किती दिवसांनी बदलावा तुमचा टूथब्रश? कशी समजेल ब्रश बदलण्याची वेळ?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2021 04:26 PM2021-09-27T16:26:24+5:302021-09-27T16:26:44+5:30

एका टूथब्रशचा वापर आपण किती दिवस करावा आणि कधी ब्रश बदलावा हे आज आम्ही तुम्हाला  सांगणार आहोत. सोबतच हेही जाणून घेऊया की, कसं जाणून घ्यावं की ब्रश बदलण्याची वेळ आली आहे.

How often should you change toothbrushes and when you should replace | किती दिवसांनी बदलावा तुमचा टूथब्रश? कशी समजेल ब्रश बदलण्याची वेळ?

किती दिवसांनी बदलावा तुमचा टूथब्रश? कशी समजेल ब्रश बदलण्याची वेळ?

Next

दररोज सकाळी उठून तुम्ही ब्रश करत असाल. जे लोक आपल्या दातांची खास काळजी घेतात, ते शहानिशा करूनच टूथब्रशची निवड करतात. पण एकदा टूथब्रश खरेदी करून हे विसरून जातात आणि बरीच वर्ष एकच ब्रश वापरतात राहतात. मात्र, ब्रश बदलण्याची एक ठराविक वेळ असते. जास्त काळ एकच ब्रश वापरल्याने तुमचे दात आणि हिरड्यांसाठी नुकसानकारक ठरतं.

एका टूथब्रशचा वापर आपण किती दिवस करावा आणि कधी ब्रश बदलावा हे आज आम्ही तुम्हाला  सांगणार आहोत. सोबतच हेही जाणून घेऊया की, कसं जाणून घ्यावं की ब्रश बदलण्याची वेळ आली आहे.

किती दिवसांनी बदलावा ब्रश?

द सेंटर्स फॉर डिजीज प्रिवेंशन अॅन्ड कंट्रोलनुसार, व्यक्तीने ३ ते ४ महिन्यांनंतर आपला टूथब्रश बदलावा. याचा अर्थ असाही नाही की, ब्रश खराब झाल्यावरही तुम्ही चार महिन्यांपर्यंत वाट बघावी. जर तुमच्या ब्रशचे ब्रिशल खराब झाले असतील, तुटत असतील किंवा पूर्णपणे वाकले असतील तर तुम्ही वेळीच ब्रश बदलण्याची गरज आहे. 

कसं कळेल ब्रश बदलण्याची वेळ झाली?

तसं तर ब्रशचे दाते पाहून तुम्हाला हे समजू शकतं की, ब्रश बदलण्याची वेळ झाली आहे. जसे की, ब्रशचे ब्रिशल तुटत असतील तर तो वेळीच बदलावा. अनेक लोकांचं मत आहे की, ब्रिशलच्या खालच्या भागात पांढला थर जमा झाले असेल तर वेळीच ब्रश बदलावा. जास्त काळ एकाच ब्रशचा वापर करणं दातांसाठी चांगलं ठरत नाही.

आजारांची शक्यता

कोलगेटच्या वेबसाइटनुसार, जर तुम्हाला व्हायरस किंवा फंगसशी संबंधित काही आजार आज झाला असेल तर तुम्ही बरे झाल्यानंतर ब्रश लगेच बदलावा. कोरोना व्हायरस दरम्यान अनेक डॉक्टरांनी सल्ला दिला होता की, पॉझिटिव्ह आलेल्या रूग्णांनी निगेटिव्ह झाल्यावर ब्रश बदलावा. तुमच्या ब्रश इतरांच्या ब्रशसोबत ठेवत असाल तर त्यांनाही तुमचा आजार होऊ शकतो. अशात आजारा दरम्यानचा ब्रश लगेच बदलावा.
 

Web Title: How often should you change toothbrushes and when you should replace

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.