Coronavirus : कोरोनातून बऱ्या झालेल्या रूग्णांसाठी चिंतेची बाब, आयुष्यभरासाठी होऊ शकते 'ही' समस्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2020 04:35 PM2020-06-23T16:35:54+5:302020-06-23T16:48:04+5:30

ब्रिटनच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिसच्या गायडन्समध्ये सांगण्यात आलं आहे की, कोरोनातून ठीक होणाऱ्या 30 टक्के रूग्णांच्या फुप्फुसाला गंभीर इजा पोहोचू शकते.

Coronavirus can cause lasting lung damage | Coronavirus : कोरोनातून बऱ्या झालेल्या रूग्णांसाठी चिंतेची बाब, आयुष्यभरासाठी होऊ शकते 'ही' समस्या!

Coronavirus : कोरोनातून बऱ्या झालेल्या रूग्णांसाठी चिंतेची बाब, आयुष्यभरासाठी होऊ शकते 'ही' समस्या!

googlenewsNext

(Image Credit : sciencemag.org)

कोरोनाबाबत सतत वेगवेगळे रिसर्च समोर येत आहे. अशीच एक चिंताजनक माहिती एका रिसर्चमधून समोर आली आहे. या रिसर्चनुसार, कोरोनातून बरे झालेल्या प्रत्येक तीनपैकी एका रूग्णाला आयुष्यभर वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. खासकरून मोठ्या काळासाठी त्यांच्या फुप्फुसांनाही नुकसान पोहोचू शकतं. ब्रिटीश टेलिग्राफ वृत्तपत्राने इंग्लंडची मुख्य आरोग्य एजन्सी नॅशनल हेल्थ सर्व्हिसच्या गायडन्सने ही बाब प्रकाशित केली आहे.

ब्रिटनच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिसच्या गायडन्समध्ये सांगण्यात आलं आहे की, कोरोनातून ठीक होणाऱ्या 30 टक्के रूग्णांच्या फुप्फुसाला गंभीर इजा पोहोचू शकते. यांना सतत थकवा येण्याची समस्या आणि मानसिक समस्या होऊ शकते. तसेच ज्या रूग्णांनी आयसीयूमध्ये उपचार घेतले, त्यातील अर्ध्या लोकांमध्ये जास्त काळासाठी समस्या निर्माण होऊ शकतात.

हेल्थ एक्सपर्ट्सचं मत आहे की, याबाबत सतत पुरावे मिळत आहेत की, कोरोनामुळे शरीरात अस्थायी समस्या होऊ शकतात. कोरोनातून बरे झालेल्या लोकांच्या मेंदूलाही नुकसान पोहोचू शकतं आणि अल्झायमरचा धोकाही होऊ शकतो.

नॅशनल हेल्थ सर्व्हिसच्या कोविड रिकव्हरी सेंटरच्या प्रमुख हिलरी फ्लॉयड म्हणाल्या की, त्यांना याबाबत चिंता होत आहे की कोरोनामुळे लांब काळासाठी होणाऱ्या प्रभावाबाबत फार कमी माहिती उपलब्ध आहे. अनेक रूग्णांना कोरोना निगेटीव्ह आल्यानंतरही उपचाराची गरज पडते. 

हिलरी म्हणाल्या की, त्यांचे 40 ते 50 वर्षांचे जे रूग्ण बरे झाले आहेत, त्यांना आता अनेक प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. लोक आधी सगळं काही स्वत: करत होते. पण कोरोना निगेटीव्ह आल्यानंतर सुद्धा ते त्यांच्या बेडवरून उठू शकत नाहीयेत.

Coronavirus : अरेss बापरे...कोरोनाची लस यायला अडीच वर्षं लागणार; WHO काय म्हणतंय बघा!

Coronavirus : इम्यूनिटी वाढवण्यासाठी आयुर्वेदिक काढा घेताना घ्या काळजी, 'ही' 5 लक्षणे दिसली तर पडेल महागात!

Web Title: Coronavirus can cause lasting lung damage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.