Heart Attack : हिवाळ्यात वाढतो हार्ट अटॅकचा धोका, 'या' टिप्स फॉलो करून रहा सुरक्षित

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2022 11:12 AM2022-01-18T11:12:53+5:302022-01-18T11:13:26+5:30

Heart Attack : उन्हाळ्याच्या तुलनेत हिवाळ्यात हृदयासंबंधी समस्यांचा अधिक सामना करावा लागतो. हिवाळ्यात जसजसं तापमान कमी होतं, शरीराचं तापमान कंट्रोल करण्यासाठी हृदयाला जास्त मेहनत घ्यावी लागते.

Heart attack risk increases in winter follow these tips | Heart Attack : हिवाळ्यात वाढतो हार्ट अटॅकचा धोका, 'या' टिप्स फॉलो करून रहा सुरक्षित

Heart Attack : हिवाळ्यात वाढतो हार्ट अटॅकचा धोका, 'या' टिप्स फॉलो करून रहा सुरक्षित

Next

हृदय आपल्या शरीरातील सर्वात महत्वाचा अवयव असतो. हृदय आपल्याला जीवंत ठेवण्यासाठी नॉनस्टॉप काम करतं. त्यामुळे त्याची काळजी घेणं आपल्यासाठी महत्वाचं असतं. पण चुकीच्या लाइफस्टाईल आणि खाण्या-पिण्यामुळे हृदयाला नुकसान पोहोचतं. हिवाळ्यात हार्टच्या समस्या (Heart Disease) अधिक वाढतात. उन्हाळ्याच्या तुलनेत हिवाळ्यात हृदयासंबंधी समस्यांचा अधिक सामना करावा लागतो. हिवाळ्यात जसजसं तापमान कमी होतं, शरीराचं तापमान कंट्रोल करण्यासाठी हृदयाला जास्त मेहनत घ्यावी लागते.

हिवाळ्यात बॉडी टेम्प्रेचर कमी झाल्याने आपला सिम्पेथेटिक नर्वस सिस्टम अॅक्टिव होतो आणि कॅटेकोलामाइनचा स्त्राव वाढू शकतो. याने रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, ज्यामुळे हार्ट रेट, ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉलचं प्रमाण आणि रक्ताच्या गाठी तयार होण्याची प्रक्रिया वाढू शकते. या सर्व गोष्टींमुळे हार्ट अटॅकचा (Heart Attack) धोका वाढतो. फोर्टिस हॉस्पिटल कल्याणचे डॉ. जकिया  खान यांनी हिवाळ्यात हृदय फिट ठेवण्यासाठी काही टिप्स शेअर केल्या आहेत. 

स्ट्रेस घेऊ नका - हार्ट अटॅक आणि हृदयासंबंधी आजारांचं मुख्य कारण स्ट्रेस असतो. एक्यूट स्ट्रेसमुळे थेट हार्ट अटॅक येऊ शकतो आणि  क्रोनिक स्ट्रेसने हृदयाच्या धमण्यांच्या आतील थरात बदल होऊ शकतो. ज्याने सूज येऊ शकते, ज्यामुळे रक्ताच्या गाठी तयार होऊ शकतात आणि सोबतच हार्ट अटॅकही येऊ शकतो.

आवडीचं काम करा - गार्डनिंग, पेंटिंग, रीडिंग आणि म्युझिक ऐकल्याने तणाव कमी केला जाऊ शकतो. तुम्ही योगा आणि मेडिटेशनही करू शकता. याने तुम्हाला स्ट्रेस कमी करण्यास बराच फायदा होऊ शकतो.

भरपूर झोप घ्या - हार्ट अटॅकचा धोका कमी करण्यासाठी तुम्ही पुरेशी झोप घेणं फार गरजेचं असं. सोबतच काम करताना मधे मधे ब्रेक घेत रहा. भरपूर झोप याचा अर्थ ८ तासांपेक्षा जास्त झोप नाही. दिवसातून ७ ते ८ तास झोप शरीरासाठी गरजेची असते. पण त्यापेक्षा जास्त वेळ झोपाल तर त्याचे उलट परिणाम होऊ शकतात.

रोज एक्सरसाइज करा - दिवसातून कमीत कमी ३० मिनिटे एक्सरसाइज करा. हिवाळ्यात घराबाहेर एक्सरसाइज करणं टाळा. कारण बाहेर थंडी जास्त असते.  अशात तुम्ही योग्यप्रकारे एक्सरसाइज करू शकणार नाही. तुम्ही सायकलिंग, ट्रेडमिल, योगासारखे इनडोर एक्सरसाइज करू शकता.

जास्त मीठ आणि साखरेपासून  दूर रहा - आहारात सूर्यफूलाचं तेल किंवा सरसुच्या तेलाचा वापर करा. हे पॉलअनसॅचुरेटेड असतात. आपल्या रोजच्या आहारात सलाद आणि फळांचा समावेश करा. जास्तीत जास्त पौष्टिक पदार्थ खावीत. फास्ट फूडपासून दूर रहा.
 

Web Title: Heart attack risk increases in winter follow these tips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.