खुशखबर! व्हायरसशी लढण्यासाठी कोरोनाची 'सुपर वॅक्सिन' तयार करणार, तज्ज्ञांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2020 05:33 PM2020-11-04T17:33:28+5:302020-11-04T19:57:36+5:30

CoronaVirus News & latest Updates : ही लस तयार करत असलेल्या संशोधकांमध्ये युनिव्हर्सिटी ऑफ वाशिंग्टनमधील तज्ज्ञांचाही समावेश आहे.

CoronaVirus News in Marathi : scientists claims to develop ultra potent corona vaccine | खुशखबर! व्हायरसशी लढण्यासाठी कोरोनाची 'सुपर वॅक्सिन' तयार करणार, तज्ज्ञांचा दावा

खुशखबर! व्हायरसशी लढण्यासाठी कोरोनाची 'सुपर वॅक्सिन' तयार करणार, तज्ज्ञांचा दावा

Next

जगभरात कोरोना व्हायरसच्या संक्रमणाशी लढण्यासाठी वैज्ञानिकांचे प्रयत्न सुरू आहेत. जगभरातील तज्ज्ञ हे युद्ध पातळीवर लस आणि औषधं शोधण्यासाठी प्रयत्न करत आहेत. वेगवेगळ्या देशात लसीचे परिक्षण सुरू असून अमेरिकेतील वैज्ञानिकांनी कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी परिणामकारक लस तयार करण्याचा दावा केला आहे. या लसीचा वापर प्राण्यांवर करण्यात आला होता. ही लस तयार करत असलेल्या संशोधकांमध्ये युनिव्हर्सिटी ऑफ वाशिंग्टनमधील तज्ज्ञांचाही समावेश आहे. त्यांनी केलेल्या दाव्यानुसार लस लोकांच्या शरीरात कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी तसंच एंटीबॉडी तयार करण्यासाठी प्रभावी ठरते.

ही लस नॅनो पार्टिकल्सने तयार केली आहे. या लसीचे प्राण्यांवरील परिक्षण यशस्वी ठरले आहे.  परिक्षणादरम्यान दिसून आलं की, ही लस कोरोनातून रिकव्हर झालेल्या लोकांच्या तुलनेत जास्त न्यूट्रीलायजिंग एंटीबॉडी विकसित करण्यासाठी परिणामकारक  ठरली होती. सेल जर्नलमध्ये  हा शोध प्रकाशित करण्यात आला आहे. उंदरांमध्ये लसीचा डोज  ६ टक्क्यांनी कमी केल्यानंतरही  १० टक्के जास्त न्यूट्रीलायजिंग एंटीबॉडीज तयार करण्यात आल्या होत्या. याव्यतिरिक्त लसीत प्रभावशाली B सेल्स इम्यून रिस्पाँससुद्धा दिसून आला. वैज्ञानिकांनी केलेल्या दाव्यानुसार ही लस दीर्घकाळ परिणामकारक ठरू शकते. 

संशोधकांनी यासाठी माकडांवर परिक्षण केले होते. ज्या माकडांना लस देण्यात आली होती. त्याच्या एंटीबॉडीने कोरोना व्हायरसच्या स्पाईक प्रोटीन्सवर आक्रमण केले होते. स्‍पाइक प्रोटीनच्या माध्यमातून व्हायरस माणसांच्या शरीरातून पेशींमध्ये प्रवेश करतो. तज्ज्ञांनी केलेल्या दाव्यानुसार कोरोनाने आपलं स्वरूप बदलल्यानंतरही ही लस परिणामकारक ठरेल. ही लस  स्पाईक प्रोटीन्सच्या रिसेप्टर बायंडिंग डोमेनच्या ६० टक्के भागावर परिणामकारक ठरते. 

कोरोनाचं नवं रूप ठरतंय घातक; ८५ टक्के रुग्णांमध्ये नवीन व्हायरस स्ट्रेनचा प्रसार

 अमेरिकेतील टेक्सासच्या एका रुग्णालयात दाखल झालेल्या ५ हजार कोरोना रुग्णांवर करण्यात आलेल्या एका परिक्षणादरम्यान दिसून आले की, जवळपास ९९.९ टक्के केसेस कोरोनाचे रुप बदलल्यामुळे दिसून आल्या आहेत. म्हणजेच D614G व्हायरसचं हे रूप यासाठी जबाबदार आहे.  कोरोना व्हायरसचं नवीन रूप मूळ व्हायरसच्या रुपापेक्षा जास्त संक्रामक आणि भयंकर असल्याचे सांगितले जात आहे. या रिसर्चसाठी  तज्ज्ञांनी जवळपास ५ हजार रुग्णांमधील कोरोना व्हायरसच्या स्ट्रेनचे विश्लेषण केले होते. सगळ्यात आधी युरोपात कोरोना व्हायरसचा D614G स्ट्रेन पसरण्याची माहिती समोर आली होती. 

पहिल्यांदा फेब्रुवारी महिन्यात कोरोना व्हायरसच्या D614G स्ट्रेनबाबत माहिती मिळाली होती. नंतर हा स्ट्रेन  अमेरिका आणि इतर आशियाई देशांमध्ये काही आठवड्यातच पसरला.  वैज्ञानिक आता  SARS-CoV-2 चे हे रूप मोठ्या प्रमाणात  वेगाने पसरत आहे का, याचा शोध घेत आहेत.  माहामारीच्या सुरूवातीच्या दिवसात D strain व्हायरसमुळे जास्तीत जास्त लोकांना संक्रमणाचा सामना करावा लागला होता.

कोरोनाकाळात थंडीच्या वातावरणात कसे राहाल निरोगी? जाणून घ्या तज्ज्ञांनी सांगितलेल्या ८ टिप्स

मार्चपर्यंत D614G स्ट्रेन जगाच्या वेगवेगळ्या भागात पोहोचला होता. एकूण संक्रमणाच्या एक चतृर्थांश रुग्णांच्या संक्रमणासाठी हा स्ट्रेन कारणीभूत होता.  मे महिन्यापर्यत D614G स्ट्रेन असलेल्या रुग्णांची संख्या ७० टक्के होती. आता जगभरात एकूण कोरोना रुग्णांपैकी ८५ टक्क्यांपेक्षा अधिक रुगण  D614G स्ट्रेनमुळे संक्रमित झाल्याचे सांगितले जात आहे. ऑगस्टमध्ये सिंगापूर नॅशनल युविव्हर्सिटीचे सिनिअर कंसलटंट पॉल तांबयाह यांनी सांगितले होते की, ''D614G स्ट्रेन अधिक संक्रामक आहे. पण मूळ व्हायरसच्या तुलनेत कमी जीवघेणा आहे.'' संक्रमणानंतर 'एवढ्या' महिन्यांनंतरही इम्यूनिटी ठरतेय प्रभावी, नव्या रिसर्चमधून खुलासा

Web Title: CoronaVirus News in Marathi : scientists claims to develop ultra potent corona vaccine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.