तुम्हाला माहीतही नसतील बटाट्याच्या सालीचे 'हे' फायदे; वाचाल तर फेकण्याआधी १० वेळा विचार कराल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2021 07:00 PM2021-02-06T19:00:27+5:302021-02-06T19:16:14+5:30

बटाटा घरी भाजीसाठी कापतो तेव्हा त्याचं साल आपण फेकून देतो. पण यापुढे असं न करणंच फायद्याचं ठरेल बटाट्याच्या सालीचा वापर करून तुम्ही अनेक आजारांपासून सुटका मिळवू शकता.

Health Tips : Not only potato its peel also has health and skin advantages | तुम्हाला माहीतही नसतील बटाट्याच्या सालीचे 'हे' फायदे; वाचाल तर फेकण्याआधी १० वेळा विचार कराल

तुम्हाला माहीतही नसतील बटाट्याच्या सालीचे 'हे' फायदे; वाचाल तर फेकण्याआधी १० वेळा विचार कराल

googlenewsNext

सगळ्यांच्याच घरी बटाट्याचा मोठया प्रमाणावर वापर केला जातो. जरी लठ्ठपणा, गॅस यांमुळे काही लोक बटाट्याचे पदार्थ टाळत असतील तर कोणत्या ना कोणत्या पदार्थाच्या माध्यमातून शरीरात बटाटा जातोच. आज आम्ही तुम्हाला बटाट्याच्या सालीचा वापर  करून कशापध्दतीने आरोग्य कसं नीट ठेवता येईल हे  सांगणार आहोत.  बटाट्याच्या सालीचा वापर करून तुम्ही आपलं शरीर चांगलं ठेवू शकता. बटाटा घरी भाजीसाठी कापतो तेव्हा त्याचं साल आपण फेकून देतो. पण यापुढे असं न करणंच फायद्याचं ठरेल बटाट्याच्या सालीचा वापर करून तुम्ही अनेक आजारांपासून सुटका मिळवू शकता.  जाणून घेऊया कसा करायचा बटाट्याच्या सालीचा वापर.

हृदयासाठी फायदेशीर

पोटॅशियमचीचे प्रमाण जास्त असल्यामुळे हदृयाशी निगडीत आजारांपासून  सुटका मिळवता येऊ शकते.  यात ओमेगा-३ फॅट्स असतात त्यामुळे हृदय निरोगी राहण्यास मदत होते. तसंच बटाट्याची साल पायांच्या तळव्यांना घासल्यानंतर उष्णता कमी होण्यास मदत होते.

 त्वचा आणि केसांसाठी

बटाट्याचा रस चेहऱ्यावर चोळल्यास चेहरा उजळतो.  डोळ्यांच्या खालची वर्तुळं निघून जाण्यासाठी बटाटा फायदेशीर ठरतो. बटाटाच्या साली केसांवर चोळून काही मिनिटांनी धुवावेत, असं नियमित केल्यास केस वाढीला चालना मिळते. बटाट्याच्या सालीला वाटून त्वचेवर काहीवेळ मसाज हलक्या हाताने मसाज करा. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. यामुळे त्वचा साफ होण्यासाठी फायदेशीर ठरत असतं.अर्ध्या बटाट्याच्या रसात  एका अंड्याचा पांढरा भाग मिक्स करून मिश्रण बनवून घ्या. चेहरा आणि मानेवर अर्धा तास लावून ठेवा.  काहीवेळानंतर चेहरा कोमट पाण्याने धुवून टाका. त्यामुळे त्वेचवरील डाग निघून जाण्यास मदत होईल.

बटाट्याची साल काढून तुकड्यांमध्ये कापून घ्या आणि त्यांच्या मदतीने संपूर्ण चेहऱ्यावर ५ ते १० मिनिटांसाठी मालिश करा. असं केल्याने हळूहळू स्किन टोन लाइट होतो. बटाट्याच्या सालीचा रस करून तो रस संपूर्ण त्वचेला लावल्यानंतर सुद्धा टॅनिंग कमी होत असतं. 

उर्जा मिळते

बटाट्यात  व्हिटॅमिन बी-३ असते.  हा घटक कार्बोहायड्रेटचं रूपांतर ऊर्जेत करतो ज्यामुळे तुमच्या शरीराला विविध कार्य करण्यास ऊर्जा मिळते. तसंच या घटकामुळे नव्या पेशींचीही निर्मिती होते आणि स्ट्रेसमुळे पेशींना होणाऱ्या हानीपासून बचाव होतो. कमी वयात सांधेदुखी अन् हाडं खराब होण्यासाठी कारणीभूत ठरतात 'या' ५ गोष्टी, वेळीच जाणून घ्या

कॉलेस्ट्रॉल नियंत्रण

बटाट्याच्या सालीत मोठ्या प्रमाणावर फायबरर्स असतात.  त्यामुळे कॉलेस्ट्रोल कमी होण्यास मदत होते. लाल रक्तपेशींची कमतरता असणे यास एनिमिया म्हणतात. शरीरात आयर्नची मात्रा कमी असल्यास एनिमिया होतो. बटाटा सालीसकट खाल्ल्यास तुमच्या शरीरात आयर्नचं प्रमाण वाढतं. तुम्हाला माहीतही नसतील नारळ पाण्याचे  हे ७ दुष्परिणाम; डॉक्टरांनी सांगितली सेवनाची योग्य वेळ

(टिप : वरील सर्व उपाय आम्ही माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. आम्ही यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक असतं.)

Web Title: Health Tips : Not only potato its peel also has health and skin advantages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.