Corona virus : घशात सूज आणि खवखव असू शकतं कोरोनाचं इन्फेक्शन, 'असा' करा बचाव

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2020 10:02 AM2020-03-19T10:02:51+5:302020-03-19T10:17:56+5:30

कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत असताना आपण गळ्याच्या समस्येकडे लक्ष देणं तितकचं गरजेचं आहे.

Corona virus: How to prevent from throat infection by using home remedies | Corona virus : घशात सूज आणि खवखव असू शकतं कोरोनाचं इन्फेक्शन, 'असा' करा बचाव

Corona virus : घशात सूज आणि खवखव असू शकतं कोरोनाचं इन्फेक्शन, 'असा' करा बचाव

googlenewsNext

कोरोना व्हायरस जगभरासह महाराष्ट्रात सुद्धा झपाट्याने पसरत चालला आहे.  तसंच वातावरणात घडत असलेल्या बदलांमुळे आरोग्यावर नकारात्मक परिणाम होत असतो.  कोरोना व्हायरसची लक्षणं काय आहेत हे तुम्हाला सगळ्यांना माहितच असेल. त्यात सर्दी, खोकला आणि तापासह गळ्याच्या समस्येचा सुद्धा समावेश होत आहे.

कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत असताना आपण गळ्याच्या समस्येकडे लक्ष देणं तितकचं गरजेचं आहे. आज आम्ही तुम्हाला घश्याची समस्या कशी दूर करायची हे सांगणार आहोत.  काही घरगुती उपायांचा वापर  करून  तुमच्या आरोग्याची काळजी घेऊ शकता. 

घशाची खवखव ही संसर्गजन्य असते आणि एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला होण्याचीही शक्यता असते. हा त्रास असणाऱ्या व्यक्तीच्या शिंकण्यातून, खोकण्यातून किंवा थुंकीतून व्हायरस किंवा बॅक्टेरिया पसरतात. या व्यक्तीने वापरलेल्या वस्तूंमुळे  दुसऱ्या व्यक्तीला हा त्रास होऊ शकतो.व्हायरसचं इन्फेक्शन आणि वातावरणात होत असलेले बदल, बोलण्यासाठी त्रास होणं,  घश्याला सुज येणं  अशा समस्या उद्भवतात.

कोरोनाची सुरूवातीची लक्षणं सुद्धा अशीच आहेत. तुम्ही याकडे दुर्लक्ष कराल तर महागात सुद्धा पडू शकतं. म्हणून या लहान समस्या वाढू न देता कमी वेळातच नष्ट करून आरोग्य चांगलं ठेवणं गरजेचं आहे.  घशाची खवखव टाळायची असल्यास तुम्ही हा त्रास होत असलेल्या लोकांपासून दूर राहावे. कारण हा त्रास संसर्गजन्य असतो. जर तुम्हाला हा त्रास जाणवू लागला तर हात आणि शरीराची स्वच्छता आवर्जून बाळगा. 

घसा दुखण्यावर घरगुती उपाय

हळद

हळदीचे अनेक औषधी गुण तुम्हाला माहीतच असतील. रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी सुद्धा हळदीचं सेवन करणं गरजेचं असतं. त्यासाठी  तुम्ही हळदीचे दुध प्या. त्यामुळे घशातील खवखव कमी होण्यासह इतर आजार दूर होतील.  हळदीसोबत गुळाचे सेवन कराल तर घसा दुखण्याची समस्या कमी होईल.याशिवाय वेलदोडा दाणे व साखर एकत्र चघळा. बसलेल्या घशावर कोमट केलेल्या मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करण्यानेही घसा दुखणे,  आणि घसा बसण्याची समस्या कमी होते. 

मेथीच्या बीया 

घशाच्या खवखवीवर घरगुती उपाय करताना तुम्ही मेथीचे दाणे किंवा मेथी घातलेला चहा पिऊ शकता. संशोधनात आढळलं आहे की, मेथी ही घसा दुखीपासून आराम देण्यासाठी गुणकारी आहे. ही घश्यातील बॅक्टेरियांचा नाश करते आणि यातील अँटीफंगल गुणांमुळे घश्याची सूज आणि जळजळ कमी होते. ( हे पण वाचा-Corona virus : कोरोनाची टेस्ट कशी होते, किती येतो खर्च.... जाणून घ्या)

काढा

घशाच्या दुखण्यासाठी औषधी काढा करून प्या. नुसत्या काळ्या मिरीचं सेवन केल्यानेही घशाला आराम मिळतो. काळी मिरी, बत्तासा, लवंग, तुळस घालून पाणी उकळवा. पाणी उकळून निम्म्याने कमी झालं की हा काढा पिण्यायोग्य झाला. या काढ्याने घशाची खवखव निघून जाते आणि घशाला आराम मिळतो. हे उपाय करून तुम्ही कोरोनाच्या इन्फेक्शनपासून लांब राहू शकता. ( हे पण वाचा- CoronaVirus: लस किंवा औषध नसतानाही बरा होतोय कोरोना?... माहित्येय का कसा?)

Web Title: Corona virus: How to prevent from throat infection by using home remedies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.