हॉट आणि स्लिम फिगरसाठी मलायका अरोरा सांगतेय खास फिटनेस फंडा!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2020 11:45 AM2020-01-14T11:45:01+5:302020-01-14T11:47:22+5:30

आपण सगळेच आरोग्यापेक्षा दिसण्याच्या बाबतीत खूप जागरूक असतो.

Fitness tips from Malaika Arora for a slim figure | हॉट आणि स्लिम फिगरसाठी मलायका अरोरा सांगतेय खास फिटनेस फंडा!

हॉट आणि स्लिम फिगरसाठी मलायका अरोरा सांगतेय खास फिटनेस फंडा!

Next

आपण सगळेच आरोग्यापेक्षा दिसण्याच्या बाबतीत खूप जागरूक असतो.  जीवशैलीतील वेगवेगळे बदल आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि अपुरी झोप यांमुळे नेहमीच वजन वाढण्याची समस्या उद्भवत असते. प्रत्येकवेळा जीमला जायला वेळ मिळतोच असं नाही. अनेकजण वजन आणि फॅट कमी करण्यासाठी जीमला जाण्याचा विचार करतात. पण  अनेकदा जीमचे पैसे भरलेले असून सुद्धा वेळेअभावी जायला मिळत नाही. महिलांच्या बाबतीत हे जास्त दिसून येते.  पण इतके सगळे उद्योग करण्यापेक्षा जर तुम्ही  घरच्याघरी स्वतःसाठी  थोडासा वेळ काढून व्यायाम केला तर  वजन कमी करण्याची तुमची समस्या दूर होऊ शकते. 

फिटनेसची क्विन असलेल्या मलायका अरोराने  दिलेल्या काही टिप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. मलायका अरोरा ही नेहमीच तिच्या परफेक्ट जीम लुक आणि फिगरमुळे चर्चत असते. वाढत्या वयात सुद्धा मलायका अरोराने स्वतःला ज्या पध्तीने मेन्टेंन ठेवले आहे. त्यामुळे नेहमीच मलायका हॉट लुक सगळ्यांनाच घायाळ करणारा असतो. (हे पण वाचा-धक्कादायक! प्लास्टिक सर्जरी फेल झाल्याने २८ वर्षीय महिलेला गमवावे लागले दोन्ही ब्रेस्ट!)

malaikasmondaymotivation  या इंस्टाग्राम अकाउंटवरून मलायकाने आपले फोटो शेअर केले आहेत. यात मलायका योगा करताना दिसत आहे. यात मलायकाने स्टेप बाय स्टेप योगासन करण्याची पध्दत सांगितले आहे.  त्यासाठी सगळ्यात आधी जमिनीवर झोपा. मग आपल्या पायांना स्ट्रेच करा.  पाय असे स्ट्रेस व्हायला हवेत की  आपली पायांची बोटं जमीनीला टेकायला हवीत.  आपली छाती  आणि बोटंसुध्दा पसरवण्याचा प्रयत्न करा.  त्यानंतर श्वास घ्या. हातांवर जोर देऊन  स्वतःला वरच्या बाजूला  ढकलण्याचा प्रयत्न करा. या स्थितीत असताना तुमचे हात आणि कोपर सरळ रांगेत असायला हवे. शक्य असल्यास पोट आणि मांड्यांना सुद्धा वर उचलण्याचा प्रयत्न  करा. ज्यामुळे तुम्हाला कंम्फरटेबल वाटेल. 

Image result for malaika arora gym wear

मलायका हा योगासनाचा प्रकार दाखवत असताना असं सांगते की  या योगासनामुळे  तुमची छाती, फुप्फुसं आणि खांदे स्ट्रेच होतात. ही एक सुपरपोज आहे. ज्यामुळे तुम्ही या वर्षी बारीक होण्यासाठी प्रयत्न केल्यास बारीक होऊ शकता.

Image result for gym malaika arora workout
Image result for gym malaika arora workout

उर्ध्व मुख श्वानासनाचे फायदे

शरीराला आकार आकर्षक होतो.  

 छाती आणी मांड्यांच्य स्नायूंसाठी फायदेशीर.

हात आणि मनगट मजबूत होतात.

 थकवा आला असेल तर ताजेतवाने वाटते.

स्पाईन आणि पाठीचे मणके मजबूत होतात.

शरीरात रक्तवाहीन्या सक्रिया होतात त्यामुळे रक्ताभिसण सुरळीत होते. 

Web Title: Fitness tips from Malaika Arora for a slim figure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.