रोज सकाळी अनाशापोटी खा 'हा' सुकामेवा...अपचन, वेट लॉस आणि आणखीही बरेच फायदे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2022 04:29 PM2022-05-20T16:29:54+5:302022-05-20T16:33:23+5:30

सुके अंजीर (Dry Fig) हा असाच बहुगुणी सुका मेवा (Dry Fruit) आहे. अंजिराची ताजी फळं सुकवून तयार केलेले सुके अंजीर अत्यंत गुणकारी असतात.

Eating soaked figs as soon as you wake up in the morning will have surprising benefits | रोज सकाळी अनाशापोटी खा 'हा' सुकामेवा...अपचन, वेट लॉस आणि आणखीही बरेच फायदे

रोज सकाळी अनाशापोटी खा 'हा' सुकामेवा...अपचन, वेट लॉस आणि आणखीही बरेच फायदे

googlenewsNext

जीवनशैलीतले बदल अनेक व्याधींना आमंत्रण देतात. बदललेल्या जीवनशैलीत (Lifestyle) आहार तर बदलतोच, शिवाय व्यायामाचाही अभाव असतो. खाण्यापिण्याच्या वेळा बदलत असतात. या सर्वांचा एकत्रित परिणाम शरीरावर आणि मनावरही होतो. भारतीय आहारात प्रत्येक पदार्थाचं खास वैशिष्ट्य आहे. त्याचे गुणधर्म आणि ऋतुमानानुसार त्याचे तब्येतीवर होणारे परिणाम यानुसार आपल्याकडे आहार ठरवला जातो. सुके अंजीर (Dry Fig) हा असाच बहुगुणी सुका मेवा (Dry Fruit) आहे. अंजिराची ताजी फळं सुकवून तयार केलेले सुके अंजीर अत्यंत गुणकारी असतात. त्याविषयीची सविस्तर माहिती देणारं वृत्त 'टाइम्स बुल'ने प्रसिद्ध केलं आहे. सुक्या अंजिरांचे शरीराला काय फायदे होतात, हे आपण जाणून घेऊया.

लठ्ठपणा कमी करण्यासाठी फायदेशीर
सकाळी रिकाम्या पोटी सुके अंजीर खाल्ले, तर ते फायदेशीर ठरतं. त्यात ए आणि बी व्हिटॅमिन, प्रथिनं, फायबर्स, तसंच भरपूर अँटीऑक्सिडंट्स (Antioxidants) असतात. वजन कमी करण्यासाठी त्याचा फायदा होतो. डाएट, योग, व्यायाम यांच्या जोडीला सुके अंजीर आहारात नियमितपणे ठेवले, तर लठ्ठपणा नक्कीच कमी होऊ शकतो.

पोट साफ होण्यावर रामबाण उपाय
जीवनशैली बदलाचा एक ठळकपणे जाणवणारा परिणाम म्हणजे पोट साफ न होण्याच्या वाढत्या तक्रारी. त्याचंच रूपांतर पुढे मूळव्याध (Constipation), फिशर, फिस्तुला अशा अवघड जागेच्या दुखण्यांमध्ये होतं. सुकं अंजीर हा त्यावरचा एक रामबाण उपाय ठरू शकेल. त्यातल्या फायबर्समुळे (Fibers) पोट साफ होण्यास मदत होते व अ‍ॅसिडिटीची समस्याही कमी होते. भरपूर फायबर्स असलेल्या फळांचं सेवन पोट साफ न होण्याच्या तक्रारीवर गुणकारी ठरतं.

रिकाम्या पोटी करा सेवन
सुक्या अंजिराचं सेवन रिकाम्यापोटी केल्यामुळे त्यातले अँटीऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वं शरीरात व्यवस्थित शोषली जातात. त्यामुळे शरीराला त्याचा अधिक फायदा मिळतो. अंजिरातले अँटीऑक्सिडंट्स आणि पोटॅशिअममुळे रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते. हृदयाचं कार्य सुरळीत राखण्यासाठीही अंजीर फायदेशीर असतात. हाडांच्या बळकटीसाठी आवश्यक असणारं कॅल्शिअम (Calcium) सुक्या अंजिरांत असतं. त्यामुळे सुके अंजीर खाल्ल्यानं हाडं मजबूत बनतात.

पोषणमूल्यांनी युक्त असलेला सुका मेवा आहारात असावा, असं डॉक्टर सांगतात. काजू, बदाम, बेदाणे, काळ्या मनुका आपण नेहमी खातो. त्यासोबत सुके अंजीरही आवर्जून खायला हवेत. सुके अंजीर वर सांगितल्याप्रमाणे सकाळी रिकाम्यापोटी खाता येतात. एरव्हीही खाऊ शकता. कोणाला नुसते सुके अंजीर खायला आवडत नसतील, तर सुक्या अंजिरापासून खीर, बर्फी असे काही पदार्थ तयार करता येऊ शकतात. मुलांना आवडतील असे मिल्कशेक, हलवा, अंजीर स्प्रेड आदी पदार्थही तयार करता येऊ शकतात. जीवनशैलीतले बदल काही वेळा अनिवार्य असतात; मात्र अशा वेळी आहार-विहारात ठरवून केलेले योग्य बदल शरीराचं नुकसान होऊ देणार नाहीत.

Web Title: Eating soaked figs as soon as you wake up in the morning will have surprising benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.