(Image Credit : Reader's Digest)

ऑफिसमध्ये अनेकदा काम करता करता झोप येऊ लागते. कॉफीवर कॉफी प्यायली जाते पण त्याचाही फार काही परिणाम होताना दिसत नाही. अशात करायचं तरी काय? कारण झोपेमुळे कामही होत नाही आणि झोपताही येत नाही. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऑफिसमध्ये झोप का येते याच्या कारणांचा कुणीच शोध घेण्याचा प्रयत्न करत नाहीत. अशाप्रकारे झोप येण्याला तुमच्या काही सवयी जबाबदार आहेत. या छोट्या छोट्या सवयी जर तुम्ही बदलल्या तर तुमची झोप काही मिनिटात उडेल.

ब्रेकमध्ये काय करता?

(Image Credit : Mount Elizabeth Hospital)

एका रिसर्चनुसार, जे लोक जेवताना फोनचा वापर करतात, मेल किंवा सोशल मीडिया चेक करतात त्यांना जास्त थकल्यासारखं वाटतं. सोशल मीडियाचा वापर केल्याने आपल्या मेमरीला अचानक खूप सूचना मिळतात आणि यामुळे एंग्झायटीची समस्या होते. त्यामुळे लंच ब्रेकमध्ये मेंदूला आराम द्या. 

काम टाळून काय होणार?

(Image Credit : thebalancesmb.com)

अनेकदा अनेकजण आराम करण्यासाठी काम टाळतात. पण याने आराम मिळण्याऐवजी स्ट्रेस वाढतो. कारण पेंडिंग राहिलेलं काम पूर्ण करण्याचा तुमच्यावर दबाव राहतो. बरं होईल की, तुमची कामे काही भागांमध्ये विभाजित करा. हे काम हळूहळू पूर्ण झालं की, तुम्हाला चांगलं वाटेल आणि त्यानंतर तुम्ही ब्रेकही घेऊ शकता.

पुन्हा पुन्हा मॅगी खाणे

काम करत असतानाच अनेकांना काहीना काही खाण्याची सवय असते. अनेकजण मॅगी खातात. पण असं न करता स्नॅक्समध्ये अशा पदार्थांची निवड करा ज्यात कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट्स आणि फायबरचं बॅलन्स असेल. सोबतच काही फळंही खाऊ शकता.

सॉक्समुळेही झोप

(Image Credit : lifealth.com)

पायांना थोडा थोडा घाम येत राहतो. अशात दुपारी सॉक्स बदला. याने तुम्हाला फ्रेश वाटेल. नवीन सॉक्स वापरण्यापूर्वी पायांना एखादं कुलिंग बाम लावा. याने तुम्हाला झोप येणार नाही. 

पाण्याने मिळेल आराम

(Image Credit : adeptocompany.ba)

शरीरातील पाणी थोडंही कमी झालं तर शारीरिक आणि मानसिक क्षमता १० टक्के कमी होते. याचा अर्थ हा नाही की, तुम्ही एनर्जी ड्रिंक प्यावे. कारण यात फार जास्त शुगर असते. ब्लड शुगर वाढल्याने तुम्हाला आणखी जास्त आळस येईल. त्यामुळे दिवसभर थोडं थोडं पाणी सेवन करत रहावे.

बाहेर फिरून या...

ऑफिसमधील आर्टिफिशिअल लाइटचा प्रकाश नॅच्युरल लाइटपेक्षा कमी असतो. अशात स्लीप हार्मोन्सचं प्रमाण वाढू लागतं. स्वत:ला जागं ठेवण्यासाठी अधून-मधून बाहेर फेरफटका मारून यावा.

च्यूइंगम

(Image Credit : Wise Bread)

च्युइंगम खाल्ल्याने तुम्हाला जास्त जागं राहण्यास मदत मिळेल. एका रिसर्चनुसार, च्युइंगम खाल्ल्याने हार्ट रेट वाढतो आणि मेंदूमध्ये रक्तप्रवाह सुद्धा वाढतो. याने तुम्ही अलर्ट रहाल. 

एकसारखं बसून राहणे

(Image Credit : HuffPost)

जास्तवेळ एकाच जागी बसून राहिल्याने हार्ट रेट कमी होतो. मांसपेशींमध्ये रक्त आणि ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो आणि आपल्याला झोप येऊ लागते. त्यामुळे कामातून ब्रेक घेऊन थोडं चालावं. शरीराची हालचाल झाल्यास झोप उडेल.

पापण्या हलवूनही जाईल झोप

एका जपानी रिसर्चनुसार, पापण्या हलवल्याने सुद्धा मेंदू सतर्क होतो अनेकदा कामात लक्ष घातल्यावर आपण पापण्या कमी हवलतो आणि हे आपल्याला माहितही नसतं. यानेही झोप येऊ लागते.

Web Title: How to stay awake during office hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.