Corona virus : कोरोनाची टेस्ट कशी होते, किती येतो खर्च.... जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2020 04:15 PM2020-03-18T16:15:21+5:302020-03-18T16:16:36+5:30

कोरोना व्हायरसचे निदान कोणती टेस्ट करायची, किती खर्च येतो. ते आज आम्ही  तम्हाला सांगणार आहोत.

Corona virus : coronavirus in india covid 19 helpline number in india where to do test of coronavirus myb | Corona virus : कोरोनाची टेस्ट कशी होते, किती येतो खर्च.... जाणून घ्या

Corona virus : कोरोनाची टेस्ट कशी होते, किती येतो खर्च.... जाणून घ्या

Next

कोरोना व्हायरसचा वाढता धोका पाहता ज्या लोकांना सर्दी, खोकला, ताप किंवा अन्य काही आजारपण जाणवत असेल, अशा व्यक्तींनी तपासणी  करणं गरजेचं आहे. त्यामुळे कोरोना व्हायरसचं संक्रमण झाल्यास इतर व्यक्तींना होणार नाही. कारण  कोरोना व्हायरसच्या अनेक घटना तुम्ही पाहिल्या असतील ज्यात कोरोनामुळे एक व्यक्ती नाही तर त्याचं संपूर्ण कुटुंब  इन्फेक्टेड होत आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल  कोरोना व्हायरसचे निदान  करण्यासाठी कोणती टेस्ट करायची, किती खर्च येतो. ते आज आम्ही  तम्हाला सांगणार आहोत.

टेस्ट कशी कराल

कोरोना व्हायरससंबंधी टेस्ट तुम्ही जवळच्या हॉस्पीटलमध्ये जाऊन करू शकता. त्यासाठी तुम्हाला आधी हेल्पलाईन क्रमांकावर कॉल करावा लागेल.

कोरोना व्हायरसच्या तपासणीसाठी हेल्पलाईन नंबर

हेल्पलाईन क्रमांकावर तुम्ही कॉल केल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यावेळी तुम्ही परदेशात प्रवास आलात का किंवा परदेशातूनन आलेल्या व्यक्तीच्या संपर्कात होतात का असे प्रश्न विचारले जातील. त्यानंतर तुम्हाला सेवा पुरवली जाईल हा नंबर प्रत्येक राज्याप्रमाणे वेगळा असेल. तसंच कोरोना व्हायरसची टेस्ट तुम्हाला मोफत करून देण्यात येईल.020-26127394 या क्रमांकावर संपर्क साधून तुम्ही कोरोनाची तपासणी करून  घेऊ शकता.

ही आहेत कारणं

कोरोना व्हायरसने पिडित असलेला एखादा व्यक्ती तर तुमच्या आजूबाजूला शिंकत किंवा खोकत असेल तर त्याच्या श्वासांतून येत असलेले व्हायरस हवेत पसरून तुम्ही जेव्हा श्वास घ्यास तेव्हा कोरोना व्हायरस होण्याची शक्यता असते. ( हे पण वाचा-Corona virus : 'या' उपायांनी फोनमुळे होणाऱ्या बॅक्टेरीअल आणि व्हायरल इन्फेक्शनचा टळेल धोका)

 तसंच कोरोना विषाणू खोकल्यामुळे किंवा शिंकण्याद्वारे हवेत पसरलेल्या सुक्ष्म कणात पसरतो. डोळ्याद्वारे, नाकाद्वारे प्रभावित व्यक्तीकडून जवळच्या लोकांच्या शरीरात प्रवेश करू शकतो.  ( हे पण वाचा- पुरूषांपेक्षा महिलांमध्ये वेगळी असतात हार्ट फेल्युअरची लक्षणं, जाणून घ्या कोणती)

ऑफिसमध्ये तुम्ही रोज ८ ते ९ तास घालवत असता. ऑफिसमधील काही वस्तु अशा असतात. ज्यांच्या संपर्कात आल्यामुळे तुमच्या शरीरावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.   लिफ्ट, दरवाज्याचे हॅण्डल अशा गोष्टींना इन्फेक्टेड व्यक्तीने स्पर्श केलेला असू शकतो. त्यामुळे  कोरोना व्हायरस तुमच्या शरीरात प्रवेश करू शकतो. म्हणूनच कोणतंही आजारपण अंगावर न काढता तपासणी करणं गरजेचं आहे.

Web Title: Corona virus : coronavirus in india covid 19 helpline number in india where to do test of coronavirus myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.