CoronaVirus: बदनाम भांगेतील एक गुण, जो कोरोनावर भारी पडेल; व्हायरसला शरीराबाहेरच रोखते

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2022 02:27 PM2022-01-17T14:27:46+5:302022-01-17T14:28:31+5:30

अमेरिकेच्या संशोधकांचा रिसर्च जर्नल ऑफ नॅचुरल प्रोडक्टमध्ये प्रकाशित झाला आहे. यामध्ये कैनाबिनोइड्स ब्लॉक सेल्युलर एंट्री ऑफ SARS-CoV-2 एंड द इमर्जिंग वेरिएंट्स असा हा लेख आहे.

Coronavirus: Study finds Cannabis compounds can prevent corona spread American Scientist | CoronaVirus: बदनाम भांगेतील एक गुण, जो कोरोनावर भारी पडेल; व्हायरसला शरीराबाहेरच रोखते

CoronaVirus: बदनाम भांगेतील एक गुण, जो कोरोनावर भारी पडेल; व्हायरसला शरीराबाहेरच रोखते

googlenewsNext

कोरोना महामारीच्या विळख्यात आज संपूर्ण जग पुरते गुरफटले आहे. कोणाला स्वप्नातही वाटले नसेल की असा काहीतरी व्हायरस येईल आणि जगाचा रहाटगाडा पंक्चर करेल. एक लाट संपते तोच दुसरी, दुसरी संपतो तोच तिसरी, असे सुरुच आहे. या कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी वेगवेगळ्या देशांत शोध सुरु आहेत. सुरुवातीला भांग कोरोनावर परिणामकारक असल्याचे सांगितले जात होते, आता या दाव्यात संशोधकांनाच तथ्य असल्याचे आढळले आहे.

तसे पाहिले तर भांग नशा आणत असल्याने ती बदनाम आहे. परंतू याच भांगेत सापडलेला एक गुण संशोधकांना कोरोनाविरोधात लढण्याची आशा दाखवत आहे. अमेरिकी संशोधकांना भांग म्हणजेच कॅनाबिजचे गुणसूत्र कोरोनाला शरीरात प्रवेश करण्यापासून रोखत असल्याचे समजले आहे. 

अमेरिकेच्या संशोधकांचा  रिसर्च जर्नल ऑफ नॅचुरल प्रोडक्टमध्ये प्रकाशित झाला आहे. यामध्ये कैनाबिनोइड्स ब्लॉक सेल्युलर एंट्री ऑफ SARS-CoV-2 एंड द इमर्जिंग वेरिएंट्स असा हा लेख आहे. ओरेगन स्टेट युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी या कंपाऊंडचा शोध घेण्यासाठी केमिकल स्क्रीनिंग वापरले आहे. याद्वारे कनाबिज सॅटिव्हा नावाचा एक कंपाऊंड साप़डला असून तो कोरोनाला शरीरात घुसण्यापासून रोखतो, असे संशोधकांचे म्हणणे आहे. 

रिचर्ड वैन ब्रीमेन यांच्या म्हणण्यानुसार भांग फायबरचा उत्कृष्ट स्त्रोत आहे. हे मानवी अन्न आणि प्राण्यांच्या अन्नामध्ये देखील आढळते. याशिवाय, भांगाचे अनेक अर्क आणि संयुगे अनेक कॉस्मेटिक उत्पादने आणि आहारातील पूरक पदार्थांमध्ये देखील वापरले जातात. कैनाबीनोएड एसिडमुळे कोरोना व्हायरसचे स्पाईक प्रोटीन बांधले जात. यामुळे कोरोना व्हायरसच्या पसरण्याची प्रक्रिया बाधित होते आणि शरीरात संक्रमण होत नाही. तसेच बाहेरही फैलाव होत नाही. 

Web Title: Coronavirus: Study finds Cannabis compounds can prevent corona spread American Scientist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.