Corona symptoms : तुम्हालाही असू शकतो कोरोनाचा संसर्ग जर खोकताना जाणवतील 'हे' ५ बदल; वेळीच सावध व्हा 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2021 09:26 AM2021-04-25T09:26:38+5:302021-04-25T09:33:56+5:30

Corona symptoms : एका अभ्यासानुसार ६८ टक्के लोकांना सुक्या खोकल्याचं लक्षण जाणवत आहे. 

Corona symptoms : 5 signs tells that you are corona positive and not cold or flu | Corona symptoms : तुम्हालाही असू शकतो कोरोनाचा संसर्ग जर खोकताना जाणवतील 'हे' ५ बदल; वेळीच सावध व्हा 

Corona symptoms : तुम्हालाही असू शकतो कोरोनाचा संसर्ग जर खोकताना जाणवतील 'हे' ५ बदल; वेळीच सावध व्हा 

Next

कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेत मास्कचा वापर, सोशल डिस्टेंसिंग ठेवणं खूप गरजेचं झालं आहे. कोरोनाच्या या संकटात तुम्हाला जराही त्रास होत असेल तर घरातच राहून स्वतःची काळजी घ्यायला हवी. साधा खोकला आणि कोरोनाचे संक्रमण झाल्यानंतर येत असलेल्या खोकल्यात बदल दिसून येतो. काही विशेष गोष्टींवर लक्ष दिल्यास तुम्ही या लक्षणांमधला फरक सहज ओळखू शकता. 

कॉमन कोल्ड किंवा कोरोना व्हायरस तुमच्या अपर रेस्पिरेटरी ट्रॅकला प्रभावित करतो. रेस्पिरेटरी ट्रॅकला प्रभावित करणारे व्हायरस संपर्कात येऊ लागतात लहान लहान ड्रॉपलेट्स, शिंकताना किंवा खोकताना एकमेकांच्या अंगावर पडल्यानं संक्रमण पसरू शकतं. पण कॉमन कोल्ड आणि कोरोना व्हायरसचं संक्रमण हे दोन्ही वेगळे व्हायरस असून तुलनेने कोरोनाची लक्षणं अधिक तीव्र आणि गंभीर असतात. 

सुका खोकला

सुखा खोकला कोरोना व्हायरसचं सामान्य लक्षण आहे. एका रिपोर्टमध्ये करण्यात आलेल्या दाव्यानुसार  ५९ ते ८२ टक्के कोरोना रुग्णांना सुरूवातीला सुका खोकला  जाणवतो. जागतिक आरोग्य संघटनेकडून चीनमध्ये फेब्रुवारी २०२० मध्ये करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार ६८ टक्के लोकांना सुक्या खोकल्याचं लक्षण जाणवत आहे. 

कसा असतो सुका खोकला?

सुका खोकला म्हणजे खोकताना रुग्णाला कफची समस्या जाणवत नाही.  साधारणपणे  कोल्ड किंवा फ्लूमध्ये अशा प्रकारची लक्षणं दिसून येतात. सुका खोकला एलर्जीचेही संकेत असू शकतो. म्हणून कोरोनाची चाचणी लगेचच करून घ्या.

सतत खोकल्याची समस्या

जर तुम्हाला सतत खोकला येत असेल तर हे सुद्धा कोरोना संक्रमित असल्याचे लक्षण असू शकतं.  कोरोना रुग्ण खोकत असताना खूप आवाज निर्माण होतो. त्यामुळे व्यक्तीच्या आवाजावरही परिणाम होतो.  कारण सतत खोकल्यानं घश्यातील एअरवेज खराब होतात. 

 कोरोना संक्रमणाचा धोका ३१ टक्क्यांनी कमी करणार हा सोपा उपाय; संशोधनातून खुलासा

श्वास घ्यायला त्रास होणं

खोकल्यासह, श्वास घ्यायला त्रास होणं हे कोरोनाचं सगळ्यात मोठं लक्षण आहे. अशा स्थितीत अनेकदा रुग्णाला दम लागण्याची शक्यता असते. अभ्यासानुसार कोरोना व्हायरसच्या ४० टक्के रुग्णांना या समस्येचा सामना करावा लागत आहे.

घसा खवखवणं 

घसा खवखवणं  हे सामान्य आजार किंवा कोरोना व्हायरसचं संक्रमण या दोन्ही कारणांमुळे असू शकते.  कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे नाक, घश्यात सूज आल्यानं  त्रास वाढू शकतो. तुम्हाला सुका खोकला, थकवा यांसह घश्यात खवखव जाणवत असेल तर संसर्ग झालेला असू शकतो. 

कौतुकास्पद! १३ महिन्यात एकही पॉझिटिव्ह केस नाही, कोरोनाच्या लाटेपासून भारतातल्या गावानं 'असा' केला बचाव

किंग्स कॉलेज लंडनचे प्राध्यापक स्पेक्टर आणि वैज्ञानिकांनी एक सिम्टम्स ट्रॅकिंग अ‍ॅप तयार केलं आहे. ज्याद्वारे ब्रिटनमधील लाखो लोक आपल्या लक्षणांबाबत रिपोर्ट करत आहेत. या अ‍ॅपद्वारे एक यादी तयार करण्यात आली आहे, जी खालीलप्रमाणे आहे.

१) चव आणि गंध जाणे

२) सतत खोकला येणे

३) थकवा

४) भूक कमी लागणे

५) त्वचेवर चट्टे येणे

६) पीत्त होणे

७) ताप येणे

८) मांसपेशींमध्ये वेदना

९) श्वास घ्यायला त्रास

१०) जुलाब

११) बेशुद्ध पडणे

१२) पोट दुखणे

१३) छातीत दुखणे

१४) घशात खवखव

१५) डोळे दुखणे

१६) घसा दुखणे

१७) मळमळ किंवा उलटी

१८) डोकेदुखी

१९) चक्कर येणे किंवा कमी दिसणे
 

Web Title: Corona symptoms : 5 signs tells that you are corona positive and not cold or flu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.