रात्री जागे दिसलो की, आई-बाबांच्या शिव्या पडणारचं... अनेकजणांना रात्री झोप येता येत नाही आणि दिवसा डोळे उघडत नाहीत. जर तुमचंही असं काही होत असेल आणि तुम्हालाही दिवसभरात झोपायला आवडत असेल तर आता अजिबात चिंता करू नका. बिनधास्त झोपून जा. गोंधळात ना? हे असं मध्येच काय सांगतोय? प्रश्न पडला असेलच... एका संशोधनातून जी लोकं दिवसा झोपतात त्यांच्यामध्ये हार्ट अटॅकचा धोका कमी असतो, असं सिद्ध झालं आहे. 

हार्ट नावाच्या एका संशोधनामध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या संशोधनातून ही गोष्ट सिद्ध झाली आहे की, अशा व्यक्ती ज्या दिवसा डुलकी घेतात किंवा मस्तपैकी झोप घेतात. त्यांच्यामध्ये हार्ट अटॅकचा धोका कमी असतो. स्वित्झर्लंडमधील युनिवर्सिटी हॉस्पिटल ऑफ लॉसेनमधील रिसर्च टिमने एक संशोधन केलं आणि ते या निष्कर्षावर पोहोचले की, अशा व्यक्ती ज्या आठवड्यातून एक किंवा दोन वेळा दिवसा झोप घेतात त्यांच्यामध्ये जे दिवसा अजिबात झोपत नाही अशा व्यक्तींच्या तुलनेत  हार्ट अटॅक किंवा स्ट्रोकचा धोका 50 टक्क्यांनी कमी होतो. 

3462 सहभागी लोकांवर करण्यात आला 5 वर्षांपर्यंत रिसर्च 

हे संशोधन करण्यासाठी संशोधकांनी 35 ते 75 वर्षांपर्यंत 3 हजार 462 लोकांवर संशोधन करण्यात आलं. त्यांच्या हालचालिंवर 5 वर्षांपर्यंत लक्ष ठेवण्यात आलं आणि निरिक्षणं नोंदविण्यात आली. जेव्हा हा रिसर्च सुरू झाला त्यावेळी संशोधनात सहभागी असणाऱ्या जवळपास 58 टक्के सहभागी लोकांनी सांगितलं की, त्यांनी मागील आठवड्यामध्ये दिवसा अजिबातच झोप घेतली नव्हती. तर 19 टक्के लोकांनी सांगितले की, त्यांनी फक्त एक किंवा दोन वेळाच डुलकी घेतली. जवळपास 12 टक्के लोकांनी 3 ते 5 वेळा आणि 11 टक्के लोकांनी 6 ते 7 वेळा झोप घेतली. 

दिवसा झोप घेतल्याने हृदयाचे आजार जडण्याचा धोका 48 टक्क्यांनी कमी

संशोधन संपेपर्यंत संशोधक या निष्कर्षापर्यंत पोहोचले की, अशा व्यक्ती ज्यांनी आठवड्यामध्ये एक किंवा दोन वेळा झोप घेतली त्यांच्यामध्ये हार्ट अटॅक, स्ट्रोक आणि हार्ट फेल्युअरचा धोका 48 टक्क्यांनी कमी झाला होता. त्या व्यक्तींच्या तुलनेमध्ये ज्या आठवडाभरात दिवसा अजिबात झोपल्या नव्हत्या. हे संशोधन ऑब्जर्वेशनल होतं त्यामुळे संशोधकांनी  यावर कोणतंही संशोधन केलं नव्हतं. पम यातून सिद्ध झाल्यानुसार, दोन दिवसातून कधीतरी दुपारच्या वेळी एखादी डुलकी घेणं फायदेशीर ठरतं. 

दिवसभरात फक्त 20 मिनिटांसाठी डुलकी पुरेशी

दरम्यान, या संशोधनाच्या लीड ऑथर यांनी सांगितल्यानुसार, दिवसभरात एखादी डुलकी घेणं आरोग्यासाठी उत्तम ठरण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे, झोप अपूर्ण राहिल्यामुळे स्ट्रेसचं प्रमाण वाढतं. दिवसा झोप घेतल्यामुळे वाढलेला स्ट्रेस कमी होतो. म्हणजेच, किती वेळापर्यंत झोपायचं आहे किंवा डुलकी घ्यायची आहे. याबाबत संशोधनात काहीच सांगितलं नाही. परंतु, नॅशनल स्लीप फाउंडेशननुसार, दिवसभरात 20 मिनिटांसाठी डुलकी घेणं पुरेसं असतं. त्यामुळे तुमचा मूड प्रेश राहण्यास मदत होते. 

(टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून लोकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.)

Web Title: Day time nap once or twice a week decreases the risk of heart attack says research

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.