Coronavirus: कोरोनाविरुद्ध आयुष्यभर संरक्षण देणार ‘ही’ लस; डेल्टा व्हेरिएंटवरही प्रभावी, भारताला मोठा दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2021 05:39 PM2021-07-21T17:39:28+5:302021-07-21T17:41:11+5:30

आधीच्या अभ्यासानुसार वैज्ञानिकांनी असा दावा केला होता की, एमआरएनए फायझर लस आणि मॉडर्नापेक्षा टी-सेल्स तयार करण्यासाठी ऑक्सफोर्ड एस्ट्राजेनेका लस अधिक प्रभावी असू शकते.

Coronavirus: Study Says, Oxford Astrazeneca Vaccine Could Give Protection Against Covid 19 | Coronavirus: कोरोनाविरुद्ध आयुष्यभर संरक्षण देणार ‘ही’ लस; डेल्टा व्हेरिएंटवरही प्रभावी, भारताला मोठा दिलासा

Coronavirus: कोरोनाविरुद्ध आयुष्यभर संरक्षण देणार ‘ही’ लस; डेल्टा व्हेरिएंटवरही प्रभावी, भारताला मोठा दिलासा

Next
ठळक मुद्देया लसींचे मुख्य लक्ष्य अँन्टिबॉडी आणि टी-पेशी दोन्ही वापरून दीर्घकालीन रोगप्रतिकारक शक्ती विकसित करणे आहे. कोरोनाच्या व्हेरिएंटपासून संरक्षण मिळू शकते. या पेशींना फाइब्रोब्लास्टिक रेटिकुलर सेलही म्हणतात.संक्रमित व्हायरसला शोधून त्याला नष्ट करण्याचं काम टी-पेशी करतात.

जगभरात पुन्हा वाढणाऱ्या कोरोना संक्रमणामुळे सुरक्षित राहण्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी लसीकरण करावं असं तज्ज्ञ आवाहन करत आहेत. अलीकडच्या रिपोर्टमध्ये कोरोनाचा नवा डेल्टा आणि लम्बाडा व्हेरिएंट अँन्टिबॉडिजलाही चकमा देत असल्याचं म्हटलं आहे. अशावेळी लोकांच्या मनात नेमकी कुठली लस सुरक्षा देण्यासाठी सर्वात प्रभावी आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

या प्रश्नाचं उत्तर आता एका शोधाच्या माध्यमातून वैज्ञानिकांनी सांगितल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. ब्रिटनमध्ये करण्यात आलेल्या स्टडी रिपोर्टमध्ये सांगितलं आहे की, ऑक्सफोर्डची एस्ट्राजेनेका म्हणजे कोविशील्ड (Covishield) लसीपासून बनणारी अँन्टिबॉडी केवळ कोरोनाच्या सर्व व्हेरिएंटपासून लढण्यास सक्षम आहे त्याचसोबत कोरोनाच्या गंभीर संक्रमणापासून सुरक्षित ठेवण्यात प्रभावी ठरत आहे. भारताच्या दृष्टीकोनातून या रिपोर्टला विशेष महत्त्व आहे. कारण देशात कोविशील्ड लसीचा सर्वाधिक वापर करण्यात आला आहे.

वैज्ञानिकांचा दावा आहे की, कोविशील्ड लसीपासून बनलेली अँन्टिबॉडी कोरोनाच्या नव्या व्हेरिएंसला सहजपणे नष्ट करते. ऑक्सफोर्ड एस्ट्राजेनेका आणि जॉनसन अँन्ड जॉनसनसारख्या एडेनोवायरस लस शरीरात अशाप्रकारे काम करते ज्याने खूप काळ अँन्टिबॉडी तयार होण्यास मदत मिळते. टी पेशींची निर्मिती आयुष्यभर होऊ शकते. त्याच आधारे कोविशील्ड आणि जॉनसन अँन्ड जॉनसन लस आयुष्यभर सुरक्षित असल्याचं मानलं जात आहे. प्रोफेसर बुकहार्ड लुडविंग म्हणाले की, स्टडी करताना टी पेशींची निर्मिती प्रभावी होत असल्याचं आढळलं. त्यामुळे कोरोनाच्या व्हेरिएंटपासून संरक्षण मिळू शकते. या पेशींना फाइब्रोब्लास्टिक रेटिकुलर सेलही म्हणतात. संक्रमित व्हायरसला शोधून त्याला नष्ट करण्याचं काम टी-पेशी करतात. त्यामुळे संक्रमण संपूर्ण शरीरात पसरत नाही.

दीर्घकालीन रोगप्रतिकारक शक्ती विकसित करण्याचे फायदे

आधीच्या अभ्यासानुसार वैज्ञानिकांनी असा दावा केला होता की, एमआरएनए फायझर लस आणि मॉडर्नापेक्षा टी-सेल्स तयार करण्यासाठी ऑक्सफोर्ड एस्ट्राजेनेका लस अधिक प्रभावी असू शकते. ऑक्सफोर्डच्या औषध विभागातील न्युफिल्ड विभागातील प्रोफेसर पॉल क्लेनर्मन म्हणतात की, जगभरातील कोट्यावधी लोकांना एडेनोव्हायरसवर लस देण्यात आली आहे.

या लसींचे मुख्य लक्ष्य अँन्टिबॉडी आणि टी-पेशी दोन्ही वापरून दीर्घकालीन रोगप्रतिकारक शक्ती विकसित करणे आहे. जगातील मोठी लोकसंख्या कोरोना विषाणूविरूद्ध प्रतिकारशक्ती विकसित करू शकते असं या अभ्यासाच्या आधारे म्हणता येईल. जगभरात सध्या चिंता बनलेल्या डेल्टा व्हेरिएंटविरोधातही कोविशील्ड लस प्रभावी होण्याचा दावा आहे. पब्लिक हेल्थ इंग्लंडनुसार, या लसीचे दोन्ही डोस ९२ टक्के संरक्षण देते. कोरोनाच्या अल्फा आणि डेल्टा व्हेरिएंटवर या लसीचा प्रभाव अनुक्रमे ७४ आणि ६४ टक्के असू शकतो.  

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Coronavirus: Study Says, Oxford Astrazeneca Vaccine Could Give Protection Against Covid 19

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app