आता कोरोना रिपोर्ट येणार २० सेकंदात, तोही फक्त १०० रुपये खर्च करुन...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2021 10:13 AM2021-10-07T10:13:18+5:302021-10-07T10:19:22+5:30

उत्तर प्रदेशमधील प्रयागराजच्या मोतीलाल नेहरू नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधील (MNIT) वैज्ञानिकांनी एक नवा पर्याय समोर आणला आहे. एमएनआयटीचे वैज्ञानिक आता एक असं मशीन तयार करत आहेत, की ज्याच्या मदतीने तुम्ही घरबसल्या अवघ्या २० सेकंदांमध्ये कोविड चाचणी अहवाल मिळवू शकता.

corona test report in 20 seconds for cost 100 rupees machine invented by mnit | आता कोरोना रिपोर्ट येणार २० सेकंदात, तोही फक्त १०० रुपये खर्च करुन...

आता कोरोना रिपोर्ट येणार २० सेकंदात, तोही फक्त १०० रुपये खर्च करुन...

googlenewsNext

सध्या एका शहरातून दुसरीकडे जाण्यासाठी किंवा अन्य अनेक गोष्टींसाठी कोरोना चाचणी (Corona test) अहवाल बंधनकारक करण्यात आला आहे. हा अहवाल येण्यासाठी कमीत कमी एका दिवसाचा कालावधी तरी आवश्यक असतोच. तसंच खासगी ठिकाणी कोरोना चाचणी (Corona test report) करण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्चही येतो. यावर पर्याय म्हणून उत्तर प्रदेशमधील प्रयागराजच्या मोतीलाल नेहरू नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधील (MNIT) वैज्ञानिकांनी एक नवा पर्याय समोर आणला आहे.

एमएनआयटीचे वैज्ञानिक आता एक असं मशीन (MNIT covid test machine) तयार करत आहेत, की ज्याच्या मदतीने तुम्ही घरबसल्या अवघ्या २० सेकंदांमध्ये कोविड चाचणी (Covid test in 20 seconds) अहवाल मिळवू शकता. तसंच, यासाठी तुम्हाला केवळ १०० रुपये खर्च (Covid test in 100 rupees) करण्याची गरज भासणार आहे.

हे एक हाय टेक फोल्डिंग पोर्टेबल (High tech portable covid test machine) मशीन असेल, ज्यामध्ये डीप एक्स डिव्हाइस असेल. डीप एक्स डिव्हाइसचं सॉफ्टवेअर एका पोर्टेबल एक्सरे स्कॅनरशी (Portable scanner) जोडलेलं असेल. हा पोर्टेबल स्कॅनर एखाद्या व्यक्तीच्या फुफ्फुसांना स्कॅन करेल. यातून मिळणारा डेटा सॉफ्टवेअरला शेअर केला जाईल. याद्वारे त्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे की नाही याबाबत माहिती मिळू शकेल.

विशेष म्हणजे, ही सगळी प्रक्रिया करण्यासाठी या मशीनला अवघ्या २० सेकंदांचा कालावधी लागेल. स्कॅनिंग पूर्ण झाल्यानंतर, तातडीने तुम्हाला कोरोना अहवाल मिळून जाईल. हे मशीन एका छोट्या सूटकेसमधून कुठेही घेऊन जाता येईल एवढं लहान असेल. तसंच, या मशीनच्या मदतीने एका चाचणीसाठी केवळ १०० रुपये खर्च येणार आहे.

Web Title: corona test report in 20 seconds for cost 100 rupees machine invented by mnit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.