Indian teens rank low on body mas index study reveals reality of malnutrition in india | ...म्हणून भारतात सर्वाधिक किशोरवयीन मुलांची उंची राहते कमी, अभ्यासातून समोर आला असा निष्कर्ष

...म्हणून भारतात सर्वाधिक किशोरवयीन मुलांची उंची राहते कमी, अभ्यासातून समोर आला असा निष्कर्ष

अनेक देशात कुपोषणामुळे किशोरवयीन  लोक आणि लहान मुलांची वाढ नीट होत नाही. त्यामुळे  शरीराच्या विकासावर परिणाम होतो.  बॉडी मास इंडेक्सबाबत जगभरातील २०० देशांपैकी १९६ वा क्रमांक भारताचा आहे. यामुळे भारतातील किशोरवयीन मुलांची उंची विकसित देशातील किशोरवयीन मुलांच्या तुलनेत २० सेमी कमी आहे.  लंडनमधील इंपीरियल कॉलेजमध्ये करण्यात आलेल्या संशोधनानुसार तरूणांमध्ये (19 वर्षांपर्यंत) उंची आणि कमी होत असलेल्या वजनाचा थेट संबंध असतो. इम्पीरियल कॉलेजच्या संशोधनातून दिसून आलं की, शाळेतील मुलांची उंची आणि वजन जगभरात वेगवेगळे आहेत. महिलांच्या बीएमआयमध्ये भारत शेवटून तिसऱ्या क्रमांकावर आहे. मुलांच्या बाबतीत  पाचव्या क्रमांकावर आहे.

संशोधकांना दिसून आलं की, कमी लोकसंख्या आणि जास्त लोकसंख्या असलेल्या देशांमधील लोकांच्या बीएमआयमध्ये खूप फरक आहे. या संशोधनातील बॉडी मास्क इंडेक्सवर विस्तृत विश्लेषण करण्यात आलं होतं. १८८५ ते २०१९ च्या आकडेवारीवर परिक्षण करण्यात आलं होतं.  १९ वर्षीय तरूणांचे बॉडी मास्क इंडेक्स सगळ्यात कमी असलेल्या यादीत भारत तिसऱ्या आणि पाचव्या स्थानावर आहे. भारतासह बांग्लादेश, इथोपिया, जपान, रोम या देशांचा यात समावेश आहे.  जास्त बीएमआय असलेल्या किशोरवयीन मुलांमध्ये कुवैत, बहरीन, बहामस, चिली, अमेरिका आणि न्यूझिलँडचा समावेश आहे. म्हणजेच अमेरिका आणि न्यूझिलँडमधील लोक भारतीयांच्या तुलनेत अधिक जाड आणि उंच असतात. 

२०० देशामधील किशोरवयीन लोकांना सहभागी करून घेण्यात  होतं. दरम्यान बॉडी मास्क इंडेक्ससाठी वजन आणि उंची यांबाबत निरिक्षण करण्यात आले होते. संशोधकांना दिसून आलं की, २०१९ मध्ये जास्त लोकसंख्या असलेल्या देशांमध्ये साधारणपणे  १९ वर्ष वयोगटात नेदरलँड, मोंटेंग्रो, एस्टोनिआ, बोस्निया, डेनमार्क आणि आइसलँड या देशात मुलं आणि मुलांची उंची सोलोमन, लाओस, पपुआ न्यू गिनी, ग्वाटेमाला, बांग्लादेश, नेपाल या देशांच्या तुलनेत जास्त होती. या देशातील किशोरवयीन मुलांची उंची २० सेंटीमीटर आणि त्यापेक्षा अधिक दिसून आली. चिंताजनक! 'या' देशात आढळलं कोरोनाचं नवं रूप; लसही निरोपयोगी ठरणार, तज्ज्ञांचा इशारा

बीएमआयवरून कळू शकते की तुम्ही फिट आहात की नाही. तुमचं वजन कम आहे की जास्त यावरून कळू शकते. आरोग्य  चांगलं राहण्यासाठी उंचीच्या हिशोबाने वजन असणंही तितकंच महत्वाचं असते. उंची आणि वजन व्यवस्थित असले तर शरीराचं संतुलन व्यवस्थित राहतं. जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या माहितीनुसार बीएमआय स्तर १८.५ ते २४.९ यामध्ये असणं आदर्श स्थिती मानली जाते. याचा अर्थ असा ही होऊ शकतो तुमचं वय योग्य किंवा सामान्य वजनापेक्षा कमी आहे. पेपर कपमधून चहा पिता?, वेळीच व्हा सावध अन्यथा...; रिसर्चमधून मोठा खुलासा

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Indian teens rank low on body mas index study reveals reality of malnutrition in india

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.