धोका वाढला! प्रवासापेक्षा घर अन् रेस्टॉरंटमध्ये वेगाने पसरतोय कोरोना? संशोधनातून मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2020 01:23 PM2020-11-02T13:23:51+5:302020-11-02T13:24:40+5:30

CoronaVirus News & latest Updates : हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्समध्ये जास्त लोकांसह बसून जेवण करणं धोकादायक ठरू शकतं. किराणा सामान घेण्यासाठी दुकानात जास्तवेळ थांबल्यास गर्दी झाल्याने कोरोनाचा धोका वाढू शकतो.

Covid-19 spreads faster more widely within households than previously estimated us study | धोका वाढला! प्रवासापेक्षा घर अन् रेस्टॉरंटमध्ये वेगाने पसरतोय कोरोना? संशोधनातून मोठा खुलासा

धोका वाढला! प्रवासापेक्षा घर अन् रेस्टॉरंटमध्ये वेगाने पसरतोय कोरोना? संशोधनातून मोठा खुलासा

Next

कोरोना व्हायरसची माहामारी आता पुन्हा एकदा वेगाने पसरत आहे.  कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता ब्रिटनमध्ये लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. परिणामी डिसेंबरपर्यंत ब्रिटनमधील नागरिकांना कोरोनापासून बचावासाठी लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करावे लागणार आहे. देशात कोरोना रुग्णांची एकूण संख्या 81,84,082 झाली असून  राजधानी दिल्लीतही कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. ज्या वेगाने कोरोना व्हायरस वेगाने आपले हात पाय पसरत आहे. हे पाहता संशोधक कोरोनाच्या प्रसाराची कारणं शोधण्यासाठी संशोधन करत आहेत.

नुकत्याच करण्यात आलेल्या एका संशोधनात याबाबत अनेक गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत. जर्नल मॉर्बिडिटी एंड मॉर्टेलिटी वीकली रिपोर्टमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार कोरोना व्हायरस बंद जागेत वेगाने पसरतो त्यामुळे व्हायरसचा प्रसार वेगाने होऊन संसर्ग होतो. या संशोधनानुसार कोरोनाकाळात बाहेर जेवण करणं, सामान विकत घेणं, विमानाने प्रवास  करण्याच्या तुलनेत धोकादायक ठरू शकतं. 

या संशोधनातून काय सिद्ध झालं

या संशोधनासाठी अमेरिकेतील  १०१ कुटूंबांचे परिक्षण करण्यात आले होते. यात असं दिसून आलं की बंद घरांच्या आत कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. या संशोधनादरम्यान  ५१ टक्के लोक कोरोनाने संक्रमित होते. त्यांना घराल्या घरातच कोरोनाचं संक्रमण झालं होतं. शास्त्रज्ञांच्यामते लोकांचा निष्काळजीपणा यासाठी कारणीभूत ठरला होता.

हॉटेलमध्ये खाणं कितपत सुरक्षित?

संशोधकांनी दावा केला आहे की, खरेदी करण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी जाणं,  हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये जाऊन खाणं हे विमान प्रवासापेक्षाही जास्त जोखिमीचे आहे. अमेरिकेतील हार्वर्ड टिएच चान स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या वैज्ञानिकांद्वारे करण्यात आलेल्या एका अभ्यासात स्पष्ट करण्यात आलं की, विमानांमध्ये  व्हेंटिलेशन सिस्टीम व्यवस्थित असल्यामुळे हवा नेहमी शुद्ध राहते. परिणामी संक्रमणाचा धोका कमी होतो. याऊलट व्हेंटिलेशन सिस्टिम व्यवस्थित नसेल तर कोरोनाचं संक्रमण वेगाने पसरू शकते. त्याचप्रमाणे हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्समध्ये  जास्त लोकांसह बसून जेवण करणं धोकादायक ठरू शकतं. किराणा सामान घेण्यासाठी दुकानात जास्तवेळ थांबल्यास गर्दी झाल्याने कोरोनाचा धोका वाढू शकतो.

अमेरिकेतील मॅसाचुसेट्स इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (एमआईटी)च्या अर्नोल्ड आय बार्नेट यांसह इतर संशोधनकांनी सांगितले की, एचईपीए फिल्टर विमानांमध्ये योग्य पद्धतीने  काम करत नाहीत. त्यामुळे जास्त लक्ष देणं गरजेचं आहे.  भारतातील  एमआयटीच्या एका तज्ज्ञांनी सांगितले की, कोरोनाच्या संक्रमणाबाबत अजूनही स्पष्टपणे काही सांगता येत नाही.  संसर्गापासून बचावासाठी साफ-सफाई, सोशल डिस्टेंसिंग, सॅनिटायजेशन या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवे.

भय इथले संपत नाही! कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर; 'या' देशात पुन्हा महिनाभराचा लॉकडाऊन घोषित

लहान मुलं आणि वयस्कर लोकांनाबाबतही या संशोधनात अनेक गोष्टी नमुद करण्यात आल्या. या संशोधनातून समोर आलं की, लहान मुलं, वयस्कर लोक नकळतपणे संक्रमण पसरवू शकतात. त्यामुळे अधिक लक्ष द्यायला हवे. सरकारच्या गाईडलाईन्सचे पालन करून मास्कचा वापर करायला हवा, सोशल डिस्टेंसिंग पाळायला हवे. याशिवाय  वैयक्तीक स्वच्छतेसह घराच्या साफ सफाईकडे अधिक लक्ष देणं गरजेचं आहे.  चिंताजनक! कोरोना संक्रमणामुळे हृदयाचं होतंय मोठं नुकसान; 'असा' होतोय परिणाम, तज्ज्ञांचा दावा 

Web Title: Covid-19 spreads faster more widely within households than previously estimated us study

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.