मास्क घातल्यामुळे डोकेदुखी होतेय? मग या टिप्स तुम्हाला डोकेदुखी पासून सुटका देतील

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2021 05:44 PM2021-10-12T17:44:14+5:302021-10-12T17:44:29+5:30

लसीकरणानंतरही (Vaccination)मास्क लावयाला हवा. मास्क, सॅनिटायझर (Sanitizer) आणि सोशल डिस्टन्सिंग (Social Distancing) याचा अवलंब करायला हवा. तुम्ही काही पद्धतींचा उपयोग करुन मास्क घालतल्यावर होणारी डोकेदुखी टाळू शकता. वाचा याबाबत अधिक...

how to avoid headache caused by wearing mask, use mask to save yourself from corona | मास्क घातल्यामुळे डोकेदुखी होतेय? मग या टिप्स तुम्हाला डोकेदुखी पासून सुटका देतील

मास्क घातल्यामुळे डोकेदुखी होतेय? मग या टिप्स तुम्हाला डोकेदुखी पासून सुटका देतील

Next

कोराना विषाणूपासून ( coronavirus) संरक्षण करण्यासाठी, मास्क घालणे आणि सोशल डिस्टन्सिंग यासारख्या गोष्टींची काळजी घेणे महत्वाचे आहे. तथापि, बऱ्याचदा असे घडते की मास्क घातल्याने तीव्र डोकेदुखीची समस्या सुरु होती. तज्ज्ञांच्या मते, या प्रकारची समस्या बहुतेक लोकांना सतत मास्क घातल्याने जाणवते, परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्ही मास्क घालणे बंद केले पाहिजे. लसीकरणानंतरही (Vaccination)मास्क लावयाला हवा. मास्क, सॅनिटायझर (Sanitizer) आणि सोशल डिस्टन्सिंग (Social Distancing) याचा अवलंब करायला हवा. तुम्ही काही पद्धतींचा उपयोग करुन मास्क घालतल्यावर होणारी डोकेदुखी टाळू शकता. वाचा याबाबत अधिक...

हे आजार असतील तर त्रास अधिक होण्याची शक्यता
ज्या लोकांना सर्दी, खोकला, अ‍ॅलर्जी, दमा किंवा त्वचेवर पुरळ या तक्रारी आहेत त्यांच्यासाठी सतत मास्क घालणे कठीण आहे. तज्ज्ञांच्या मते, बराच काळ मास्क घातल्याने  Temporomandibular jointमध्ये (TMJ)  वेदना होऊ शकते. कारण हे तुमच्या खालच्या जबड्याला जोडलेले असते. मास्क घातल्यावर स्नायू आणि टिशूज हालचालीला अडथळा येतो. यामुळे जबड्याच्या हालचालीवर परिणाम होतो, तेव्हा मज्जातंतू मेंदूला वेदनांचे संकेत देते (Pain Signals). यामुळे डोकेदुखी होते.

मास्कमुळे डोकेदुखी टाळण्यासाठी तुम्ही काही मार्ग अवलंबू शकता

  • कानाला जास्त घट्ट नसलेला मास्क घाला. यामुळे त्रासापासून सुटका होऊ शकते. कान दुखायचा थांबतो आणि डोकेदुखीतूनही सुटका होते.
  • जबड्याचे स्नायू आणि दातांमध्ये घट्टपणामुळे तणाव आणि चिंता वाढू शकते. तुमच्या जबड्याचे स्नायू आणि दात रिलॅक्स असले पाहिजेत.
  • चुकीच्या पद्धतीमुळे मास्कचा वापर केला तर मास्क घातल्याने  Temporomandibular jointमध्ये (TMJ)  वेदना होऊ शकते. चुकीच्या पोझिशनमुळे स्नायूंचा ताण वाढतो.
  • ध्यानधारणा (मेडिटेशन) करा, हलक्या पद्धतीने मान हलवा किंवा फिरवा तसेच गालांना मालिश करा. 
     

लसीकरणानंतरही मास्क घालणे फार महत्वाचे आहे. मास्कशिवाय घराबाहेर पडण्याचा धोका पत्करु नका. कोरोनापासून संरक्षणासाठी मास्कचा योग्य पद्धतीने वापर करा. चेहऱ्यावरचा मास्क योग्य पद्धतीने न लावल्यास त्याचा काही उपयोग होत नाही. आपले नाक आणि तोंड पूर्णपणे झाकणारा मास्क लावायला हवा. ट्रिपल लेयर मास्क (Triple Layer Mask) किंवा सर्जिकल मास्क अधिक उपयुक्त आहे.

Web Title: how to avoid headache caused by wearing mask, use mask to save yourself from corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.