CoronaVirus News : समजून घ्या ‘कोरोना’; धूम्रपानामुळे कोरोनाचा धोका कमी होत नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2020 12:29 AM2020-05-18T00:29:10+5:302020-05-18T00:29:31+5:30

CoronaVirus News : फ्रान्सच्या माध्यमांमध्ये सुरुवातीला या बातम्या आल्याने धूम्रपानाचे प्रमाण वाढले, पण नंतर तिथेही वैद्यकीय तज्ज्ञांनी हा अभ्यास अपूर्ण असल्याचे सांगितले.

CoronaVirus News : Understand ‘corona’; Smoking does not reduce the risk of corona | CoronaVirus News : समजून घ्या ‘कोरोना’; धूम्रपानामुळे कोरोनाचा धोका कमी होत नाही

CoronaVirus News : समजून घ्या ‘कोरोना’; धूम्रपानामुळे कोरोनाचा धोका कमी होत नाही

Next

फेब्रुवारी व मार्च महिन्यात केलेल्या एका अभ्यासात असा निष्कर्ष काढण्यात आला, की धूम्रपान करणाऱ्यांना कोरोनाचा धोका व त्यामुळे मृत्यूची शक्यता कमी आहे. पण नंतर या अभ्यासाच्या त्रुटी लक्षात आल्या व जागतिक आरोग्य संघटनेने असे म्हणण्यास अजून कुठलाही संशोधनात्मक आधार नसल्याचे जाहीर केले. तसेच धूम्रपानामुळे कोरोनाचा धोका कमी होत नाही, असे जाहीर केले.
फ्रान्सच्या माध्यमांमध्ये सुरुवातीला या बातम्या आल्याने धूम्रपानाचे प्रमाण वाढले, पण नंतर तिथेही वैद्यकीय तज्ज्ञांनी हा अभ्यास अपूर्ण असल्याचे सांगितले. एक तर या अभ्यासात केवळ ४८२ जणांचाच अभ्यास केला होती. ठामपणे निष्कर्ष काढण्यास ही संख्या कमी आहे. तसेच यात सामील असलेल्यांनी आधी धुम्रपान सोडले आहे, अशांची ही बरे झालेल्यांमध्ये गणना करण्यात आली. तसेच प्रत्येक वैद्यकीय संशोधनात्मक अभ्यासाचे इतर संशोधक आणि तज्ज्ञांकडून पडताळणी करूनच तो निश्चित मानला जातो.
अजून या अभ्यासाची अशी कुठलीही पडताळणी झाली नसताना तो अति उत्साहात फ्रान्सच्या माध्यमात छापण्यात आला. तिथून तो जगभर पसरला. पण कोणीही या भ्रमात राहू नये. उलट धूम्रपान करीत असलेल्यांना फुफ्फुसाला इजा झाल्यामुळे कोरोनाच नव्हे, तर इतर कुठल्याही जंतुसंसर्गाचा धोका जास्त असतो. तसेच मधुमेह, हृदयरोग, फुफ्फुसाचा कॅन्सर या सर्वांचा धोका जास्त असल्याने कोरोना झाल्यास मृत्यूचा धोका जास्त असू शकतो. म्हणूनच मद्यपानाप्रमाणे कोरोनाही धूम्रपान सोडण्यास चांगली संधी आहे.
- अमोल अन्नदाते
(लेखक बालरोगतज्ज्ञ असून, वैद्यकीय साक्षरतेसाठी कार्यरत आहेत.)

Web Title: CoronaVirus News : Understand ‘corona’; Smoking does not reduce the risk of corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.