Corona Virus : भारतात कोरोना रुग्णसंख्येत घट; ब्रिटनमध्ये AY.4.2 व्हेरिएंटने वाढवली चिंता, मार्चनंतर सर्वाधिक मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 01:28 PM2021-10-20T13:28:33+5:302021-10-20T13:32:56+5:30

Corona Virus : भारतात गेल्या 24 तासांमध्ये कोरोना व्हायरसची 14,623 नवीन प्रकरणे समोर आली आहेत.

Corona Virus Update Relief In India New Variant Britain Highest Daily Covid Death Toll Since Early March | Corona Virus : भारतात कोरोना रुग्णसंख्येत घट; ब्रिटनमध्ये AY.4.2 व्हेरिएंटने वाढवली चिंता, मार्चनंतर सर्वाधिक मृत्यू

Corona Virus : भारतात कोरोना रुग्णसंख्येत घट; ब्रिटनमध्ये AY.4.2 व्हेरिएंटने वाढवली चिंता, मार्चनंतर सर्वाधिक मृत्यू

Next

नवी दिल्ली : भारतामध्ये सध्या कोरोना व्हायरसच्या रुग्णसंख्येत घट होताना दिसून येत आहे. मात्र, ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसच्या डेल्टाचा नवीन व्हेरिएंट AY.4.2 ने चिंता वाढवली आहे. या नवीन व्हेरिएंटमुळे ब्रिटनमध्ये अनेक रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. त्यामुळे येथिल परिस्थिती गंभीर बनली आहे. ब्रिटनमध्ये मार्चनंतर कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. (Corona Virus Update Relief In India New Variant Britain Highest Daily Covid Death Toll Since Early March)

मंगळवारी ब्रिटनमध्ये कोरोनामुळे 223 मृत्यू झाले. यापूर्वी मार्च 2021 मध्ये 231 मृत्यू झाले होते. कोरोनाच्या AY.4.2 व्हेरिएंटमुळे ब्रिटनमधील लोकांची चिंता वाढली आहे, कारण गेल्या सोमवारी याठिकाणी कोरोनाची 49,156 प्रकरणे नोंदवली गेली. जुलैनंतरचा कोरोना रुग्णसंख्येचा हा सर्वात मोठा आकडा आहे.

इंग्लंडमध्ये कोरोना व्हायरसच्या डेल्टा व्हेरिएंटचा प्रादुर्भाव वाढत आहे. या व्हेरिएंटवर निरीक्षण ठेवले असून त्याचे मूल्यांकन केले जात आहे, असे ब्रिटनच्या आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. आरोग्य सुरक्षा यंत्रणेने सांगितले की, 'डेल्टाच्या नवीन व्हेरिएंटवर नियमितपणे नजर ठेवली जात आहे. नुकताच समोर आलेला हा कोरोना डेल्टाचा  AY.4.2 व्हेरिएंट  आहे. याशिवाय, डेल्टाच्या E484K आणि E484Q व्हेरिएंटशी संबंधित काही नवीन प्रकरणे देखील समोर येत आहेत.

भारतात कोरोना रुग्णांमध्ये होतेय घट
भारतात गेल्या 24 तासांमध्ये कोरोना व्हायरसची 14,623 नवीन प्रकरणे समोर आली आहेत. 19,446 बरे झाले आणि 197 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आतापर्यंत भारतात कोरोनाची 3,41,08,996 प्रकरणे समोर आली आहेत. तर अॅक्टिव्ह प्रकरणे 1,78,098 आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत भारतात 4.52 लाख लोकांनी आपला जीव गमावला आहे. भारतासाठी दिलासा देणारी बाब आहे की, अॅक्टिव्ह प्रकरणे अडीच लाखांवर आली आहेत. तसेच, देशात कोरोनाचे आर मूल्य देखील 1 पेक्षा कमी आहे.

दरम्यान, AY.4.2 कोरोना व्हेरिएंटला अद्याप व्हेरिएंट ऑफ कन्सर्न (VOC) किंवा व्हेरिएंट ऑफ इन्व्हेस्टिगेशन (VOI) मानले गेले नाही. हा व्हेरिएंट आधी जुलै 2021 मध्ये समोर आला होता. डेल्टा व्हेरिएंटच्या या नवीन व्हेरिएंटमध्ये काही नवीन म्यूटेशन आहेत, जे स्पाइक प्रोटीनवर परिणाम करतात.

Web Title: Corona Virus Update Relief In India New Variant Britain Highest Daily Covid Death Toll Since Early March

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.