कोरोना व्हायरसनंतर आता 'या' जीवघेण्या व्हायरसचा धोका; WHO ने दिल्या सुचना

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2020 10:30 AM2020-06-07T10:30:11+5:302020-06-07T10:40:06+5:30

संक्रमित असलेल्या व्यक्तीच्या  शरीरातून निघत असलेल्या तरल पदार्थांमुळे इतरांना या व्हायरसचं संक्रमण होतं.

Ebola virus dr congo declares new ebola outbreak hit already by coronavirus and measles epidemic | कोरोना व्हायरसनंतर आता 'या' जीवघेण्या व्हायरसचा धोका; WHO ने दिल्या सुचना

कोरोना व्हायरसनंतर आता 'या' जीवघेण्या व्हायरसचा धोका; WHO ने दिल्या सुचना

googlenewsNext

कोरोना व्हायरसमुळे जगभरात लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या माहामारीनंतर आता अजून एक धक्कादायक बाब समोर येत आहे. आणखी एका व्हायरसचं संक्रमण होण्याची शक्यता आहे. या व्हायरसचं नाव इबोला आहे. हा व्हायरस कांगोमध्ये पसरला असून WHO ने देखिल याबाबत सुचना दिल्या आहेत.

माध्यामांनी दिलेल्या माहितीनुसार कांगोमध्ये इबोला व्हायरसच्या ६ केसेस समोर आल्या आहेत. यापैकी ४ लोकांचा मृत्यू झाला आहे.  इबोला व्हायरसबाबत कांगोमधील आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार कांगो पश्चिमेतील शहर मबंडाकामध्ये या माहामारीची सुरूवात झाली आहे. तसंच २०१८ मध्ये इबोलाच्या केसेस समोर आल्या होत्या.

WHO चे प्रमुख टेड्रोस अधानोम गेब्रेयेसस यांनी सांगितले की,  कोरोना व्हायरस आणि इबोला यांचा आपापसात काहीही संबंध नाही. कांगोच्या आरोग्य मंत्रालयाकडून इबोला व्हायरसबाबत माहिती देण्यात आली आहे. कोरोना व्हायसरने आतापर्यंत ३ हजार लोकांना कागोंमध्ये संक्रमित केले आहे. ज्या शहरात इबोलाचे रुग्ण दिसून आले आहेत. त्या शहरात अद्याप कोरोनाचा एकही रुग्ण सापडलेला नाही.

इबोला व्हायरस आफ्रिकेच्या उष्णकटिबंधीय प्रदेशातील आजार आहे. व्हायरसने संक्रमित असलेल्या व्यक्तीच्या  शरीरातून निघत असलेल्या तरल पदार्थांमुळे इतरांना या व्हायरसचं संक्रमण होतं. या व्हायरसची लागण झाल्यास  ताप, मासपेशींमध्ये वेदना होणे, थकवा येणं, घश्यात वेदना होणं. अशी लक्षणं दिसून येतात. काही  रुग्णांना उलट्या होणं,  डायरियाची समस्या उद्भवते. काही स्थितीत रक्तस्त्रावसुद्धा होतो. असं झाल्यास मृत्यूचा धोका अधिक असतो. हा व्हायरस माणसांमध्ये प्राण्याच्या संपर्कात आल्यामुळे पसरतो. प्रामुख्याने वटवाघळाच्या संपर्कात आल्याने हा आजार पसरतो. 

कोरोना रुग्णांचे फक्त १० दिवसात उपचार होणार; 'या'औषधांच्या चाचणीचा पहिला टप्पा यशस्वी

CoronaVirus News : टक्कल असलेल्या पुरुषांना कोरोनाचा सर्वाधिक धोका; वेळीच व्हा सावध

Web Title: Ebola virus dr congo declares new ebola outbreak hit already by coronavirus and measles epidemic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.