CoronaVirus : "प्लाझ्मासाठी कोरोनामुक्त नागरिकांनी एक पाऊल पुढे टाकणे आवश्यक!" 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2021 08:49 AM2021-05-01T08:49:43+5:302021-05-01T08:51:34+5:30

CoronaVirus : ज्याचे वय १८ ते ५० वर्षा दरम्यान आहे व  ज्याचे वजन ५० किलोच्या पेक्षा जास्त आहे असा व्यक्ती प्लाझ्मा दान करू शकतो.

CoronaVirus: "Corona-free citizens need to go one step further for plasma!" | CoronaVirus : "प्लाझ्मासाठी कोरोनामुक्त नागरिकांनी एक पाऊल पुढे टाकणे आवश्यक!" 

CoronaVirus : "प्लाझ्मासाठी कोरोनामुक्त नागरिकांनी एक पाऊल पुढे टाकणे आवश्यक!" 

Next
ठळक मुद्देप्लाझ्मा थेरपी म्हणजे काय ? जाणून घ्या...

ठाणे : ठाणे शहरातील प्लाझ्माच्या वाढता तुटवडा रोखण्यासाठी समता विचार प्रसारक संस्थेने प्लाझ्मा आणि कोरोना औषधांची सोय करण्याच्या कामात पुढाकार घेतला आहे. ठाण्यात एखादा पेशन्ट हॉस्पिटलमध्ये दाखल केला की डॉक्टर उपचार केल्यानंतर पेशंटच्या नातेवाईकांना सांगून पेशन्टला लागणारे प्लाझ्मा, रेमडिसिव्हीर इंजेक्शन, tocilizumab इंजेक्शन, रक्त, ऑक्सिजन अशा अनेक साहित्याची जुळवा करण्यास सांगतात. (CoronaVirus: "Corona-free citizens need to go one step further for plasma!")

नातेवाईकांना शोधून किंवा घेऊन येण्यास सांगतात. पण पेशन्टच्या नातेवाईकांना पेशन्टची चिंता असते त्यामुळे ते घाबरून जातात. आवश्यक औषध कुठे मिळेल?  काय होईल? हे सर्व उपलब्ध शोधण्यास वेळ जातो म्हणून संस्था गेला एक महिना ह्यावर काम करीत आहे. कोरोनाची दुसरी लाट आली पण तिच्यातून वाचण्यासाठी तात्काळ  मदत मिळावी, या करीता संस्थेतर्फे सह खजिनदार आणि  जन आंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वयाचे (NAPM ) ठाणे शहर समन्वयक भोसले अजय महादेव आनंदी यांच्या संयोजनाखाली हे काम करत आहे. रात्र असो दिवस असो कमीत कमी 80 ते 100 कॉल येतात. त्यातून पेशन्टची माहिती, रिपोर्ट, घेऊन हे प्लाझ्मा, इंजेक्शन, कुठे मिळेल हे बघावे लागते. जिथे उपलब्ध होईल तिथून ते घ्यावे लागते.

सध्या प्लाझ्माच्या प्रचंड तुटवडा व रक्त पुरवठा पेढी यावर येणारा ताण बघता  संस्थे तर्फे तो कसा कमी करता येईल ह्यावर लक्ष केंदित केले आहे. कोरोना पोजिटिव्ह होऊन बरे झालेले रुग्णाना आवाहन करीत आहोत की आपण पुढे येऊन प्लझ्मा दान करावे कारण एका व्यक्तीच्या प्लाझ्मादानामुळे दोन जणांचे प्राण वाचतात. आमच्याकडे येणाऱ्या कॉलपैकी 20 ते 30 टक्के लोकांना आम्ही प्लाझ्मा देऊ शकतो. डोनर काही प्रमाणात पुढे येत आहेत  पण त्याची संख्या अंत्यत अल्प आहे. प्लाझ्मा मागण्यासाठी येणाऱ्या रुग्णाच्या नातेवाईकांचची संख्या मोठ्या प्रमाणत आहे. अनेकदा नातेवाईकांनाच डोनर शोधावा लागतो. प्लाझ्मा दानासाठी येणाऱ्या नागरिकांची अँटिबॉडीज आणि एच बी व अन्य चाचण्या रक्त पेढ्यात केल्या जातात त्यानंतर पेशन्टला प्लाझ्मा तयार होतो, अशी माहिती संस्थेच्या अध्यक्ष मनिषा जोशी यांनी दिली.

कोरोना काळात रुग्णावर प्लाझ्मा थेरपी व इंजेक्शनच्या प्रभाव दिसत असल्यामुळे त्याची मागणी वाढताना आपल्याला दिसते. सध्या कोरोनाच्या वाढत्या केसेस व मदतीच्या ओघ बघता संस्थे तर्फे ५५ रुग्णाना प्लाझ्मा , १९ रुग्णांना बेड, ०५  रक्तदात्याना रक्त पुरवठा,  ०३ रुग्णांना ऑक्सिजन , १८ रुग्णांना रेमडिसिव्ही इंजेक्शन हे सर्व उपलब्ध करून देण्यास यशस्वी ठरलो. काही जणांना मदत करता आली नाही व काही साधन उपलब्ध न झाल्यामुळे प्राण गमवावे लागले. म्हणूनच जास्तीत जास्त प्लाझ्मा दात्यांनी पुढे येण्याची गरज आहे. सर्व कोरोना मुक्त रुग्णांना संस्थेतर्फे आवाहन करत आहोत की सामाजिक जबाबदारी व कर्तव्य समजून सर्वांनी पुढे येऊन प्लाझ्मा दान करून रुग्णांचा जीव वाचवावयास सहाय्य करावे असे संस्थेच्या सचिव हर्षलता कदम यांनी सांगितले. 
       
प्लाझ्मा दानाबद्दल काही मूलभूत प्रश्न सर्वांच्या मनात असतात. त्याची सर्व साधारण माहिती...

 १) प्लाझ्मा थेरपी म्हणजे काय ?
          कोरोनातून पूर्णतः बरा झालेला व्यक्ती सुमारे २८ दिवस किंवा एक महिना नंतर प्लाझ्मादन करू शकतो. त्याचा प्लाझ्मा काढून तो कोरोनामुळे गंभीर स्थितीत असणाऱ्या व्यक्तीला देण्याची प्रक्रिया म्हणजे प्लाझ्मा थेरपी होय.

 २) प्लाझ्मा दान कोण करू शकतो ?
       ज्याचे वय १८ ते ५० वर्षा दरम्यान आहे व  ज्याचे वजन ५० किलोच्या पेक्षा जास्त आहे असा व्यक्ती प्लाझ्मा दान करू शकतो.. जी व्यक्ती कोरोना आजारातून पूर्ण बरी झालेली आणि डीचार्ज किंवा घरात विलगीकरणानंतर सुमारे २८ दिवस ते  एक महिना नंतर प्लझ्मा दान करू शकते. डोनरची अँटिबॉडीज आधी टेस्ट केली जाते व ते प्रमाण योग्य असल्यास प्लाझ्मा घेतला जातो.

 ३) प्लाझ्मादान कसे कराल? व प्लाझ्मा म्हणजे काय ?
     प्लाझ्मा हा रक्तातील एक पिवळसर द्रव्य घटक असून त्याच्या रक्तातील प्रमाण सुमारे ५० ते ६० टक्के असले त्यात जीवनावश्यक घटकद्रव्ये, पेशी, आणि विशेषतः प्रथिने असतात व ते मिळतात.

 ४) एक प्लाझ्मादाता किती मिली प्लाझ्मा दान करू शकतो ?
        साधारणपणे ४०० मिली प्लाझ्मा दान करू शकतो पण हॉस्पिटलमधील मागणीमुळे साधारण २०० मिली घेतले जाते.

 ५) एका गरजू व्यक्तीला किती मिली प्लाझ्मा देण्यात येतो ?
     एका रुग्णाला एकाचवेळी २०० मिली प्लाझ्मा देण्यात येतो.

 ६) प्लाझ्मादान केल्यावर पुन्हा कधी प्लाझ्मा दान करू शकतो ?
      सुमारे ७ ते १५ दिवसाने पुन्हा प्लाझ्मा दान करू शकतो.

 ७) प्लाझ्मादान केल्यामुळे दुष्परिणाम होतात का ?
     कोणतेही दुष्परिणाम किंवा संसर्ग होत नाही. प्लाझ्मा दात्याने दिलेला प्लाझ्मा शरीरात काही तासात पुन्हा तयार होतो.

 ८) प्लाझ्मा दान करण्यापूर्वी कोणी काळजी घ्यावी ?
      योग्य पौष्टिक आहार, पुरेशी झोप, द्रव पदार्थांचे सेवन जास्त असावे ,स्वतःला सध्या आणि तात्पुरत्या आरोग्या आजाराबाबत आणि सुरू असलेल्या गोळ्या औषधाबाबत डॉक्टरांच्या सल्ला व संपूर्ण माहिती घायची  व मद्यपान करून करू नये. इच्छा असेल तर 24 ते 48 तासा नंतर करावे.
 
९) कोरोनातून बरी झालेली व्यक्ती किती दिवसा पर्यत प्लाझ्मादान करू शकतो ?
  कोरोना संसर्गातून बरी झालेली व्यक्ती सुमारे चार ते सहा महिन्यांपर्यत प्लाझ्मा दान करू शकते.

Web Title: CoronaVirus: "Corona-free citizens need to go one step further for plasma!"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.