Diabetes चा इशारा देतं डोळ्यात दिसणारं हे लक्षण, ओळखा आणि वेळीच व्हा सावध

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2021 12:24 PM2021-11-30T12:24:16+5:302021-11-30T12:25:09+5:30

Diabetes : डायबिटीसच्या रूग्णांना हाय ब्लड शुगरची समस्या असते. पॅनक्रियाजमधून निर्माण होत असलेलं इन्सुलिन रक्तात शुगरचं प्रमाण कंट्रोल करतं.

Diabetes warning signs you can spot in your eyes | Diabetes चा इशारा देतं डोळ्यात दिसणारं हे लक्षण, ओळखा आणि वेळीच व्हा सावध

Diabetes चा इशारा देतं डोळ्यात दिसणारं हे लक्षण, ओळखा आणि वेळीच व्हा सावध

googlenewsNext

सामान्यपणे डायबिटीस (Diabetes)च्या रूग्णांमध्ये तहान लागणे, थकवा, पुन्हा-पुन्हा लघवीला जाणे आणि वजन कमी होणे अशी काही सामान्य लक्षणे दिसतात. पण एक्सपर्ट्सनुसार डायबिटीसची माहिती डोळ्यात दिसणाऱ्या काही लक्षणांमधूनही मिळू शकते. 

हाय ब्लड शुगरचा डोळ्यांवर प्रभाव

डायबिटीसच्या रूग्णांना हाय ब्लड शुगरची समस्या असते. पॅनक्रियाजमधून निर्माण होत असलेलं इन्सुलिन रक्तात शुगरचं प्रमाण कंट्रोल करतं. पण जर तुम्हाला डायबि़टीस असेल तर तुमच्या शरीरात इतकं इन्सुलिन नसतं, जे ग्लूकोजला कंट्रोल करू शकेल आणि शरीरात तयार होणारं इन्सुलिन योग्यप्रकारे काम करू शकत नाही.

'द सन' एका रिपोर्टनुसार, हाय ब्लड शुगर तुमच्या डोळ्यांवर प्रभाव टाकतं. याने  आपल्या रेटीनाच्या ब्लड वेसेल्समध्ये बदल होऊ शकतो किंवा याने डोळ्यांच्या टिशूजमद्ये सूज येऊ शकते. या टिशूजमुळे आपल्या बघण्यासाठी मदत होते. त्यांच्यावर प्रभाव पडला तर धुसर दिसण्याची समस्य होऊ शकते.

हाय ब्लड शुगरमुळे लेन्सच्या आकारातही बदल येऊ शकतो आणि यावर उपचार केले नाही तर याने डोळ्यांच्या Cataracts, Glaucoma आणि Retinopathy ची समस्या होऊ शकते.

या लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष

रिपोर्टनुसार, जर तुम्हाला डायबिटीस असेल तर डोळ्यात चार प्रमुख लक्षणे दिसतील. डायबिटीसमुळे तुम्हाला डिस्टॉर्टेड व्हिजन आणि व्हिजनमध्ये डार्क स्पॉटची समस्या होऊ शकते. डायबिटीसच्या समस्येत शरीर प्रभावीपणे इन्सुलिन बनवू शकत नाही. किंवा याचा वापर करू शकत नाही ज्यामुळे डोळ्यांना नुकसान पोहोचतं. इन्सुलिनने जर योग्यप्रकारे काम केलं तर ब्लड शुगर तुमच्या मुख्य एनर्जी सोर्ससारखं काम करतं. पण जर तुम्हाला हाय ब्लड शुगरची समस्या असेल तर ग्लूकोज तुमच्या सेल्समध्ये न पोहोचता ब्लड स्ट्रीममध्येच राहतं. यामुळे व्हिडीओ लॉस आणि आंधळेपणाची समस्या होऊ शकते.

डायबिटीसच्या समस्येत तुम्हाला डोकेदुखी, डोळ्यांची वेदना, डोळ्यातून पाणी येणे आणि धुसर दिसणे अशा सममस्या होऊ शकतात. डायबिटीसची समस्या छोट्या रक्तवाहिकांना प्रभावित करते आणि जास्त ब्लड शुगर शरीराच्या सर्वात छोट्या ब्लड वेसेल्स म्हणजे रक्तवाहिकांना डॅमेज करून ब्लड फ्लो बाधित करतं.

डोळ्यांनी धुसर दिसणं पहिलं आणि सर्वात प्रमुख वॉर्निंग साइन असू शकतो. असं असलं तरी जास्तीत जास्त डायबिटीस रूग्णांमध्ये eye disease सारखी लक्षणे फार अॅडव्हांस स्टेजवर  दिसून येत नाही. पण गरजेचं आहे की वर्षातून एक वेळा डोळ्यांचं चेकअप करा. याने वेळेवर तुमच्या उपचार होईल आणि व्हिजन लॉसपासून तुम्ही वाचाल.
 

Web Title: Diabetes warning signs you can spot in your eyes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.