झोपण्यापूर्वी एक्सरसाइज करणं चांगलं की वाईट?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2019 08:30 AM2019-09-05T08:30:55+5:302019-09-05T08:37:06+5:30

शरीर मजबूत ठेवण्यासाठी नियमित एक्सरसाइज करणं फायदेशीर असतं. अनेकांना असं वाटतं आणि सल्ला दिला जातो की, एक्सरसाइज करण्याची एक ठराविक वेळ असते.

Exercising before going to sleep is good or bad | झोपण्यापूर्वी एक्सरसाइज करणं चांगलं की वाईट?

झोपण्यापूर्वी एक्सरसाइज करणं चांगलं की वाईट?

Next

(Image Credit : .lifealth.com)

शरीर मजबूत ठेवण्यासाठी नियमित एक्सरसाइज करणं फायदेशीर असतं. अनेकांना असं वाटतं आणि सल्ला दिला जातो की, एक्सरसाइज करण्याची एक ठराविक वेळ असते. ज्यामुळे जास्त फायदा मिळतो. त्यामुळे अनेकजण रात्री किंवा झोपण्यापूर्वी एक्सरसाइज करण्यास नकार देतात. मात्र, झोपण्यापूर्वी एक्सरसाइज करणे योग्य की अयोग्य, हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी माहीत असायला हव्या. चला जाणून घेऊ काही गोष्टी...

झोपण्यापूर्वी एक्सरसाइजची माहिती

(Image Credit : blog.myfitnesspal.com)

झोपण्यापूर्वी थोडी एक्सरसाइज करणं शरीरासाठी फायदेशीर असतं. पण अनेकांना असं वाटतं की, असं केल्याने झोपेवर नकारात्मक प्रभाव पडतो. पण हा समज चुकीचा आहे. उलट एक्सरसाइज केल्याने मेंदूत कोर्टिसोल या स्ट्रेस हार्मोनचं प्रमाण कमी होतं आणि तुम्हाला चांगली झोप लागते. त्यासोबतच एक्सरसाइज केल्याने शरीरात एड्रेनालाइन आणि नॉनएड्रेनालाइनची निर्मिती होते. ज्यामुळे हृदयाची गती वाढते. याने शरीराला अन्न व्यवस्थित पचवण्यासही मदत मिळते.

झोपण्यापूर्वी एक्सरसाइजसाठी वेळेची निवड

(Image Credit : www.independent.co.uk)

एक्सरसाइज करण्याची योग्य वेळ ही व्यक्तीच्या जीवनशैलीवर अवलंबून असते. पण झोपण्याच्या एक तासापूर्वी एक्सरसाइज करावी. त्यासोबतच याचीही काळजी घ्यावी की, जेवल्यावर लगेच एक्सरसाइज करू नये, आहार पोटात स्थिर होण्यासाठी वेळ द्यावा. असं केल्यास उलटी किंव पोटात दुखण्याची समस्या होऊ शकते. म्हणजे तुमची झोपण्याची वेळ जर १० वाजता असेल तर ९ वाजता एक्सरसाइज पूर्ण करा.

झोपण्यापूर्वी कोणती एक्सरसाइज करावी?

(Image Credit : myactivesg.com)

झोपण्यापूर्वी एक्सरसाइजची निवड करण्यासाठी तुम्हाला रात्रीच्या जेवणाचा विचार करावा लागेल. जर तुम्ही जेवणानंतर एक्सरसाइज करणार असाल तर तुम्ही वॉकिंग किंवा हलकी कोणतीही एक्सरसाइज करा. पण या एक्सरसाइज पोटावर फार भार पडू नये किंवा तुम्हाला फार जास्त स्ट्रेच करावं लागू नये. जर तुम्हाला हेवी एक्सरसाइज करायची असेल तर रात्रीच्या जेवणाआधीच करावी.

(टिप : वरील लेखात देण्यात आलेले सल्ले आणि उपाय हे केवळ माहिती म्हणून देण्यात आले आहेत. ही सामान्य माहिती आहे. प्रत्येक व्यक्तीची शरीर रचना वेगळी असते. त्यामुळे प्रत्येकाला सारखेच नियम लागू होतील असं नाही. अशात तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच एक्सरसाइज फॉलो करा.)

Web Title: Exercising before going to sleep is good or bad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.