कोरोना विषाणूंचा खात्मा करणार 'ही' टेक्निक; या ठिकाणी होत आहे सर्वात जास्त वापर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2020 09:50 AM2020-07-06T09:50:40+5:302020-07-06T09:53:30+5:30

CoronaVirus : या टेक्निकला लॅबमधून मान्यता देण्यात आली आहे. तसंच या एंटीव्हायरस नॅनो टेक्नोलॉजीचा वापर राष्ट्रपती भवनातही केला जात आहे. 

CoronaVirus : Covicoat techique to fight with coronavirus | कोरोना विषाणूंचा खात्मा करणार 'ही' टेक्निक; या ठिकाणी होत आहे सर्वात जास्त वापर

कोरोना विषाणूंचा खात्मा करणार 'ही' टेक्निक; या ठिकाणी होत आहे सर्वात जास्त वापर

Next

कोरोना व्हायरसचा कहर जगभरात वाढत चालला आहे. या माहामारीला आटोक्यात आणण्यासाठी सर्वच देशातील शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत. कोरोना व्हायरसचं संक्रमण रोखण्यासाठी आता एक नवीन टेक्निक समोर आली आहे. या टेक्निकचं नाव कोव्हिकोट आहे. यामुळे कोरोना व्हायरस एखादया भागावर असल्यास ९० दिवसांपर्यंत बचाव होऊ शकतो. या टेक्निकला लॅबमधून मान्यता देण्यात आली आहे. तसंच या एंटीव्हायरस नॅनो टेक्नोलॉजीचा वापर राष्ट्रपती भवनातही केला जात आहे. 

ऑफिस, लिफ्ट, गाडी, लॅपटॉप, मोबाईल फोन कोव्हिकोटमुळे सुरक्षित राहू शकतात. या प्रकारात सगळ्यात आधी एखाद्या परिसरावर स्प्रे केला जातो. त्यानंतर २ मिनिटांपर्यंत सोडले जाते. त्यामुळे ०.००१ माइक्रोनचा थर तयार होतो. यामुळे एक किंवा दोन आठवड्यांसाठी नाही तर ९० दिवसांपर्यंत व्हायरस आणि बॅक्टेरियांपासून सुरक्षा मिळते. कोव्हिकोट तयार करणाऱ्या कंपनीने दावा केला आहे की, त्यांचे हे उत्पादन कोणत्याही पृष्ठभागावर शिंपडल्यास ९० दिवसांपर्यंत व्हायरसपासून लांब राहता येऊ शकतं. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार हे उत्पादन NABL कडून मान्यता प्राप्त आहे. 

कोरोना से बचाव में कारगर है ये तकनीक, राष्ट्रपति भवन से मंदिरों तक में हो रहा इस्तेमाल

कोटींग केलेल्या ठिकाणी व्हायरस जीवंत राहू शकत नाही.

राष्ट्रपती भवन, परराष्ट्र मंत्रालयाचे कार्यालय, दिल्ली आणि तामिळनाडू पोलीस मुख्यालयात तसंच महाराष्ट्रातील मंत्रालयातही कोव्हिकोट टेक्निकचा वापर केला जात आहे. कोव्हिकोटचा वापर ज्या ठिकाणी केला जात आहे. तेथे कंपनीकडून सर्टिफिकेट सुद्धा देण्यात येत आहे की. कोरोनासारखा व्हायरस कोटींगनंतर ९० दिवसांपर्यंत या ठिकाणी राहू शकत नाही. 

अनेक धार्मिक स्थळांवर अल्कोहोलयुक्त सॅनिटायजेशन करण्यासाठी मनाई आहे. कारण  धार्मिक स्थळी अल्कोहोल अशुद्ध मानले दाते. त्यामुळे कोरोनापासून बचावासाठी अनेक ठिकाणी मंदिरांमध्ये कोव्हिकोट या टेक्निकचा वापर केला जात आहे. या टेक्निकसाठी भारत सरकारच्या सीएसआयआरकडून मान्यता मिळाली आहे. यात अल्कोहोलचा वापर केला जात नाही.  त्यामुळे याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. सध्याच्या घडीला  भारतात २ लाख ४४ हजार ८१४ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या १९ हजार २६८ हजारांवर पोहोचली आहे. कोरोनापासून बचावासाठी सोशल डिस्टेंसिंग आणि मास्कचा वापर शस्त्राप्रमाणे केला जात आहे. 

जीवाशी खेळ! कोरोना संक्रमित होण्यासाठी 30 हजार लोकांची तयारी...

काळजी वाढली! 'ही' समस्या असलेल्यांना दुसऱ्यांदा होऊ शकते कोरोना विषाणूंची लागण

Web Title: CoronaVirus : Covicoat techique to fight with coronavirus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.