कोरोनापासून वाचवणार सुर्याची जादुई 'ढाल'; वैज्ञानिकांनी बनवला मॅग्नेटिक फील्डचा नकाशा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2020 05:16 PM2020-08-27T17:16:19+5:302020-08-27T17:31:44+5:30

CoronaVirus News & latest Updates : कोरोनामुळे येणारं वादळ आणि रेडिएशन्स योग्य पद्धतीने मोजून पृथ्वीच्या चारहीं बाजूंना पसरत असलेल्या तरंगांपासून वाचण्यास मदत मिळेल. 

First ever map of solar corona magnetic field | कोरोनापासून वाचवणार सुर्याची जादुई 'ढाल'; वैज्ञानिकांनी बनवला मॅग्नेटिक फील्डचा नकाशा

कोरोनापासून वाचवणार सुर्याची जादुई 'ढाल'; वैज्ञानिकांनी बनवला मॅग्नेटिक फील्डचा नकाशा

Next

(Image Credit- Nasa)

पहिल्यांदाच  तज्ज्ञांनी सुर्याच्या चुंबकीय क्षेत्राचा संपूर्ण नकाशा तयार केला आहे. या यशामुळे अनेक  फायदे होणार आहेत.  सुर्याच्या मॅग्नेटिक फील्डची योग्य माहिती  या माध्यमातून मिळू शकेल. याशिवाय कोरोना आणि सुर्याच्या बाहेरील आवरणातून बाहेर येत असलेल्या घातक किरणांपासून बचाव होईल. कोरोनामुळे येणारं वादळ आणि रेडिएशन्स योग्य पद्धतीने मोजून पृथ्वीच्या चारहीं बाजूंना पसरत असलेल्या तरंगांपासून वाचण्यास मदत मिळेल. 

First Ever Map of Solar Corona Magnetic Field

सुर्याच्या बाहेरील बाजूस कोरोनामुळे होत असलेल्या बदलांमुळे निर्माण होणारे सोलर रेडिएशन्स आणि विस्फोटोंमुळे पृथ्वीवर होत असलेल्या नुकसानांचा अंदाज लावला जात होता. अखेर वेगवेगळ्या देशातील वैज्ञांनिकांनी सोलर डायनेमिक्स निरिक्षणाअंतर्गत  मॅग्नेटिक फील्डचा पूर्ण नकाशा तयार केला आहे. सुर्याच्या चारही बाजूंनी मॅग्नेटिक फील्ड ३५ हजार किलोमीटरपासून  २.५० लाख  किलोमीटरपर्यंतचे प्रभावी मॅपिंग केलं जात आहे. 

First Ever Map of Solar Corona Magnetic Field

द सायंस जर्नलमध्ये ७ ऑगस्टला हा  रिपोर्ट प्रकाशित करण्यात आला होता. नासाच्या वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनसार सध्याच्या काळात सॅटेलाईट्सवर आधारित जास्तीत जास्त काम केले जातात. म्हणून हा नकाशा गरजेचा आहे. मोबाइल, टीवी, जीपीएस, डिफेंस, कृषी आणि वाहतूक व्यवस्थेशी निगडीत कामं याद्वारे केली जातात. कोरोनामुळे होत असलेल्या बदलांमुळे रेडिएशन्समध्ये बाधा निर्माण होते. या नकाशामुळे रेडिएशन्समध्ये बाधा येणं रोखलं जाऊ शकतं. वैज्ञानिक यावर अधिक संशोधन करत आहेत. 

First Ever Map of Solar Corona Magnetic Field

सुर्याची बाहेरील बाजू कोरोना प्लाज्माप्रमाणे असते.  यात इलेक्ट्रॉन्सची संख्या कमी अधिक असल्यामुळे सुर्यावर मोठे आघात होतात. यामुळे सौर वादळ मोठ्या प्रमाणात रेडिएशन्ससह पृथ्वीच्या दिशेनं येतात. त्यामुळे सूर्याच्या मॅग्नेटिक फील्ड्ला नुकसान पोहोचतं. वर्ष १८८९ मध्ये कॅनडाच्या क्यूबेकमध्ये जे ब्लॅक आऊट झाले होते. सूर्यातील विस्फोट आणि त्यातून बाहेर येत असलेले रेडिएशन्स, सौर वादळामुळे कॅनडात अशी स्थिती उद्भवली होती. 

हे पण वाचा-

युद्ध जिंकणार! रशियाकडून कोरोना लसीबाबत गुड न्यूज; लसीकरण पुढच्या महिन्यात सुरू होणार? 

स्तनाच्या कर्करोगाचा उपचार कालावधी केवळ तीन महिने; टाटा रुग्णालयाचा अभ्यास अहवाल

Web Title: First ever map of solar corona magnetic field

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.