मुलांना होणारा क्षय कसा ओळखाल?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2018 01:17 PM2018-09-19T13:17:38+5:302018-09-19T13:18:06+5:30

क्षयरोगाचे खोकल्यापेक्षा दुसरे कोणतेही लक्षण आपल्याला माहिती नसते त्यामुळे क्षयाचे निदान लवकर होत नाही. त्यामुळे काही लक्षणे दिसून आल्यास मुलांची आरोग्य तपासणी करणे गरजेचे असते.

How to recognize the decay of children? | मुलांना होणारा क्षय कसा ओळखाल?

मुलांना होणारा क्षय कसा ओळखाल?

Next

मुंबई- जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार जगातील 15 वर्षांपेक्षा कमी वयाच्या 10 लाख मुलांना दरवर्षी क्षयरोग होतो. उपचार वेळीच न मिळाल्यामुळे त्यातील 2 लाख मुलांना आपले प्राण गमवावे लागतात. क्षयरोगाचे खोकल्यापेक्षा दुसरे कोणतेही लक्षण आपल्याला माहिती नसते त्यामुळे क्षयाचे निदान लवकर होत नाही. त्यामुळे काही लक्षणे दिसून आल्यास मुलांची आरोग्य तपासणी करणे गरजेचे असते. पुढील काही लक्षणांकडे लक्ष ठेवल्यास मुलांना टीबीपासून वाचवता येणे शक्य आहे.

वयानुसार मुलांची वाढ होणे गरजेचे आहे. मात्र काही मुलांची प्रकृती नाजूक असते. त्यांच्या शरीराची वाढ होत नाही. योग्य आहार आणि काळजी घेऊनही त्यांची वाढ होत नसेल तर मुलांची डॉक्टरकडून तपासणी करुन घेणे गरजेचे आहे.

 अनेकदा लहान मुलांच्या गळ्याच्या शिरा सुजलेल्या दिसतात. कधीकधी मुलांना यामुळे वेदना होत असतात. अशा स्थितीतही डॉक्टरचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

मुलांना वारंवार थंडी लागत असेल तरीही त्यांची क्षयाची तपासणी करून घेतली पाहिजे. डॉक्टरांना दाखवून वारंवार थंडी लागणे, ताप येणे, घाम य़ेणे अशा तक्रारींचे निदान करुन घ्यावे.

15 वर्षांपेक्षा लहान असणाऱ्या काही मुलांच्या छातीमध्ये सतत दुखत असते. जर बाहेरून कोणतीही जखम झालेलली नसता त्यांना वेदना जाणवत असतील तर डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.

जर 3 आठवड्यांपेक्षा जास्त काळ खोकला, अचानक वजन घटणे अशी लक्षणे दिसली तरीही त्यांना तात्काळ डॉक्टरला दाखवणे आवश्यक आहे.
 

Web Title: How to recognize the decay of children?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.