ब्रेकफास्ट टाळाल, तर वजनावर राहणार नाही कंट्रोल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 06:58 PM2017-12-29T18:58:37+5:302017-12-29T19:01:53+5:30

प्रत्येक घरानं लावायला हवी सकाळच्या नाश्त्याची सवय..

 If you skip breakfast, it will be the biggest weight loss mistake ! | ब्रेकफास्ट टाळाल, तर वजनावर राहणार नाही कंट्रोल!

ब्रेकफास्ट टाळाल, तर वजनावर राहणार नाही कंट्रोल!

ठळक मुद्देतुम्हाला कितीही काम असलं, अगदी बिझी शेड्यूल असलं तरीही ब्रेकफास्ट टाळणं हा त्यावरचा उपाय नाही.सकाळी घरातून लवकर बाहेर पडायचं असलं तरीही नेहेमीपेक्षा आणखी थोडं लवकर उठून घरी ब्रेकफास्ट करूनच बाहेर पडायला हवं.आपल्या तब्येतीसाठी तर ते चांगलं आहेच, पण इतर बिनबुलाए आजारांना टाळण्याचाही तो सर्वोत्तम उपाय आहे.

- मयूर पठाडे

कामाचं रहाटगाडगं मागं लागलंय? आॅफिसमध्येही खूप लवकर जावं लागतंय आणि उशिरापर्यंत थांबावं लागतंय?.. त्यामुळे वेळेवर आणि पुरेसा ब्रेकफास्ट घ्यायलाही तुम्हाला वेळ मिळत नाहीए ना?..
काय म्हणताय, तुम्ही ब्रेकफास्ट चक्क स्किपच करताय? आॅफिसमध्ये जाऊनच जे मिळेल ते घेताय किंवा थेट जेवणच तुम्ही करत असाल तर मग तुम्ही फार मोठी चूक करताय हे लक्षात घ्या.. प्रत्येकासाठी सकाळचा नाश्ता अत्यावश्यक असतो. घरी भरपेट नाश्ता करूनच घराबाहेर पडलं पाहिजे. तुम्ही फिटनेस फ्रिक असा किंवा नसा, पण नाश्ता टाळल्यामुळे तुमच्या वेटलॉसच्या निर्णयाचा पार बोºया वाजेल. कारण नाश्ता न करता बाहेर पडल्यावर, विशेषत: आॅफिस किंवा इतर कामाच्या ठिकाणी गेल्यावर आपोआपच काही अरबट चरबट खाणं आपल्याकडून होतं. त्यामुळे तुमच्याकडून अधिकच्या कॅलरीजही सेवन केल्या जातात. शिवाय ब्रेकफास्ट न करता घराबाहेर पडल्यामुळे जास्त कॅलरीज असलेल्या फास्ट फूडकडे आपोआपच आपण ओढले जातो आणि दुहेरी नुकसान होतं.
तुम्हाला कितीही काम असलं, अगदी बिझी शेड्यूल असलं तरीही ब्रेकफास्ट टाळणं हा त्यावरचा उपाय नाही. सकाळी घरातून लवकर बाहेर पडायचं असलं तरीही नेहेमीपेक्षा आणखी थोडं लवकर उठून घरी ब्रेकफास्ट करूनच बाहेर पडायला हवं.
आपल्या तब्येतीसाठी तर ते चांगलं आहेच, पण इतर बिनबुलाए आजारांना टाळण्याचाही तो सर्वोत्तम उपाय आहे.
आहारतज्ञ आणि संशोधकांनी त्यामुळे सगळ्यांनाच आवर्जुन नाश्ता करण्याचा सल्ला दिला आहे. तुम्हाला सकाळी लवकर घराबाहेर पडायचं असो किंवा नसो, तुम्हाला ‘भूक’ असो नसो, प्रत्येकानं सकाळी व्यववस्थित ब्रेकफास्ट केलेला असला तर तब्येतीच्या अनेक तक्रारी त्यामुळे दूर राहतात.

Web Title:  If you skip breakfast, it will be the biggest weight loss mistake !

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.