माठातले गारेगार पाणी...उजळते काया अन् ठेवी आजार दूर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2021 05:35 PM2021-05-17T17:35:17+5:302021-05-17T17:36:16+5:30

उन्हाळ्यात फ्रीज मधील पाणी पिण्याचा मोह टाळा. त्याऐवजी माठातलं गारेगार पाणी प्या. बघा आरोग्यात कसा चटकन फरक पडतो.

Cold water from mud pot; brightens the body and removes the disease | माठातले गारेगार पाणी...उजळते काया अन् ठेवी आजार दूर

माठातले गारेगार पाणी...उजळते काया अन् ठेवी आजार दूर

Next

उन्हाळा म्हटला की थंड पाणी सतत प्यावेसे वाटते. काहीजण अशावेळी फ्रीजमध्ये थंड केलेले पाणी सतत पितात. पण यामुळे आपण सर्दी, खोकला, ताप या आजारांना निमंत्रण देतो. त्यामुळे या काळात माठातील पाणी पिण्याचा सल्ला तज्ज्ञ मंडळी देतात. माठातील पाणी पिण्याचे इतरही काही फायदे आहेत.


पचनक्रिया सुधारते
प्लास्टिकच्या भांड्यात पाणी साठवणे अत्यंत अयोग्य आहे. प्लास्टिकमध्ये बीपीएसारखी हानिकारक रसायने असतात.  माठ हा मातीपासून बनवला जातो. त्यात कोणतेही रासायनिक घटक नसतात त्यामुळे पचनक्रिया सुधारण्यात माठातील पाणी महत्वाची भूमिका बजावते. याशिवाय अनेक गंभीर आजाराही दूर राहतात. 

घश्याशी संबधित आजारांना दूर ठेवते
वर नमुद केल्याप्रमाणे फ्रीजमधील पाणी प्यायल्याने घशाशी संबधित आजार होतात. पण माठातील पाणी प्यायलाने उलट हे आजार दूर राहतात. फ्रिजमधील थंड पाणी घशातील पेशींचे नुकसान करण्यास कारणीभूत ठरते. माठातील पाणी प्यायल्यामुळे कोणताही धोका उद्भवत नाही.

त्वचा चमकदार होते
सकाळी उठल्यावर काहीही न खाता सर्वात आधी माठातील पाणी प्या. यामुळे तुमचं रक्तशुद्धीकरण होईलच पण तुमचा चेहरा तजेलदार राहिल. असे रोज केल्याने तुमचा चेहरा चमकदार दिसू लागेल.

पित्तनाशक
माठातील पाणी प्यायल्यामुळे आपल्या शरीरातील पीएच संतुलित राहते. त्यामुळे गॅस आणि अ‍ॅसिडिटीशी संबंधित समस्या उद्भवत नाहीत.

उष्माघात रोखते
उन्हाळ्यात उष्माघात रोखण्यासाठी माठातील पाणी निश्चित प्यावे. तसेच त्या्मुळे शरीरात ग्लूकोजची पातळी वाढण्यास मदत होते. माठातील पाण्यात भरपूर जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. ज्यामुळे शरीर थंड तर राहतेच पण आरोग्यावरही त्याचा उत्तम परिणाम होतो. 

रोगप्रतिकारशक्ती वाढते
माठातील पाणी प्यायल्याने आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते. तसेच शरीरात टेस्टोस्टेरॉनची पातळी वाढण्यासही मदत होते.

Web Title: Cold water from mud pot; brightens the body and removes the disease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.