आता हर्डा आणि चहाने होणार कोरोना विषाणूंपासून बचाव; आयआयटी तज्ज्ञांचा संशोधनातून खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2020 10:12 AM2020-07-05T10:12:37+5:302020-07-05T10:47:27+5:30

CoronaVirus News& Latest update : चहा आणि हर्डा यांच्या वापराने कोरोनावर मात करता येऊ शकते.

IIT delhi study coronavirus haritaki and tea extracts may act as potential therapeutic options against covid 19 | आता हर्डा आणि चहाने होणार कोरोना विषाणूंपासून बचाव; आयआयटी तज्ज्ञांचा संशोधनातून खुलासा

आता हर्डा आणि चहाने होणार कोरोना विषाणूंपासून बचाव; आयआयटी तज्ज्ञांचा संशोधनातून खुलासा

Next

(image credit- Yoga juornal)

कोरोना व्हायरसचं वाढतं संक्रमण थांबवण्याासाठी जगभरातील शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत, कारण कोरोनाच्या माहामारीला आटोक्यात आणण्याासाठी सध्या लस किंवा औषधाचा शोध लागणं महत्वाचं आहे. भारतात आयुर्वेदीक पद्धतीने कोरोनावर मात करता येऊ शकते. का याबाबत संशोधन सुरु आहे.  दरम्यान दिल्लीतील आयआयटीने अलिकडे केलेल्या संशोधनातून एक माहिती समोर आली आहे. चहा आणि हर्डा यांच्या वापराने कोरोनावर मात करता येऊ शकते. संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना काळात या पदार्थांचे सेवन केल्यास आजारांपासून लांब राहता येऊ शकतं.

आयआयटीतील तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार चहा आणि हर्डा यांच्या वापराने कोरोनाच्या संक्रणमावर उपचार केले जाऊ शकतात. कोणत्याही आजाराच्या उपचारांसाठी आयुर्वेदिक वनस्पती महत्वाच्या ठरतात. आयुर्वेदिक वनस्पतींमध्ये औषधी गुणधर्म असतात. त्यामुळे व्हायरसच्या संक्रमणापासून बचाव करता येऊ शकतो. 

आईआईटी दिल्लीमधील कुसुम स्कूल ऑफ बॉयोलॉजिकल साइंसेजचे प्राध्यापक अशोक कुमार पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार चहामध्ये व्हायरशी लढण्यासाठी आवश्यक असलेले गुणधर्म असतात. त्यामुळे कोविड19 च्या संक्रमणासाठी उपाय म्हणून याचा वापर केला जाऊ शकतो. प्राध्यापक पटेल यांनी संशोधनासाठी ५१ औषधी वनस्पतींची तपासणी केली. त्यांनी सांगितले की, आमच्या टीमने व्हायरशी लढत असलेल्या औषधी वनस्पतींवर संशोधन केले आहे. प्रयोगशाळेत व्हायरसचे मुख्य प्रोटीन 3 सीएलप्रो प्रोटीन क्लोन तयार करून त्यावर प्रयोग करण्यात आला.  त्यात असं दिसून आलं की, ब्लॅक टी आणि ग्रीन टी व्हायरसच्या मुख्य प्रोटीन्सची वाढ थांबवण्यासाठी उपयोगी ठरतात. 

चहा आणि इतर औषधी वनस्पतींमध्ये असलेले गॅलोटिनिन व्हायरस प्रोटीनचा प्रभाव कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते. या संशोधनात प्राध्यापक पटेल यांसह देसाई राष्ट्रीय योग केंद्राच्या आयुर्वेदिक वैद्य डॉ मंजू सिंह, पीएचडी विद्यार्थी सौरभ उपाध्याय, प्रवीण कुमार त्रिपाठी, डॉ. शिवा राघवेंद्र, तज्ज्ञ मोहित भारद्वाज यांचा समावेश होता. 

चाय-हरड़ को लेकर आईआईटी, दिल्ली ने किया है शोध

केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी आईआईटी, दिल्लीच्या संशोधनाला अनुसरून सांगितले की, भारतात सर्वाधिक लोकांच्या दिवसाची सुरूवात चहाचा घोट प्यायल्यानंतर होते. त्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी आणि आजारांशी लढण्यासाठी चहाचा वापर करता येऊ शकतो. आयटीआय दिल्लीने दिलेल्या माहितीनुसार चहा आणि हर्डा यांच्या सेवनाने कोरोना व्हायरसच्या मुख्य प्रोटीन्सची वाढ रोखण्यास मदत होऊ शकते. संशोधकांनी प्रोटीन्सवर ५१ औषधी वनस्पतींचा होणारा प्रभाव यांवर चाचणी केली होती. हर्डा आणि चहामुळे या प्रोटीन्सची वाढ रोखता  येऊ शकते. असं या संशोधनातून दिसून आले. 

मेथीच्या पाण्याने लगेच दूर होतील 'या' 6 गंभीर समस्या, झोपही येईल चांगली!

CoronaVirus News : धूम्रपान करता?, वेळीच व्हा सावध; कोरोनाचा आहे सर्वाधिक धोका

Web Title: IIT delhi study coronavirus haritaki and tea extracts may act as potential therapeutic options against covid 19

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.