HEALTH : ​मुलांच्या डोळ्यांची काळजी घेताना!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2017 10:08 AM2017-03-25T10:08:52+5:302017-03-25T15:42:30+5:30

मुलांच्या दृष्टीदोषाच्या समस्या वाढताना दिसत आहेत. आपल्या घरीही लहान मुले असतील आणि त्यांची वेळीच काळजी घेणे गरजेचे आहे.

HEALTH: While taking care of the eyes of the children! | HEALTH : ​मुलांच्या डोळ्यांची काळजी घेताना!

HEALTH : ​मुलांच्या डोळ्यांची काळजी घेताना!

ong>-Ravindra More
बदलती जीवनशैलीचा परिणाम लहान मुलांच्या आरोग्यावरही होताना दिसत आहे. तेही मोबाइल, टीव्ही मध्ये व्यस्त होत असल्याने याचा परिणाम थेट त्यांच्या डोळ्यांवर होत आहे. अशा विविध कारणांमुळे  त्यांच्या दृष्टीदोषाच्या समस्या वाढताना दिसत आहेत. आपल्या घरीही लहान मुले असतील आणि त्यांची वेळीच काळजी घेणे गरजेचे आहे. 

काय काळजी घ्याल?
आपल्या मुलाच्या डोळ्यांची तपासणी दर सहा महिन्यांनी व्हायलाच हवी. विशेष म्हणजे शाळेत पाठविण्याअगोदर तर डोळ्यांची तपासणी सक्तीने व्हायलाच हवी. शिवाय मुलांच्या डोळ्यांवर अतिरिक्त ताण येऊ नये म्हणून त्यांना जास्त वेळ टीव्ही समोर बसू देऊ नये. तसेच त्यांना शांत झोप लागेल याचीही काळजी घेणे गरजेचे असते. मुले बाहेरुन खेळून किंवा शाळेतून आल्यावर डोळे पाण्याने स्वच्छ करण्यास सांगा व या सवयीचे त्यांना महत्त्व पटवून द्या. मुलांचे डोळे लाल होत असतील आणि ते सतत डोळे चोळत असतील तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. घरीच उपचार करू नका. तसेच चष्मा वापरत असेल तर चष्म्यावर ओरखडे किंवा डाग असतील तर तसाच वापरू देऊ नका. मुलांना चष्मा नेहमी स्वच्छ ठेवण्यास सांगा. टीव्ही बघत असताना किंवा वाचत असताना प्रकाश खूप जवळ नसेल, याची खात्री करून घ्या.
मंद प्रकाशाचा वापर करू नका. या सर्व काळजीबरोबरच पोषणतत्त्वयुक्त आहार घेण्यालाही आपण तितकेच महत्त्व दिले पाहीजे. डोळ्यांच्या आरोग्यासाठी व्हिटॅमिन ए, सी, बीटा केरॉटीन, सेलेनियम आणि इतर पोषणद्रव्यांचा आहारात प्रामुख्याने समावेश असावा. तसेच गाजर, पालेभाज्या, पपई आणि द्राक्षे खाण्यास मुलांना जास्तीत जास्त प्रोत्साहन द्या.

Web Title: HEALTH: While taking care of the eyes of the children!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.