'या' ६ आजाराचं कारण ठरू शकतात थंड तळवे आणि पिवळी नखं; दुर्लक्ष करणं पडेल महागात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2021 11:13 AM2021-02-19T11:13:50+5:302021-02-19T11:20:53+5:30

Feet health from cracked heels : तळव्यांच्या कोणत्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास गंभीर आजारांचा सामना करावा लागू शकतो याबाबत सांगणार आहोत.

Health Tips in Marathi : Feet health from cracked heels to bunions never ignore these symptoms | 'या' ६ आजाराचं कारण ठरू शकतात थंड तळवे आणि पिवळी नखं; दुर्लक्ष करणं पडेल महागात

'या' ६ आजाराचं कारण ठरू शकतात थंड तळवे आणि पिवळी नखं; दुर्लक्ष करणं पडेल महागात

googlenewsNext

तुमच्या पायांच्या तळव्यांवरून अनेक आजारांबाबत उलगडा होऊ शकतो. बूट आणि मोजे  सतत पायात असल्यामुळे अनेकजण पायांकडे लक्ष देत नाहीत.  पायांमध्ये दिसणारी सामान्य लक्षणं गंभीर आजारांचे कारण ठरू शकतात. आज आम्ही तुम्हाला तळव्यांच्या कोणत्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास गंभीर आजारांचा सामना करावा लागू शकतो याबाबत सांगणार आहोत.

फाटलेल्या टाचा

साधारणपणे फाटलेल्या टाचा बाम किंवा एखादी क्रिम लावल्यानं ठीक होतात. ऑस्ट्रेलियाच्या फुटकेअर ब्रॅण्ड फ्लेक्सिटोजच्या तज्ज्ञांनी द सन बेवसाईटशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार लोक अनेकदा फाटलेल्या टाचांकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे वेदनांचा सामना करावा लागू शकतो. काहीवेळा टाचा आतून फाटू लागतात किंवा रक्त बाहेर येतं. एक्सपर्ट्सनी दिलेल्या माहितीनुसार पायांचा संपर्क सरळ जमिनीशी येत असतो. त्यामुळे जमिनीवरील बॅक्टेरीया फाटलेल्या टाचांमध्ये जाण्याची शक्यता असते. त्यामुळे संक्रमणाचा धोका वाढतो.  डायबिटीस असलेल्यांना या  आजाराचा धोका जास्त  असतो. 

फुट कॉर्न

फुट कॉर्नला गोखरू असंही म्हणतात.  ही एकाप्रकारची गाठ असते. साधारणपणे घट्ट मोजे वापरल्यामुळे  ही समस्या उद्भवते. पोडियाटिस्ट्र डॉक्टर दीना गोहील यांनी मेल ऑनलाईनशी बोलताना सांगितले की, गोखरू हे आहे, म्हणून त्यांनी घट्ट बूट न वापरण्याचा सल्ला दिला आहे. ज्यामध्ये पायांना व्यवस्थित मोकळी जागा मिळेल असे बुट वापरायला हवेत. 

कॉलस

गोखरूप्रमाणे कॉलससुद्धा घट्ट बुट वापरल्यामुळे उद्भवते. याव्यतिरिक्त  हाडांमधील वेदना, लठ्ठपणा आणि  डायबिटीसच्या समस्या यामुळे उद्भवू शकतात. त्यामुळे त्वचेतही वेदना जाणवतात. त्यामुळे पाठीच्या खालच्या भागात गुडघेदुखीचा सामना करावा लागू शकतो. 

थंड तळवे

अनेकांचे पायाचे तळवे थंड असतात. त्यांनी आपल्या पायांना गरम कपडे म्हणजेच मोज्यांनी झाकायला  हवं.  हेल्थ एक्सपर्ट्सनी दिलेल्या माहितीनुसार तळवे थंड पडणं रेनॉड या आजाराचं लक्षण असू शकतं.  याचा परिणाम रक्तप्रवाहावर होत असतो. Health Tips : तुम्हीही घाईघाईने आणि उभं राहून जेवण करता का? वेळीच व्हा सावध नाही तर....)

पायांना सूज येणं

साधारणपणे पायांना आलेली सूज आपोआप बरी होते.  जर ही समस्या बरी झाली नाही तर एडिमाची समस्या असू शकते.  वेळीच तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला हवा. एडिमामध्ये  पायांमध्ये फ्लूईड जास्त वाढल्यामुळे  सूज येते.

नखं  पिवळी पडणं

जर तुमची नखं पिवळी पडत असतील तर फंगल इन्फेक्शन असू शकतं.  सतत नेलपेंट लावल्यामुळेही अनेकांची नखं पिवळी पडतात. अशा स्थितीत नखं तुटू लागतात, अनेकदा यांचा आकारही बदलतो आणि वेदना होतात अनेकदा कॅन्सरचाही सामना करावा लागू शकतो.  Rice and Obesity : तुमचं वजन वाढण्याला भात जबाबदार आहे का? जाणून घ्या काय आहे सत्य...

Web Title: Health Tips in Marathi : Feet health from cracked heels to bunions never ignore these symptoms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.