CoronaVirus : There are two most important reasons for corona testing | 'या' रिपोर्टने नक्कीच तुमची झोप उडेल; कोरोना चाचणीची आवश्यकता का? जाणून घ्या

'या' रिपोर्टने नक्कीच तुमची झोप उडेल; कोरोना चाचणीची आवश्यकता का? जाणून घ्या

जास्तीत जास्त लोकांना दिसलेल्या लक्षणांनुसार कोरोना रुग्णांमध्ये फ्लूसारखी लक्षणं दिसत असतात.  कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना व्हायरसबाबत नवीन माहिती समोर येत आहे. यूनायटेड किंगडममधील संस्थानांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना व्हाययरसची कोणतीही लक्षणं नसलेल्या लोकांना कोरोनाचे संक्रमण झाले होते. सर्वाधिक लोकांना अशा संक्रमणाचा सामना करावा लागला होता. हा सर्वे युकेतील संस्था ONS द्वारे करण्यात आला  होता. 

शोधकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार इंग्लंडमधील  रुग्णालयं, नर्सिंग होम, किराणामालाची दुकानं अशा ठिकाणांमध्ये कोरोना टेस्ट करण्यात आली होती.  ज्या लोकांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणं दिसत नव्हती असे ७८ टक्के लोक कोरोना संक्रमित होते. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार अत्यावश्यक सेवा पुरवत असलेल्या ७८ टक्के लोकांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणं  दिसून आली नाही.

संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार ७८ टक्के लोकांमध्ये प्री-सिम्प्टोमेटिक ( टेस्ट केल्यानंतर काही दिवसांनी प्रारंभीक लक्षणं दिसायला सुरूवात होते) एसिंप्टोमेटिक( लक्षणं दिसत नाहीत.) अशी स्थिती उद्भवते. पण जेव्हा या लोकांची टेस्ट करण्यात आली तेव्हा कोणत्याही शारीरिक समस्यांचा सामना करावा लागला नव्हता. या कालावधीत या लोकांमध्ये कोरोनाची लक्षणं दिसून आली नाहीत. पण वेगळ्या शारीरिक समस्या असण्याची दाट शक्यता होती.

रॅपिड टेस्टींग गरजेचं आहे

संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनाचं संक्रमण रोखण्याासाठी सतत चाचणी करत राहणं गरजेचं आहे. कारण जगभरात कोरोनाची माहामारी झपाट्याने पसरत आहे. वातावरणातील बदलामुळे कोरोना व्हायरसचं घातक रूप समोर येत आहे. त्यामुळे लक्षणं दिसत असल्यास त्वरित तपासणी करणं गरजेचे आहे.  कोरोना व्हायरसच्या नवीन लक्षणांमध्ये डोळे येणं, मळमळणं, अतिसार होणं यांचा समावेश आहे. याशिवाय थंडी वाजणे, श्वास घ्यायला त्रास होणं, मासपेशींमध्ये वेदना, डोकेदुखी, घसा खवखवणं, सुगंध न जाणवणं, श्वास घ्यायला त्रास होणं यांचा समावेश आहे. 

खुशखबर! संशोधकांचं मोठं यश; हवेतून पसरणाऱ्या कोरोना संसर्गाला रोखणार हा 'खास 'फिल्टर'

मोठा दिलासा! तज्ज्ञांनी शोधलं कोरोना विषाणूंचा प्रसार थांबवण्याचं औषध; 'असा' थांबेल प्रसार

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: CoronaVirus : There are two most important reasons for corona testing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.