रात्री भूक लागल्यावर खा "हे" पदार्थ; वजन वाढण्याची चिंताही दूर अन् फायदेही अगणित...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2021 03:13 PM2021-05-07T15:13:14+5:302021-05-07T15:32:39+5:30

रात्रीची भूक कंट्रोल होत नाही. ...मग अशावेळी काय करावं? अजिबात चिंता करू नका...रात्रीच्या वेळी काय खाता येऊ शकतं? वाचा

Eat these foods when you are hungry at night, eliminate the worry of weight gain | रात्री भूक लागल्यावर खा "हे" पदार्थ; वजन वाढण्याची चिंताही दूर अन् फायदेही अगणित...

रात्री भूक लागल्यावर खा "हे" पदार्थ; वजन वाढण्याची चिंताही दूर अन् फायदेही अगणित...

Next

असं म्हणतात रात्री अपरात्री काही खाल्ल्यावर वजन वाढतं. म्हणून डाएटिशिअन पण रात्री कमी जेवण्याचा किंवा हलकफुलंक खाण्याचा सल्ला देतात. पण तरीही काही जणांना कंट्रोल होतच नाही. मग अशावेळी काय कराव.  अजिबात चिंता करू नका तुमच्यासाठी काही रात्री खाण्याच्या गोष्टी आहेत ज्याची यादीच आम्ही तुम्हाला देणार आहोत.

केळं : साधारणत: केळ्याने वजन वाढतं असा समज आहे. पण रात्री झोपण्यापुर्वी जर तुम्ही केळं खाल्लं तर त्यामुळे काहीही अपाय होत नाही की तुमचं वजन वाढत नाही. तुम्ही केळ्याची स्मुदीही खाऊ शकता.

योगर्ट किंवा दही : तुम्हाला दही खायला आवडत असेल तर रात्री तुम्ही एक वाटी दही खाऊ शकता. यामुळे तुमचं वजन वाढत तर नाहीच पण यामुळे तुम्ही आतून मजबूत होत जाता आणि तुमच्या पचनासंबधीच्या समस्याही दूर होतात.

पनीर : रात्रीच्या वेळी पनीर खाल्ल्याने तुमचे मेटॉबोलिज्म वाढते. फक्त पनीर झोपण्याआधी तीस मिनिटे खाणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्हाला झोपही चांगली लागते. वजन तर वाढत नाहीच.

कीवी : क जीवनसत्वयुक्त हे फळ आरोग्यासाठी उत्तम आहे. यात कॅलरीजही कमी असतात. त्यामुळे तुम्ही रात्रीच्यावेळीही वजन वाढण्याची चिंता न करता हे फळ खाऊ शकता. मात्र हे फळ ताजे खाणेच योग्य आहे.

ब्रेड आणि पीनट बटर : रात्री झोपताना तुम्ही ब्रेड अथवा पीनट बटर खाल्ले तर तुम्हाला झोपही चांगली येते आणि वजनही वाढत नाही.

मखाना : मखाना वेगवेगळ्या पद्धतीने खाल्ला जातो. रात्रीच्या वेळी तुम्ही मखाना स्नॅक्स म्हणून खाऊ शकता. 

त्यामुळे या गोष्टी खा...भूकही भागवा आणि वजन वाढण्याची चिंताही दूर ठेवा.

Web Title: Eat these foods when you are hungry at night, eliminate the worry of weight gain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.