पोटातील गॅस पास करणं थांबवू नका, होतील 'हे' गंभीर आजार, पाहा तज्ज्ञांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2021 10:00 PM2021-06-16T22:00:01+5:302021-06-16T22:18:59+5:30

तुमच्या शरीरातून गॅस पास होतो का? असेल तर ते तुमच्यासाठी चांगले आहे. विश्वास बसत नाहीये ना. गॅस पास होणे हे तुमच्यासाठी चांगल्या आरोग्याचे लक्षण होऊ शकते.

Do not stop passing gas in the stomach, there will be 'these' serious illnesses, see the opinion of experts | पोटातील गॅस पास करणं थांबवू नका, होतील 'हे' गंभीर आजार, पाहा तज्ज्ञांचे मत

पोटातील गॅस पास करणं थांबवू नका, होतील 'हे' गंभीर आजार, पाहा तज्ज्ञांचे मत

Next

तुमच्या शरीरातून गॅस पास होतो का? असेल तर ते तुमच्यासाठी चांगले आहे. विश्वास बसत नाहीये ना. गॅस पास होणे हे तुमच्यासाठी चांगल्या आरोग्याचे लक्षण होऊ शकते. तसेच हे तुमच्या पोटातील काही विकारांची लक्षणेही दाखवू शकते. गॅस पास होण्याची अनेक कारणे असतात. त्यापैकी काही कारणे अशी असतात जी तुम्हाला माहितही नसतील.

दिवसातून अर्धा लीटर गॅस पास होतो
प्रत्येक व्यक्ती दिवसाला अर्धा लीटर गॅस पास करतो. मात्र अनेक लोक गॅस पास करायला लाजतात. ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. ती रोखल्यामुळे तुमच्या शरीरावरच त्याचे वाईट परिणाम होतात.

रोगांपासून बचाव
एक्सीटर यूनिवर्सिटीमध्ये केलेल्या संशोधनानुसार गॅस पास केल्याने अनेक रोगांपासून बचाव होतो. गॅसमध्ये हायड्रोजन सल्फाईड असते. संशोधनानुसार याची नियंत्रित मात्रा आपल्या शरीरासाठी फायदेशीर असते. त्यामुळे स्ट्रोक, डिमेंशिया, कॅन्सर सारखे आजार दूर राहतात.

अपचन
जर तुम्हाला अपचन होत असेल आणि त्यामुळे तुमच्या पोटात दुखत असेल तर तुम्हाला गॅसची समस्या होऊ शकते. तसेच काही जणांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जी असते. दुध किंवा पनीर खाल्ल्यावर लॅक्टोज इंटॉलरन्स होतो. त्यामुळे गॅस पास होण्याची शक्यता असते.

पटापट खाणे
काहीजण घास नीट न चावता पटकन गिळतात त्यामुळे गॅस पास होण्याचे प्रमाण वाढू शकते. आपण जेव्हा काही खातो तेव्हा आपल्या शरीरात तोंडावाटे हवा जाते. आपण जर पटापट खाल्ले तर ही हवा जास्त प्रमाणात जाते आणि गॅस पास होतो.

मोठ्या आतड्यांमध्ये बिघाड
जर तुम्ही गॅस पास करणे थांबवत असाल तर तुम्हाला इन्फ्लॅमिटरी बॉल सिंड्रोम होऊ शकतो. गॅस पासन केल्याने मोठ्या आतड्यांवर ताण येतो. त्यामुळे मलविर्सजनात अडथळा येतो.

कृत्रिम साखर
कृत्रिम साखरेमुळे तुमच्या शरीरात गॅस, आतील भागांना सुज इतकंच नव्हे तर जुलाबही होऊ शकतात. त्यामुळे कृत्रिम साखर असलेले पदार्थ खाणे टाळा.

Web Title: Do not stop passing gas in the stomach, there will be 'these' serious illnesses, see the opinion of experts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.