नाश्त्यामध्ये ब्रेड जॅम, पराठा नाहीतर 'या' 4 पदार्थांचा समावेश करा अन् हेल्दी राहा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2019 11:35 AM2019-11-06T11:35:37+5:302019-11-06T11:36:21+5:30

सध्याच्या धावपळीच्या युगात अनेकजण आपल्या फिटनेसची काळजी घेऊ लागले आहेत. मग तो नाश्ता असो वा दुपारचं जेवण किंवा मग रात्रीचं जेवण. पण तुम्हाला माहीत आहे का?

Healthy diet tips healthy breakfast list for energy blood weight loss | नाश्त्यामध्ये ब्रेड जॅम, पराठा नाहीतर 'या' 4 पदार्थांचा समावेश करा अन् हेल्दी राहा

नाश्त्यामध्ये ब्रेड जॅम, पराठा नाहीतर 'या' 4 पदार्थांचा समावेश करा अन् हेल्दी राहा

Next

सध्याच्या धावपळीच्या युगात अनेकजण आपल्या फिटनेसची काळजी घेऊ लागले आहेत. मग तो नाश्ता असो वा दुपारचं जेवण किंवा मग रात्रीचं जेवण. पण तुम्हाला माहीत आहे का? सकाळचा नाश्ता दिवसभरासाठी शरीराला ऊर्जा मिळण्यासाठी अत्यंत आवश्यक असतो. कारण रात्रीच्या जेवणानंतर सकाळपर्यंत आपण काहीच खात नाही. अशातच दिवसाची सुरुवात पोटभर नाश्ता करून केल्याने आरोग्य राखण्यास मदत होते. 

अनेक संशोधनांमधूनही ही गोष्ट सिद्ध झाली असून नाश्त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या व्यक्तींमध्ये आरोग्याच्या अनेक समस्या पाहायला मिळतात. पम अनेकदा असा प्रश्न निर्माण होतो की, नाश्त्यात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा? आणि कोणते पदार्थ खाऊ नयेत.

1. गोड पदार्थ 

सकाळच्या वेळी गोड पदार्थांचं सेवन टाळण्याचा सल्ला दिला जातो. कारण सकाळी गोड पदार्थ खाल्याने शरीराच्या शुगर लेव्हलवर परिणाम होतो. तुम्ही दुपारच्या जेवणानंतर किंवा रात्रीच्या आहारात गोड पदार्थांचा समावेश करू शकता. पण सकाळी नाश्तासाठी गोड पदार्थांचं सेवन करू नये. 

2. पराठा 

कडधान्य किंवा धान्यांचा आहारात समावेश करणं आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. अनेक धान्यांमध्ये ग्लूटेन नावाचा पदार्थ असतो. ज्यामध्ये साखरेचे प्रमाण अधिक असते. साखरेचे प्रमाण जास्त असणाऱ्या पदार्थांचं सेवन सकाळी करणं अत्यंत अवघड असतं. 

3. मांसाहारी पदार्थ 

मांसाहारी पदार्थांच्या अधिक सेवनाने आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवण्याचा धोका असतो. सकाळच्या वेळी मांसाहारी पदार्थांचे अधिक सेवन करणं आरोग्यासाठी घातक ठरू शकतं. मांसाहारी पदार्थांमध्ये नायट्रेट असतं आणि त्याचं अधिक सेवन केल्याने त्वचेच्या अनेक समस्यांसोबतच कॅन्सरसारख्या गंभिर आजारांचाही धोका संभवतो. 

4. ब्रेड जॅम 

ब्रेड आणि जॅम या दोन्ही पदार्थांमध्ये फॅट्स आणि साखरेचे प्रमाण मुबलक प्रमाणात असते. या दोन्ही पदार्थांचा परिणाम आरोग्यासाठी घातक ठरू शकतो. 

5. ज्यूस आणि शेक 

फळं आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरत असल्याचे आपण ऐकत असतो. परंतु, सकाळच्या वेळी ज्यूस पित असाल तर ते आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. दरम्यान, काही ज्यूसमध्ये अनेक प्रकारचे अॅसिडीक पदार्थ असतात. जे शरीराला अंतर्गत नुकसान पोहोचवण्यासाठी कारणीभूत ठरतात. तसेच इतर गोड पदार्थांचे ज्यूस आरोग्यासाठी चांगले नसतात. 

नाश्त्यासाठी हेल्दी पदार्थ : 

अनेक लोक लठ्ठपणाच्या समस्येने ग्रस्त आहेत. ज्यामुळे तुम्हाला डायबिटीस, कॅन्सर आणि हार्ट डिजिजचा धोका संभवतो. जर तुम्हालाही लठ्ठपणासारख्या समस्यांचा सामना करावा लागत असेल किंवा अनेक प्रयत्नांनंतरही वजन कमी करणं अवघड असेल तर तुम्ही तुमच्या डाएट प्लानबाबत विचार करायला हरकत नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच काही पदार्थांबाबत सांगणार आहोत. ज्यांच्या मदतीने तुम्हाला वजन कमी करण्यासोबतच हेल्दी राहण्यासही मदत होते. 

1. ओट्स इडली 

इडली आरोग्यासाठी फायदेशीर ठरते हे आपण सगळेच जाणतो. पण ही इडली ओट्सची असेल तर मग अनेक आरोग्यदायी फायदे. जर तुम्ही सकाळी ऑफिससाठी लवकर जात असाल आणि नाश्ता करण्यासाठी अजिबात वेळ नसेल तर तुम्ही झटपट होणारी ओट्स इडली खाऊ शकता. ओट्ससोबत तुम्ही काही हेल्दी भाज्या एकत्र करून इडली तयार करू शकता. ओट्स इडली चटणी किंवा दह्यासोबतही खाऊ शकता. यामुळे तुमची पचनक्रिया सुरळीत राहिल. तसेच वाफेवर शिजवण्यात आलेली ही इडली खाल्यामुळे वजनही नियंत्रणात राहण्यास मदत होते. 

2. दलिया

दलिया प्रोटीन्सचा उत्तम स्त्रोत समजला जातो. सकाळी उठून नाश्ता तयार करण्यासाठी तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही दलिया तयार करू शकता. तसं पाहायला गेलं तर दलिया दोन प्रकारे तयार केला जातो. जर तुम्ही दूधासोबत दलिया तयार करणार असाल तर साखरेऐवजी मधाचा वापर करा. तसेच मसाल्यांसोबत दलिया तयार करणार असाल तर त्यामध्ये मसाल्यांचा वापर कमीच करून भाज्यांचा समावेश करा. 

3. सोया उत्तपम

सोयापासून उत्तपम तयार केला जातो. हा पदार्थ फक्त खाण्यासाठीच टेस्टी नसतो तर आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर ठरतो. हाय प्रोटीनसोबतच हा उत्तपम वजन निंत्रित ठेवण्यासाठीही मदत करतो. 

4. बेसनाचा पोळा 

बेसनाचा पोळा सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट ठरतो. दिवसभरासाठी एनर्जी देण्यासोबतच भरपूर प्रोटीन देण्यासाठीही मदत करतो. हा पदार्थ तुम्ही ऑफिसमध्ये लंचसाठीही घेऊन जाऊ शकता. फक्त तयार करताना जास्त तेलाचा वापर करणं टाळा. 

(टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.) 

Web Title: Healthy diet tips healthy breakfast list for energy blood weight loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.