार आहोत. 
महिलांना योगाची  सुरुवात करताना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. जर तुम्हालाही योगासनं करताना समस्यांचा सामना करावा लागत असेल तर या 5 योगासनांच्या माध्यमातून अगदी सोप्या पद्धतीने योगा करू शकता. 

(Image Credit : www.ayurvedicupchar.co.in)

बालासनापासून करा योगाची सुरुवात...

बालासन योगाभ्यासाची सुरुवात करण्यासाठी सर्वात उत्तम आहे योगासन आहे. जर तुम्ही योगाभ्यासाला सुरुवात करत असालत तर हे योगासन ट्राय करू शकता. बालासन योगासन ताण आणि डिप्रेशन कमी करतं. जाणून घेऊया बालासन करण्याची पद्धत...

  • जेव्हा तुम्ही बालासन योगासन करणार असाल तेव्हा सर्वता आधी योगा मॅट किंवा चटई जमिनिवर अंथरून त्यावर बसा. 
  • दोन्ही पाय दुमडून टाचांवर बसा.
  • टाचांवर तुमच्या संपूर्ण शरीराचं वजन पडलं पाहिजे. 
  • टाचांवर बसल्यावर आपले हात जमिनीवर ठेवा. 
  • आता पुढच्या बाजूला थोडेसे झुकून जमिनीवर तुमचं कपाळ टेकवा. 
  • जेव्हा तुम्ही खालच्या बाजूला कपाळ टेकवाल तेव्हा काही वेळासाठी तसेच थांबा. 
  • काही वेळानंतर हळू-हळू उठा. असं तुम्ही योगाभ्यास करताना 3 ते 5 वेळा करू शकता. 

(Image Credit : kayayoga.co)

वृक्षासन योगासन महिलांसाठी खास 

वृक्षासन योग महिलांसाठी अत्यंत खास असतं. यामुळे महिलांना आपल्या शरीराचं संतुलन राखण्यासाठी मदत मिळते. महिलांसाठी हे योगासन दररोज करणं आवश्यक असतं. वृक्षासन योगासन अत्यंत सोपं आहे. जाणून घेऊया वृक्षासन करण्याची पद्धत... 

  • सर्वात आधी सरळ उभे रहा. दोन्ही पायांच्या मध्ये कमीत कमी एक फूटाचं अतंर असणं आवश्यक आहे. 
  • उजवा पाय दुमडून तो डाव्या पायाच्या गुडघ्यावर ठेवा. 
  • डावा पाय सरळ ठेवून संतुलन राखा. 
  • तुम्ही व्यवस्थित बॅलेन्स केल्यानंतर दीर्घ श्वास घ्या आणि हात डोक्यावर घेऊन जा आणि दोन्ही हातांनी नमस्कारची मुद्रा करा. 
  • मणक्याचं हाड सरळ आहे याची खात्री करा आणि दीर्घ श्वास घ्या. 
  • हळूहळू श्वास सोडताना हात खाली घ्या आणि हळूहळी उजवा पायही सरळ करून रिलॅक्स व्हा. 
  • आता सारखीच कृती डावा पाय दुमडून करा. 

ताडासन

ज्या व्यक्ती योगाभ्यासाची सुरुवात करणार आहेत, त्यांच्यासाठी ताडासन सर्वात उत्तम मानलं जातं. महिलांसाठी हे योगासन अत्यंत फायदेशीर ठरतं. महिलांना हे योगासन करण्यासाठीही सोपं असतं आणि याचे अनेक फायदे असतात. जाणून घेऊया ताडासन करण्याती पद्धत... 

  • ताडासन करण्यासाठी सर्वात पहिल्यांदा तुम्ही उभं राहा. 
  • पाय आणि थाइज वेगवेगळ्या ठेवा. श्वास घेत टाचा वर करा आणि आपले थाइज जेवडं वरच्या दिशेने स्ट्रेच करता येतील तेवढं करा. 
  • श्वास घेत असतानाच आपलं पोट आणि चेस्टही स्ट्रेच करा. 
  • श्वास सोडताना आपले खांदे डोक्यापासून दूर घेऊन जा. 
  • मानेची हाडांचं क्षेत्र पसरवा आणि आपली मान लांब करा. 
  • सुरुवातीमध्ये संतुलन करण्यासाठी तुम्ही हे आसन भिंतीचा आधार घेऊन करू शकता. 
  • यामुळे आपलं शारीरिक संतुलन राखण्यास मदत होते. 

(Image Credit : drweil.com)

नौकासन

  • आपल्या योगा मॅटवर पाठीच्या आधारवर झोपून जा आणि आपल्या हातांना आपल्या शरीराला चिकटवून ताठ ठेवा. दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडताना हातांना पायांच्या दिशेने स्ट्रेच करा आणि आपले पाय. चेस्ट वरच्या बाजूला उचलून धरा. 
  • तुमचे हात आणि पाय वरच्या बाजूला असणं आवश्यक असतं. तसेच तुमचे डोळे हातांच्या बोटांवर असणं गरजेचं आहे. 
  • दीर्घ श्वास घेताना आसनाच्या मुद्रेत कायम राहा. श्वास सोडताना हळूहळू जमिनीवर परत या आणि आराम करा. 
  • नौकासन कंबर आणि पोटाच्या मांसपेशी सुदृढ राखण्यासाठी मदत करतात आणि आपली पाठ-मान मजबूत राखण्यासाठी मदत होते. 

(Image Credit : Shutterstock)

भुजंगासन महिलांसाठी का आहे खास?

भुजंगासन केल्यामुळे पाठिच्या खालच्या भागातील मसल्स, मणक्याचं हाड आणि हात मजबूत होण्यास मदत होते. हे आसन दररोज केल्यामुळे उत्तम प्रकारे श्वास घेऊ शकता. 

  • सर्वात आधी दोन्ही पाय एकत्र ठेवून पोटावर झोपा. 
  • आपले हात मॅटवर खांद्यांच्या खालच्या बाजूला ठेवा. 
  • श्वास घेताना हळूहळू आपलं डोकं वरच्या बाजूवा उचलून धरा आणि हळूहळू खाली झुकवून ठेवा. 
  • श्वास घेताना शरीराचा पुढिल भाग कंबरेपर्यंत वरच्या बाजूला उचलून धरा. 
  • तुम्हाला या आसनामध्ये आपल्या हातांना आधार देणं गरजेचं आहे. 
  • हाताचे कोपरे सरळ ठेवा आणि आपल्या हातांवर दबाव द्या. 
  • कंबरेवर जास्त जोर देऊ नका. 
  • काही सेकंदांसाठी याच अवस्थेमध्ये राहा. 
  • दीर्घ श्वास सोडताना सामान्य अवस्थेमध्ये या. 

 

वरील 5 योगासनं तुम्ही योगाभ्यासाची सुरुवात करताना करू शकता. ही सर्व योगासनं फक्त महिलांसाठी नाही, तर योगाभ्यास सुरु करणारा प्रत्येक व्यक्ती हे करू शकतो. तसेच ही आसनं तुम्ही कुठेही करू शकता. 

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं. 

Web Title: International yoga day 2019 five basic easy yoga asanas that can help you get started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.