रोज एक कप कॉफी प्यायल्याने 'या' गंभीर आजाराचा धोका होतो कमी, रिसर्चमधून खुलासा....

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2023 05:18 PM2023-02-22T17:18:57+5:302023-02-22T17:20:40+5:30

Heart Health Tips : एका रिसर्चमधून (Research) दावा करण्यात आला आहे की, रोज १ कप कॉफी प्यायल्याने हार्ट फेल्युअरचा (Heart Failure Risk) धोका कमी होऊ शकतो. 

Drinking 1 cup coffee daily can reduce heart failure risk new study suggests | रोज एक कप कॉफी प्यायल्याने 'या' गंभीर आजाराचा धोका होतो कमी, रिसर्चमधून खुलासा....

रोज एक कप कॉफी प्यायल्याने 'या' गंभीर आजाराचा धोका होतो कमी, रिसर्चमधून खुलासा....

googlenewsNext

Heart Health Tips : जर तुम्हालाही कॉफी (Coffee) पिणं आवडत असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. जर तुम्ही पित नसाल तर ही बातमी वाचल्यानंतर तुम्ही नक्की कॉफी पिणं सुरू कराल. फक्त लक्षात हे ठेवायचं आहे की,  कॉफीचं अति सेवन करायचं नाही. एका रिसर्चमधून (Research) दावा करण्यात आला आहे की, रोज १ कप कॉफी प्यायल्याने हार्ट फेल्युअरचा (Heart Failure Risk) धोका कमी होऊ शकतो. 

काय सांगतो रिसर्च?

हार्ट डिजीजशी(Heart Disease) संबंधित ३ रिसर्चचा अभ्यास केल्यानंतर अमेरिकन हार्ट असोसिएशनने (American Heart Association) हा सल्ला दिलाय की, रोज १ कप किंवा त्यापेक्षी अधिक कॅफीन असलेल्या कॉफीचं सेवन केल्याने हार्ट फेल्युअरचा धोका कमी होतो. रिसर्चच्या निष्कर्षानुसार, डीकॅफिनेटेड कॉफी किंवा विना कॅफीन असलेली कॉफी सेवन करून हे फायदे मिळत नाहीत. आणि हार्ट फेल्युअरचा धोका कमी होण्याऐवजी वाढतो. (हे पण वाचा : वनस्पती तूपातल्या जेवणामुळे होऊ शकतात हे गंभीर आजार; शरीर कधी पोकळ होईल कळणारही नाही)

हृदयासाठी फायदेशीर कॉफी

या रिसर्चचे मुख्य लेखक डॉ. डेविड काओ म्हणाले की, 'कॅफीन आणि हार्ट फेल्युअर रिस्क कमी होण्याचा संबंध काय आहे हे जाणून घेणं फार हैराण करणारं होतं. जास्तीत जास्त लोक कॅफीन आणि कॉफीला हृदयासाठी फार घातक मानतात. कारण कॉफी प्यायल्याने हाय ब्लड प्रेशर आणि घाबरल्यासारखं वाटणे अशा समस्या होऊ शकतात. कॅफीनचा वाढता वापर आणि हार्ट फेल्युअरचा घटता धोका यांच्यात निरंतर संबंध याबाबत लोकांच्या धारणा बदलत आहेत'. असं असलं तरी हार्ट हेल्दी ठेवण्याचा अर्थ असा नाही की, हेल्दी फूडऐवजी तुम्ही सब्स्टिट्यूट म्हणून कॉफी पिणं सुरू करावं. (हे पण वाचा : सकाळी उठल्या उठल्या पोट साफ होत नाही? मग गॅस, पोटदुखीची चिंता सोडा, या उपायांनी समस्या होईल दूर)

१ कप कॉफीने किती धोका होतो कमी

या रिसर्चमध्ये काओ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ३ मुख्य रिसर्चमध्ये सहभागी झालेल्या २१ हजारपेक्षा अधिक अमेरिकन वयस्क लोकांच्या डेटाचा अभ्यास केला. रिसर्चमध्ये सहभागी लोकांवर १० वर्षांपर्यंत नजर ठेवली गेली. तिन्ही रिसर्चमधून ही बाब समोर आली की, १ किंवा अधिक कप कॅफीन असलेली कॉफी पिण्याचा संबंध लॉंग टर्ममध्ये हार्ट फेल्युअरचा धोका कमी करण्याशी आहे. कॉफी पिणाऱ्या लोकांच्या तुलनेत रोज १ कप कॉफी पिणाऱ्यांना हार्ट फेल्युअरचा धोका ५ ते १२ टक्के कमी असतो.

अमेरिकन हार्ट असोसिएशनचे पेनी क्रिस-एथर्टन यांच्यानुसार विना साखर आणि क्रीम असलेल्या कॉफीचं सेवन करा. पण कमी प्रमाणात करा. सोबतच हार्ट हेल्दी ठेवणारे पदार्थ जसे की, फळं, भाज्या, कडधान्य, लो फॅट डेअरी, कमी सोडीअम आणि कमी सॅच्युरेडेट फॅटचं सेवन करा.

Web Title: Drinking 1 cup coffee daily can reduce heart failure risk new study suggests

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.