लसणाच्या फक्त २ पाकळ्यांनी मुलांची सर्दी, खोकल्याची समस्या होईल दूर; 'असा' करा वापर

By Manali.bagul | Published: January 7, 2021 04:55 PM2021-01-07T16:55:38+5:302021-01-07T16:58:03+5:30

Winter Care tips in Marathi : लसणाच्या पाकळ्यासुद्धा सर्दी, खोकला यांसारख्या वातावरणातील बदलांमुळे  होत असलेल्या समस्यांशी लढण्यासाठी परिणामकारक ठरतात.

How garlic prevent kids from cough and cold in | लसणाच्या फक्त २ पाकळ्यांनी मुलांची सर्दी, खोकल्याची समस्या होईल दूर; 'असा' करा वापर

लसणाच्या फक्त २ पाकळ्यांनी मुलांची सर्दी, खोकल्याची समस्या होईल दूर; 'असा' करा वापर

googlenewsNext

वाढत्या हिवाळ्याच्या वातावरणात  सर्दी, ताप, खोकला, घसादुखी यांसारख्या आजारांचा सामना अनेकांना करावा लागत आहे. लहान मुलं वांरवार आजारी पडत असल्यामुळे सगळ्यात घरातील लोक या काळजीत असतात. तुमचा विश्वास बसणार नाही पण लसणाच्या पाकळ्यासुद्धा सर्दी, खोकला यांसारख्या वातावरणातील बदलांमुळे  होत असलेल्या समस्यांशी लढण्यासाठी परिणामकारक ठरतात. आज आम्ही तुम्हाला आजारांशी लढण्यासाठी लसणाच्या पाकळ्यांचा वापर कसा करता येईल याबाबत सांगणार आहोत.

असं तयार करा

मुलांना सर्दी, खोकला आणि सर्दीपासून दूर ठेवण्यासाठी वापरल्या जाणार्‍या या रेसिपीमध्ये लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा वाटी मोहरीचे तेल आवश्यक आहे. सगळ्यात आधी एक तवा घ्या. तवा गरम  झाल्यानंतर त्यात मोहोरीचे तेल घाला. गरम मोहोरीच्या तेलात लसणाच्या पाकळ्या घाला. लसणाच्या पाकळ्या गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर गॅस बंद करा. 

हे तेल थंड करून लहान मुलांची मलिश करा. लक्षात घ्या तेल जास्त गरम असू नये, आपल्या हाताला तेल लावून बाळाची मालिश करा. तुम्ही तयार केलेलं हे तेल दीर्घकाळ हे तेल चांगलं राहू शकतं. कधीही या तेलाचा वापर करण्यासाठी कोमट गरम करून घ्या.

फायदे

हिवाळ्याच्या वातावरणात लसणाच्या सेवनाने रोगप्रतिकारकशक्ती वाढते. याशिवाय अन्य आजारांपासूनही बचाव होतो. पोटदुखीचा त्रास होत असल्यास लसणू आणि मधाचं मिश्रण लहान मुलांना दिल्यास पोटासंबंधी आजार दूर होण्यास मदत होते. आतड्यांच्या समस्यांपासून लांब राहता येते. 

लसणात सुक्ष्मजीव विरोधी तत्व असतात. यामुळे बॅक्टेरियांमुळे पसरत असलेल्या संक्रमणापासून शरीराचा बचाव होतो. यात फायटोकॅमेकिल्सचा समावेश असतो. त्यामुळे आतड्यांमधील बॅक्टरिया नष्ट होण्यास मदत होते. हिवाळ्यात स्वेटर घालून झोपणं ठरू शकतं घातक; 'या' समस्यांशी करावा लागू शकतो सामना 

लहान मुलांची रोगप्रतिकारकशक्ती कमी असल्यामुळे त्यांना सर्दी, तापाच्या समस्यांचा सामना करावा लागतो. लसूण शरीरासाठी गरम असतात.  'या' लोकांना इतक्यात मिळणार नाही कोरोनाची लस; एम्सच्या तज्ज्ञांची महत्वाची माहिती

गरजेपेक्षा जास्त सेवन केल्यास प्रकृती बिघण्याची शक्यता असते. म्हणून योग्य प्रमाणात रोजच्या आहारात लसणाचे सेवन करा.  जर तुम्हाला लसणाची किंवा गरम पदार्थांची एलर्जी असेल तर एक्सपर्ट्सचा सल्ला नक्की घ्या.

Web Title: How garlic prevent kids from cough and cold in

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.