रक्ताच्या कमतरतेमुळे दिसून येतात 'ही' लक्षणं; दुर्लक्षं केलत तर होतील गंभीर परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2019 11:55 AM2019-10-03T11:55:03+5:302019-10-03T11:57:04+5:30

नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे (NFHS) च्या एका रिपोर्टनुसार, भारतामध्ये 58.6 टक्के मुलं, 53.2 टक्के मुली आणि 50.4 टक्के गर्भवती महिला रक्ताची कमतरता म्हणजेच, एनिमिया सारख्या गंभीर आजाराने ग्रस्त आहेत.

Early signs and symptoms of iron deficiency or anemia in girls and women causes risk factors diet | रक्ताच्या कमतरतेमुळे दिसून येतात 'ही' लक्षणं; दुर्लक्षं केलत तर होतील गंभीर परिणाम

रक्ताच्या कमतरतेमुळे दिसून येतात 'ही' लक्षणं; दुर्लक्षं केलत तर होतील गंभीर परिणाम

Next

(फोटो : प्रातिनिधीक)

नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे (NFHS) च्या एका रिपोर्टनुसार, भारतामध्ये 58.6 टक्के मुलं, 53.2 टक्के मुली आणि 50.4 टक्के गर्भवती महिला रक्ताची कमतरता म्हणजेच, एनिमिया सारख्या गंभीर आजाराने ग्रस्त आहेत. एनिमिया एक अशी स्थिती आहे ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीच्या शरीरातील रेड ब्लड सेल्स काउंट कमी होतो किंवा हिमोग्लोबिन लेव्हल कमी होतो. शरीरात रक्तामधून ऑक्सिजन सर्व अवयवांपर्यंत पोहोचवला जातो. पण शरीरातील हिमोग्लोबिन लेव्हल कमी झाल्यामुळे ऑक्सिजन शरीरात पोहचू शकत नाही. महिलांसाठी सामान्य हिमोग्लोबिन 12 ग्रॅम प्रति डेसीलीटर आणि पुरूषांमध्ये 13 ग्रॅम असतं. 

रक्ताच्या कमतरतेची दिसून येणारी लक्षणं 

शरीरामध्ये रक्ताच्या कमतरतेमुळे तुम्हाला जास्त थकवा जाणवतो. तसेच हृदयाचे ठोक्यांमध्ये वाढ होणं, श्वास घेण्यास त्रास, डोकेदुखी, लक्ष न लागणं, चक्कर येणं, त्वचा पिवळी पडणं, पाय दुखणं, अल्सर, गॅस्ट्रिटिस, बद्धकोष्ट, विष्ठेतून रक्त येणं यांसारखी लक्षणं दिसून येतात. अशी लक्षणं दिसल्यावर त्वरित डॉक्टरांकडे तपासणी करणं आवश्यक असतं.
 
तरूण मुलींमध्ये रक्ताच्या कमतरतेची कारणं

तरूण मुलांच्या तुलनेमध्ये मुलींमध्ये एनिमियाचा धोका अधिक असतो. याची अनेक कारणं आहेत. पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे, महिलांना येणारी मासिक पाळी. याव्यतिरिक्त अनियमित जीवनशैली, आहार व्यवस्थित नसणं यांमुळेही रक्ताची कमतरता आढळून येते. सध्या अनेक मुली आयर्न असणारे पदार्थ जसं मांस, अंजी, कडधान्य यांसारख्या पदार्थांचं सेवन करत नाहीत. 

रक्ताच्या कमतरतपासून बचाव करण्यासाठी हे पदार्थ खा :

लोकमत न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, तुम्हाला आपल्या डाएटमध्ये शरीरातील आयर्नची पातळी वाढविणारे पदार्थ खाण्याची आवश्यकता असते, ज्यामध्ये मांस, अंडी यांशिवाय ड्रायफ्रुट्स, मनुके, हिरव्या पालेभाज्या, धान्य, गहू, वाटाणे यांसारख्या पदार्थांचा समावेश असतो. 

1. टोमॅटो 

टोमॅटो खाल्याने शरीरामधील रक्ताच्या पातळीत वाढ होते. टोमॅटो खाल्याने पचनक्रिया योग्य पद्धतीने होते. तसेच त्वचेसाठीही टोमॅटोमधील पोषक तत्व फायदेशीर ठरतात. टोमॅटोचा सलाडमध्ये समावेश केल्याने फायदा होतो. परंतु, ज्या व्यक्तींना किडनी स्टोनचा त्रास असेल त्यांनी टोमॅटोचं अधिक सेवन करणं टाळावं. 

2. मनुके 

मनुक्यांचं सेवन करणं आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. मनुके कोमट पाण्यात व्यवस्थित धुवून घ्या. त्यानंतर दूधामध्ये उकळून घ्या. त्यानंतर हे दूध प्या आणि मनुके खा. असं दिवसातून दोन वेळा केल्याने शरीराला अनेक फायदे होतात. थकवा दूर होण्यासोबतच शरीरातील रक्ताची पातळी वाढण्यासही मदत होते. 

3. पालक 

शरीरामधील रक्ताची कमतरता दूर करण्यासाठी पालकचा समावेश आहारात करा. कारण शरीराचं कार्य सुरळीत सुरू राहण्यासाठी रक्ताची पातळी योग्य प्रमाणात असणं आवश्यक असतं. पालक आयर्नचा मुख्य स्त्रोत आहे. नियमितपणे आहारात याचा समावेश केल्याने रक्ताची कमतरता दूर होण्यासोबतच मानसिक तणावही दूर होण्यास मदत होते. 

4. केळी 

केळ्यामध्ये शरीरासाठी आवश्यक असणारी अनेक पोषक तत्व असतात. शरीरामध्ये शक्ती आणि चरबी दोन्ही वाढविण्यासाठी केळी मदत करतात. आहारात केळ्याचा समावेश केल्याने रक्ताची कमतरता दूर होण्यासही मदत होते. 

5. अंजीर 

एका दिवसात एक कप अंजीर खाल्याने शरीराला जवळपास 240 मिलीग्रॅन कॅल्शिअम मिळतं. याव्यतिरिक्त यामध्ये फायबर, व्हिटॅमिन के आणि पोटॅशिअमही आढळून येतं. दररोज अनोशापोटी अंजीर खाल्याने बद्धकोष्ट आणि पचनासंबंधित समस्या दूर होण्यास मदत होते. 

6. आवळा 

आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी, अॅन्टीऑक्सिडंट आणि अॅन्टीफ्लेमेट्री तत्व आढळून येतात. ज्यामुळे शरीराचं तारूण्य टिकवण्यासाठी मदत करतात. तसेच केसांचं आणि त्वचेचं सौंदर्य वाढिवण्यासाठीही मदत होते.
 
(टिप : वरील सर्व समस्या आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.)

Web Title: Early signs and symptoms of iron deficiency or anemia in girls and women causes risk factors diet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.