डायबिटीसप्रमाणे इतर अनेक समस्यांवर फायदेशीर ठरते तुळस; असं करा सेवन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2019 11:26 AM2019-11-07T11:26:34+5:302019-11-07T11:27:07+5:30

आपल्या हिंदू धर्मात तुळशीला फार महत्त्व आहे. तसेच आयुर्वेदातही तुळशीचे अनेक फायदे सांगण्यात आले आहेत. अ‍ॅन्टी-बॅक्टेरियल तुळस डेंग्यू, व्हायरल फिवरपासून त्वचेच्या समस्यांवरही फायदेशीर ठरते.

health and beauty benefits of basil or tulsi | डायबिटीसप्रमाणे इतर अनेक समस्यांवर फायदेशीर ठरते तुळस; असं करा सेवन

डायबिटीसप्रमाणे इतर अनेक समस्यांवर फायदेशीर ठरते तुळस; असं करा सेवन

googlenewsNext

आपल्या हिंदू धर्मात तुळशीला फार महत्त्व आहे. तसेच आयुर्वेदातही तुळशीचे अनेक फायदे सांगण्यात आले आहेत. अ‍ॅन्टी-बॅक्टेरियल तुळस डेंग्यू, व्हायरल फिवरपासून त्वचेच्या समस्यांवरही फायदेशीर ठरते. तुळशीच्या मुळांपासून तुळशीच्या बियांपर्यंत सर्व गोष्टी आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. आरोग्याच्या विविध समस्या दूर करण्यासाठी तुळस मदत करते. तसेच तुळशीचा काढाही आरोग्याच्या समस्या दूर करण्यासाठी मदत करतो. आज आम्ही तुम्हाला तुळशीच्या काही फायद्यांबाबत सांगणार आहोत. 

कसं कराल तुळशीचं सेवन? 

तुळस चहामध्ये टाकून त्याचा काढा तयार करून पिणं आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. याव्यतिरिक्त तुळशीची पानं कच्ची, पावडर करून किंवा त्याची पेस्ट तयार करून खाल्यानेही फायदा होतो. 

जाणून घेऊया तुळशीचे फायदे : 

डायबिटीजमध्ये फायदेशीर 

तुळशीचा काढा  किंवा चहा तयार करून प्यायल्याने शुगर लेव्हल कंट्रोलमध्ये राहते. त्यामुळे डायबिटीज असणाऱ्यांसाठी तुळश अत्यंत फायदेशीर ठरते. 

ताप आणि सर्दी-खोकला 

तुळशीची पानं, आलं आणि जेष्ठमध बारिक करून त्यामध्ये मध एकत्र करून खा. त्यामुळे ताप, डोकेदुखी, घशात होणारी खवखव, सर्दी, खोकला यांसारख्या समस्या दूर होतात. 

किडनी स्टोन

तुळशीच्या पानांच्या अर्कात मध एकत्र करून प्यायल्याने किडनी स्टोनची समस्या दूर होते. त्याचबरोबर क्रॉनिक ब्रॉन्कायटिस, अस्थमा यांसारख्या श्वासाशी निगडीत आजारांवरही फायदेशीर ठरतो. 

बॉडी डिटॉक्स

तुळस एक नैसर्गिक डिटॉक्सीफाइंग, क्लिंजिंग आणि प्यूरिफाइंग एजंट आहे. ज्यामुळे शरीरातील सर्व विषारी तत्व बाहेर काढण्यास मदत होते. यामुळे तुम्ही अनेक समस्यांपासून बचाव करू शकता. त्याचबरोबर लिव्हर डिटॉक्स करण्यासाठीही तुळस मदत करते. 

तणाव करते दूर 

दररोज तुळशीच्या 10 ते 12 पानांचं सेवन करा. यामुळे शरीराची रोगप्रतिकार शक्ती मजबुत होण्यास आणि तणाव कमी होण्यास मदत होते. 

दातांच्या समस्या 

दातांशी संबंधित समस्या जसं, सूज, कॅव्हिटी, हिरड्यांच्या समस्या यांवर तुळशीचं सेवन फायदेशीर ठरतं.


 
मलेरिया व डेंगू

तुळश हेपेटाइटिस, मलेरिया, टीबी, डेंगू आणि स्वाइन फ्लू सारख्या आजारांमध्ये फायदेशीर ठरते. 

अनियमित पीरियड्स

तुळशीच्या बिया पाण्यात उकळून दररोज सकाळी त्याचं सेवन करा. यामुळे अनियमित पीरियड्सची समस्या दूर होते. 

हृदयाचं आरोग्य राखण्यासाठी 

तुळस कोलेस्ट्रॉल लेव्हल कंट्रोलमध्ये ठेवतं. ज्यामुळे हृदयाचं आरोग्य राखण्यासाठी मदत करतं. तुळशीची पानं हृदयासाठी एका टॉनिकच्या स्वरूपात काम करतात. 

हाडांच्या मजबूतीसाठी 

कॅल्शिअम मुबलक प्रमाणात असल्यामुळे तुळशीची पानं हाडांच्या मजबूतीसाठी फायदेशीर ठरतात. त्याचबरोबर यामध्ये एनलजेसिक इफेक्ट असतो. जो वेदना आणि सूज दोन्ही कमी करण्यासाठी मदत करतो. 

पिंपल्सपासून सुटका 

तुळशीची पानं वाटून पिंपल्सवर 20 मिनिटांपर्यंत लावा आणि त्यानंतर ताज्या पाण्याने धुवून टाका. यामध्ये असणारी अ‍ॅन्टी-इफ्लेमेट्री आणि अ‍ॅन्टी-बॅक्टेरियल गुणधर्म पिंपल्सची समस्या दूर करतात. 

अ‍ॅन्टी-एजिंगची समस्या 

तुळशीच्या पानांची पेस्ट तयार करून चेहऱ्यावर 10 ते 15 मिनिटांसाठी लावा आणि त्यानंतर ताज्या पाण्याने धुवून घ्या. नियिमितपणे याचा वापर केल्याने अॅन्टी-एजिंगची समस्या दूर होते. 

केसांसाठी ठरतं वरदान 

तुळशीची काही पानं वाटून त्यामध्ये खोबऱ्याचं तेल आणि ऑलिव्ह ऑइल एकत्र करून स्काल्पवर लावा. आठवड्यातून 2 वेळा हा फेसपॅक वापरा. त्यामुळे केस मजबुत आणि शायनी होण्यासोबतच स्काल्प इन्फेक्शन, डँड्रफ यांसारख्या समस्या दूर होतात. 

(टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत असून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.)

Web Title: health and beauty benefits of basil or tulsi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.