सावधान! कोरोनामुळे फुफ्फुसांसह पचनक्रियेचंही होतंय नुकसान, २० % संक्रमितांमध्ये दिसली लक्षणं

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2020 11:44 AM2020-11-05T11:44:33+5:302020-11-05T11:45:53+5:30

CoronaVirus News & Latest Updates : कोविड -19 मधील प्रत्येक पाचपैकी एका रुग्णांला पचनाच्या समस्या येत होत्या. म्हणजेच सुमारे 20 टक्के रुग्ण मळमळ, उलट्या, ओटीपोटात वेदना आणि अतिसाराने ग्रस्त होते.

CoronaVirus News in Marathi : Gastrointestinal symptoms in covid 19 patients | सावधान! कोरोनामुळे फुफ्फुसांसह पचनक्रियेचंही होतंय नुकसान, २० % संक्रमितांमध्ये दिसली लक्षणं

सावधान! कोरोनामुळे फुफ्फुसांसह पचनक्रियेचंही होतंय नुकसान, २० % संक्रमितांमध्ये दिसली लक्षणं

googlenewsNext

कोरोना व्हायरसच्या तिसऱ्या लाटेने कहर केला आहे. संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. कारण  ब्रिटनसह युरोपातील अनेक देशात पुन्हा लॉकडाऊन करण्यात आलं आहे. राजधानी दिल्लीतील कोरोना व्हायरसच्या संसर्गाने हाहाकार निर्माण केला आहे. बुधवारी  सलग दुसऱ्या दिवशी 6 हजारांपेक्षा जास्त केसेस समोर आल्या आहेत. संशोधक कोरोना व्हायरसचे म्यूटेशन स्वरूपात होणारा बदल याबाबत अधिक संशोधन करत आहेत.

एब्डॉमिनल रेडियोलॉजी जर्नल (AbdominalRadiology journal) मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या एका अभ्यासात दिसून आलं की,  कोरोनाने पीडित असलेल्या 20 टक्के लोकांमध्ये गॅस्ट्रोइंटेस्टाईनल समस्यांचा सामना करावा लागतो.  या अभ्यासात समाविष्ट असलेल्या लोकांना गॅस, उलट्या,  अतिसार या समस्यांचा सामना करावा लागत होता.  जर्नल ऑफ एब्डॉमिनल रेडिओलॉजीनुसार, कोविड -19 मधील प्रत्येक पाचपैकी एका रुग्णाला पचनाच्या समस्या येत होत्या. म्हणजेच सुमारे 20 टक्के रुग्ण मळमळ, उलट्या, ओटीपोटात वेदना आणि अतिसाराने ग्रस्त होते. कोरोना रूग्णांच्या पोटाच्या रेडिओ इमेजिंगचे मूल्यांकन करून संशोधकांनी याचा निष्कर्ष काढला आहे. 

या संशोधनाचे लेखक आणि कॅनडाच्या अल्बर्टा विद्यापीठाचे रेडिओलॉजिस्ट आणि क्लिनिकल लेक्चरर मिस विल्सन म्हणतात की, ''या संशोधनादरम्यान आम्हाला कळलं की कोरोना लोकांच्या पाचनतंत्रावर कसा परिणाम करीत आहे. आताही कोरोनाच्या लक्षणांची पूर्ण तपासणी झालेली नाही कारण ती प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगळी आहे. अशा परिस्थितीत कोरोनाच्या परिणामाची तपासणी करणेही एक अवघड काम आहे कारण कोरोनाची बदललेली आरएनए (आरएनए) आणि त्याचे उत्परिवर्तन ही सर्वात मोठी समस्या बनली आहे.  म्हणूनच, पचनाच्या समस्या असतानाही लोक नक्की कोणत्या प्रकारच्या समस्यांना तोंड देत आहेत हे आम्ही पूर्णपणे सांगू शकत नाही.''

संक्रमणानंतर 'एवढ्या' महिन्यांनंतरही इम्यूनिटी ठरतेय प्रभावी, नव्या रिसर्चमधून खुलासा

गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्ट म्हणजे तोंडातून किडनीपर्यंत जाणारा मार्ग, ज्यामध्ये मानवी पाचन तंत्राच्या सर्व अवयवांचा समावेश आहे. खाल्ल्ले अन्न पोषणद्रव्ये काढण्यासाठी आणि ऊर्जा शोषण्यासाठी आतड्यांद्वारे पचन केले जाते आणि कचरा मल म्हणून काढला जातो. कोरोना रुग्णांमध्ये सर्वात कॉमन समस्या आढळते ती म्हणजे आतड्यामध्ये सुज येण्याची.

हिवाळा असो किंवा उन्हाळा; कोरोना संसर्गावर वातावरणातील बदलांचा परिणाम नाही, रिसर्च

या प्रकारात आतड्याच्या भिंतींमध्ये हवा भरल्यामुळे (निमोनोसिस) पोट सूजते. ज्यामुळे त्या व्यक्तीने खाल्लेले अन्न पचत नाही आणि  गॅस, उत्सर्जन, उलट्या आणि अतिसार होण्याची समस्या उद्भवू लागते.  म्हणूनच, कोरोना रुग्णांच्या या अडचणी लक्षात घेता रुग्णांच्या पोटाचे इमेजिंग करताना रेडिओलॉजिस्ट्सना सतर्क राहण्याचा सल्ला संशोधकांनी दिला आहे. जेणेकरून ते स्वत: ला त्या संसर्गापासून वाचवू शकतील.

Web Title: CoronaVirus News in Marathi : Gastrointestinal symptoms in covid 19 patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.