Coronavirus : रक्त पिणाऱ्या जळूचा डॉक्टर घेत आहेत शोध, कोरोना रूग्णांच्या उपचारासाठी होणार वापर?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2021 02:01 PM2021-05-18T14:01:04+5:302021-05-18T14:05:27+5:30

Coronavirus : आयुर्वेदिक किंवा नैसर्गिक चिकित्सेत याचा वापर करून अनेक रोगांवर उपचार केले जातात. सध्या बिहारमध्ये या जळूंचा शोध कोरोना रूग्णांवर उपचारासाठी घेतला जात आहे.

Coronavirus : Mucormycosis treatment by leech therapy Ayurveda doctors search | Coronavirus : रक्त पिणाऱ्या जळूचा डॉक्टर घेत आहेत शोध, कोरोना रूग्णांच्या उपचारासाठी होणार वापर?

Coronavirus : रक्त पिणाऱ्या जळूचा डॉक्टर घेत आहेत शोध, कोरोना रूग्णांच्या उपचारासाठी होणार वापर?

googlenewsNext

जळवा किंवा जळू (Leech) एक असा जीव आहे जो रक्त पिण्यासाठी म्हणजेच रक्तमोक्षणासाठी ओळखला जातो. इतकंच नाही तर या रक्त पिणाऱ्या कीड्याचा वापर उपचारासाठीही केला जातो. हे ऐकायला जरी विचित्र वाटत असलं तरी खरं आहे. आयुर्वेदिक किंवा नैसर्गिक चिकित्सेत याचा वापर करून अनेक रोगांवर उपचार केले जातात. सध्या बिहारमध्ये या जळूंचा शोध कोरोना (Corona patient) रूग्णांवर उपचारासाठी घेतला जात आहे.

जळू शरीरातील नासलेलं रक्त शोषूण घेतो आणि मृत कोशिकांना नष्ट करतो. तज्ज्ञांनुसार, शरीराच्या एखाद्या अवयवाची जेव्हा त्वचा खराब होते आणि ब्लड सर्कुलेशन बंद होतं. तेव्हा मृत कोशिका अॅक्टिव करण्यासाठी जळू फारच फायदेशीर ठरतो. जळू दोन प्रकारचे असतात, एक विषारी आणि एक बिनविषारी. (हे पण वाचा : Plasma Therapy : का बंद करण्यात आला प्लाज्मा थेरपीने कोरोनाचा उपचार? जाणून घ्या कारण....)

आयुर्वेदिक उपचारात विषारी नसलेल्या जळूंचा वापर केला जातो. विषारी नसलेल्या जळूंची ओळख पटवणं फारच सोपं आहे. विषारी जळू गर्द काळ्या रंगाचे आणि खरबळीत त्वचा असलेले असतात. तर बिनविषारी जळू हे हिरव्या रंगाचे, चोपड्या त्वचेचे आणि विना केसांचे असतात.

पाटण्यातील राजकीय आयुर्वेदिक कॉलेजमध्ये सध्या या विषारी नसलेल्या जळूंचा शोध घेतला जात आहे.  कोरोनानंतर ब्लॅक फंगस म्हणजे म्यूकोरमायकोसिसची (mucormycosis) समस्या एक मोठं आव्हान ठरत आहे. सध्या या आजाराच्या उपचारासाठी कालाजारचं इंजेक्शन दिलं जातं आहे. हे इंजेक्शन फायदेशीर ठरत आहे. तर आयुर्वेदिक तज्ज्ञ जळूंचा वापर करून ब्लॅक फंगसवरील उपचाराचा शोध घेत आहेत.

आयुर्वेद तज्ज्ञांनुसार, शरीरात कुठेही एबनॉर्मल ग्रोथमध्ये किंवा डोळ्यात सूज झाली तर जळूंचा वापर करून चांगला उपचार केला जातो. डोळ्यांवर रक्त गोठलं तर त्यावर जळू ठेवला जातो आणि त्याने रक्त प्यायलं तर स्कीन नॉर्मन होते. पण ब्लॅक फंगसच्या उपचारासाठी जळूंचा वापर करणं फायदेशीर ठरेल हे अजून सिद्ध झालेलं नाही. तसेच सरकारनेही याला परवानगी दिलेली नाही.
 

Web Title: Coronavirus : Mucormycosis treatment by leech therapy Ayurveda doctors search

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.