How to prevent kids form vitamin D deficiency at birth ups risk to increase high blood pressure | 'या' कारणाने लहान मुलांना होऊ शकतो हाय बीपीचा धोका, वेळीच व्हा सावध!
'या' कारणाने लहान मुलांना होऊ शकतो हाय बीपीचा धोका, वेळीच व्हा सावध!

आजच्या धावपळीच्या जीवनात ब्लड फ्रेशरची समस्या सामान्य झाली आहे. कुणाला हाय बीपीची समस्या आहे तर कुणाला लो बीपीची. पण तुम्हाला हे माहीत आहे का की, व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळेही लहान मुला-मुलींना हाय बीपीचा धोका वाढू शकतो. नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चमधून ही बाब समोर आली आहे. या रिसर्चनुसार, जर जन्मावेळी किंवा गर्भावस्थेत व्हिटॅमिन डी चा योग्य आहार मिळाला नाही तर त्या बाळांना पुढे जाऊन हाय बीपीचा धोका होऊ शकतो.

कॅल्शिअम अब्जॉर्ब करण्यासाठी आवश्यक व्हिटॅमिन डी

आपल्या शरीरात हाडांना मजबूती देण्यासाठी कॅल्शिअम अब्जॉर्ब करण्यासाठी व्हिटॅमिन डीची आवश्यकता असते. जे आपल्या शरीरात दोनप्रकारे मिळतं. एक जे स्वत: आपलं शरीर तयार करतं आणि एक ते जे सूर्यापासून मिळतं. तसेच काही प्रमाणात आपण अंडी, रावस मासे आणि दुधातून घेतो. त्यासोबतच काही व्हिटॅमिन डी चे सप्लिमेंट्सही येतात. यांचा वापर करून शरीरारील व्हिटॅमिन डी ची कमतरता पूर्ण केली जाते.

हाय बीपीची समस्या 60 टक्क्यांनी वाढते

रिसर्चमध्ये सांगण्यात आलं आहे की, गर्भावस्था किंवा बालपणी व्हिटॅमिन डी योग्य प्रमाणात न मिळाल्याने 6 ते 18 वयापर्यंत लहान मुलांमध्ये हाय सिस्टोलिक ब्लड प्रेशरची समस्या 60 टक्क्यांनी वाढते. हा निष्कर्ष काढण्यासाठी अभ्यासकांनी बॉस्टन मेडिकल सेंटरमध्ये जन्मापासून ते 18 वयाच्या 775 मुलांचा अभ्यास केला. यांच्यात व्हिटॅमिन डी चं प्रमाण जन्मावेळी गर्भनाळ रक्तात 11 एनजी/एमएल पेक्षा कमी आढळला.  

व्हिटॅमिन डी चं योग्य प्रमाण घेणं गरजेचं 

रिसर्चमध्ये असं सांगण्यात आलं आहे की, गर्भावस्था किंवा सुरूवातीच्या बालपणात व्हिटॅमिन डी योग्य प्रमाणात मिळणं गरजेचं आहे. अन्यथा हाय सिस्टॉलिक ब्लड प्रेशर रीडिंगने डायस्टॉलिक ब्लड प्रेशर, ब्लड प्रेशर रीडिंगमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असूनही हृदयरोगाचा धोका वाढवतो.

रिसर्चचे मुख्य लेखक आणि जॉन्स हॉपकिंस विश्वविद्यालयाचे ब्लूमबर्ग स्कूलमधील सहायक वैज्ञानिक गुयिंग वांग म्हणाले की, आमच्या निष्कर्तातून हे दिसून येतं की, लहान मुलांना गर्भात असताना आणि बालपणी जर व्हिटॅमिन डीने युक्त आहार दिला गेला तर त्यांची हाय बीपीची समस्या कमी करण्यास मदत मिळेल.

नियमित तपासणी गरजेची

तज्ज्ञ सांगतात की, तीन वर्षांपेक्षा अधिक वयाच्या मुलांची नियमित रक्तदाब चाचणी केली पाहिजे. याने त्यांना हाय बीपीपासून वाचवता येऊ शकतं. बालपणी वाढत्या वयासोबत रक्तदाब वाढत असतो. त्यामुळे त्यांची वेळोवेळी तपासणी देखील केली तर फायदा होऊ शकतो.
 


Web Title: How to prevent kids form vitamin D deficiency at birth ups risk to increase high blood pressure
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.