....म्हणून फक्त सिगारेटच नाही तर सिगारेटचं थोटुकही ठरू शकतं जीवघेणं; तज्ज्ञांचा दावा

By Manali.bagul | Published: October 6, 2020 06:08 PM2020-10-06T18:08:02+5:302020-10-06T18:17:04+5:30

सिगारेटचं थोटुक अनेकदा घरात किंवा बाहेर ट्रेमध्ये तसेच टाकलं जातं. तुमचा विश्वास बसणार नाही पण सिगारेटचं थोटुक ट्रेमध्ये पडून राहणं सिगारेट ओढण्याइतकंच जीवघेणं ठरू शकतं. 

Cigarette Butts in an Ashtray are More Dangerous Than You Think experts says | ....म्हणून फक्त सिगारेटच नाही तर सिगारेटचं थोटुकही ठरू शकतं जीवघेणं; तज्ज्ञांचा दावा

....म्हणून फक्त सिगारेटच नाही तर सिगारेटचं थोटुकही ठरू शकतं जीवघेणं; तज्ज्ञांचा दावा

googlenewsNext

सिगारेट ओढल्याने शरीरावर  होणारे दुष्परिणाम तुम्हाला माहीत असतील. तंबाखू किंवा  सिगारेटचं अतिसेवन  शरीरासाठी जीवघेणं ठरू शकतं.  सिगारेटमध्ये निकोटीन, कार्बन मोनोऑक्साईड अशा पदार्थांचा वापर केलेला असतो. या मादक पदार्थांमुळे तुमच्या श्वसनप्रक्रियेसह, फुफ्फुसांवरही गंभीर परिणाम होतो.  स्मोकिंगमुळे शरीरावर होणारे परिणाम हे दीर्घकाळ तसेच राहू शकतात. तुम्ही जरी सिगारेटचं सेवन करत नसलात तरी पेटलेली सिगारेट आजूबाजूला असणं शरीरासाठी धोकादायक ठरू शकते.  सिगारेटचं थोटुक अनेकदा घरात किंवा बाहेर ट्रेमध्ये तसेच टाकलं जातं. तुमचा विश्वास बसणार नाही पण सिगारेटचं थोटुक  ट्रेमध्ये पडून राहणं सिगारेट ओढण्याइतकंच जीवघेणं ठरू शकतं. 

यामध्ये वापरात असलेल्या हानीकारक प्लास्टीकमुळे पर्यावरणावरावर नकारात्मक परिणाम  होतो. यातील विषारी पदार्थ हवेत मिसळ्याने सगळ्यांच्याच आरोग्याला धोका उद्भवू शकतो. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार यातून हे स्पष्ट होतं की, सिगारेट ओढत असलेल्यांनाचं नाही तर नॉन स्मोकर्स म्हणजेच सिगारेट ओढत नसलेल्यांनाही याचा फटका बसू शकतो.

 नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्टॅडर्ड टेक्नोलॉजीच्या तज्ज्ञांना दिसून आले की, सिगारेटचे थोटुक जळत असलेल्या सिगारेटच्या तुलनेत  १५ टक्के जास्त निकोटीन बाहेर टाकते. घरात आणि कारमध्ये अनेकदा सिगारेटचं थोटुक असंच ट्रेमध्ये तासनंतास पडून असतं. त्यामुळे संपर्कात असलेल्या सगळ्यांच्याच आरोग्याला धोका उद्भवू शकतो. यामुळे कोणतंही व्यसन करत नसलेल्या लोकांच्या शरीरातही निकोटीनचं प्रमाण वाढण्याचा धोका असतो. असे तज्ज्ञ पॉपेंडीएक यांनी सांगितले. 

याशिवाय सिगरेटचे फिल्टर हे एक प्रकारच्या प्लास्टिकपासून बनवलेले असतात. ज्याला सेल्युलोज एसिटेट म्हणतात. याच सेल्युलोज एसिटेटचे जैविक पद्धतीने विघटन होण्यासाठी कमीत कमी १८ महिने तर १० वर्षाचा कालावधी लागतो. पण तुम्ही सिगरेट कुठे फेकली आहे. त्यावरच ती किती वेळात नष्ट  होऊ शकते हे अवलंबून आहे.  FDA Food and Drug Administration (FDA) कडून सिगारेट ओढण्याची सवय आणि त्यामुळे पर्यावरण आणि लोकांवर होणारे दुष्परिणाम यांवर विश्लेषण करण्यात आले आहे. चिंताजनक! कोरोना संक्रमणानंतर उद्भवू शकते 'लॉन्ग कोविड' ची समस्या; तज्ज्ञांचा धोक्याचा इशारा

यासंबंधी  तपासणी पूर्ण करण्यासाठी तज्ञांनी एक 'धूम्रपान मशीन' या गॅझेटचा उपयोग केला  जातो. २ हजारांपेक्षा जास्त सिगारेट्सचा वापर यासाठी करण्यात येतो.  सिगारेटच्या थोटुकामुळे होणारं नुकसान टाळण्यासाठी रस्त्यावर किंवा उघड्यावर ट्रेमध्ये  सिगारेट फेकण्यापेक्षा काचेच्या, धातूच्या बाटलीचा उपयोग  सिगारेटचं थोटुक फेकण्यासाठी केल्यास होणारं नुकसान टाळता येऊ शकतं.  coronavirus: भारतात वृद्धांपेक्षा तरुणांमध्येच दिसून आला कोरोनाचा कहर, समोर आली धक्कादायक आकडेवारी

Web Title: Cigarette Butts in an Ashtray are More Dangerous Than You Think experts says

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.