CoronaVirus News : कोरोना विषाणू फुफ्फुसांपर्यंत पोहोचू नये; यासाठी प्रभावी ठरेल 'ही' थेरेपी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 09:40 AM2020-05-11T09:40:29+5:302020-05-11T09:47:48+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोना व्हायरसचं संक्रमण व्यक्तीच्या शरीरात तोंडामार्फत आणि गळ्यामार्फत फुफ्फुसांपर्यंत पोहोचतं.

CoronaVirus News Marathi : Hypertonic saline nasal irrigation and gargling to prevent coronavirus from entering body myb | CoronaVirus News : कोरोना विषाणू फुफ्फुसांपर्यंत पोहोचू नये; यासाठी प्रभावी ठरेल 'ही' थेरेपी

CoronaVirus News : कोरोना विषाणू फुफ्फुसांपर्यंत पोहोचू नये; यासाठी प्रभावी ठरेल 'ही' थेरेपी

Next

कोरोनामुळे जगभरात हाहाकार  निर्माण झाला आहे. कोरोनाच्या विषाणूचे संक्रमण झाल्यानंतर संपूर्ण अवयवांवर परिणाम होतो.  फुफ्फुस, रक्तवाहिन्या आणि हृदयावर कोरोनाचा प्रभाव जास्त दिसून येतो. कोरोनाला रोखण्यासाठी अद्याप कोणतंही औषध किंवा लस शोधण्यात आलेली नाही.जगभरातील शास्त्रज्ञ कोरोनाची लस शोधण्यासाठी प्रयत्न करत आहेत. सर्वत्र सोशल डिस्टेंसिंग पाळल्यामुळे कोरोनाला रोखता येऊ शकतं.  अलिकडे कोरोनाच्या उपचारांबद्दल संशोधकांनी दावा केला आहे.   

हायपरटोनिक सेलिन म्हणजेच कोमट पाण्याच्या गुळण्या आणि नेजल वॉश केल्ययामुळे कोरोनापासून बचाव करता येऊ शकतो. कोरोना व्हायरसचं संक्रमण व्यक्तीच्या शरीरात तोंडामार्फत आणि गळ्यामार्फत फुफ्फुसांपर्यंत पोहोचतं. लंग्स इंडीया यात प्रकाशित केलेल्या रिसर्चमधून तज्ञांनी दावा केला आहे की, कोमट पाण्याच्या गुळण्या केल्यामुळे व्हायरसला तोंडातून आणि गळ्यामार्फत फुफ्फुसांपर्यंत पोहोचण्यापासून रोखता येऊ शकतं. कोरोनापासून बचावासाठी ही प्रक्रिया फायदेशीर ठरेल.(CoronaVirus News : 'हे' नवीन औषध कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी ठरेल प्रभावी, तज्ज्ञांचा दावा) 

या संशोधनाचे प्रमुख शास्त्रज्ञ आणि सवाईमानसिंह रुग्णालयातील श्वास रोगतज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार सर्दी, खोकला, ताप आणि श्वसनाशी संबंधीत व्हायरल संक्रमण थांबवण्यासाठी  कोमट पाण्याच्या गुळण्या आणि नेजल वॉश परिणामकारक ठरू शकतं. या थेरेपीमुळे श्वसनाचे विकार कमी होण्याची शक्यता असते. यासाठी तज्ञांच्या सल्ल्याने या थेरेपीचा वापर करणं गरजेचं आहे.  ज्याप्रमाणे आपण सतत हात धुत असतो. त्याप्रमाणे कोमट पाण्याच्या गुळण्या आणि नेजल वॉशमुळे व्हायरल संक्रमणाचा धोका कमी होऊ शकतो.  कोरोनाच्या महामारीला थांबवण्यासाठी ही पद्धत परिणामकारक ठरू शकते. 

(कोरोनाशी लढण्यासाठी कॅन्सर आणि रक्तदाबाची औषधं ठरत आहेत प्रभावी; जाणून घ्या कशी)

Web Title: CoronaVirus News Marathi : Hypertonic saline nasal irrigation and gargling to prevent coronavirus from entering body myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.