सुहाना खान आणि जान्हवी कपूर शिकतायत बेली डान्स; फिटनेससाठी फायदेच फायदे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2019 02:26 PM2019-08-08T14:26:09+5:302019-08-08T14:32:12+5:30

इन्स्टाग्रामवर गेल्या काही दिवसांपासून या स्टार किड्सचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. यांच्यासाठी फिटनेस फक्त जिमपुरती मर्यादित राहिली नाही तर जिम व्यतिरिक्त आता या योगाभ्यास आणि डान्सवरही फोकस करत आहेत.

Celebrity fitness how to keep yourself fit with belly dance like suhana khan jhanvi kapoor shanaya kapoor know its health benfits | सुहाना खान आणि जान्हवी कपूर शिकतायत बेली डान्स; फिटनेससाठी फायदेच फायदे

सुहाना खान आणि जान्हवी कपूर शिकतायत बेली डान्स; फिटनेससाठी फायदेच फायदे

googlenewsNext

बॉलिवूडसेलिब्रिटी नेहमीच आपल्या फिटनेसबाबत नेहमीच काळजी घेताना दिसतात. फक्त बॉलिवूडसेलिब्रिटीच नाहीतर स्टार किड्सही फिटनेस मेन्टेन करण्यासाठी अनेक उपाय करताना दिसतात. मग धडक गर्ल जान्हवी कपूर असो किंवा किंग खानची मुलगी सुहाना खान. या दोघींसोबतच अभिनेते संजय कपूर यांची मुलगी शनाया कपूरही आपल्या फिटनेसची काळजी घेताना दिसून येत आहे. या सर्वांनी फिटनेसची एक वेगळीच लेव्हल सेट केली आहे. 

इन्स्टाग्रामवर गेल्या काही दिवसांपासून या स्टार किड्सचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. यांच्यासाठी फिटनेस फक्त जिमपुरती मर्यादित राहिली नाही तर जिम व्यतिरिक्त आता या योगाभ्यास आणि डान्सवरही फोकस करत आहेत. स्‍लिम-ट्रिम दिसण्यामध्ये इतर स्टार किड्सच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी या सध्या भारतातील इंटरनॅशनल लेवलची बेली डान्सर संजना मुठरेजाकडून बेली डान्सिंगची ट्रेनिंग घेण्यास सुरुवात केली आहे. 

काही दिवसांपूर्वीच आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून संजनाने सुहाना खान आणि शनाया कपूरसोबत एक फोटो शेअर केला आहे. जो पाहून तुम्ही अंदाज लावू शकता की, स्टार किड्स बेली डान्सिंगला किती सिरिअसली घेऊ लागल्या आहेत. बेली डान्सिंगचे आरोग्यासाठी अनेक फायदे होतात. त्यामुळे बेली डान्सचा फक्त डान्स म्हणूनच नाहीतर एक्सरसाइज म्हणून रूटिनमध्ये समावेश करू शकता. रेग्युलर बेसिसवर शरीर फ्लेक्सिबल करण्यासाठी तसेच लठ्ठपणा दूर ठेवण्यासाठी तुम्ही बेली डान्सचा क्लास जॉइन करू शकता. 

पाहा जान्हवी कपूरचा बेलि डान्स व्हिडीओ : 

जाणून घेऊया बेलि डान्सिंगचे फायदे : 

आत्मविश्वास वाढतो आणि तणाव घटतो 

बेली डान्स तुमच्या शरीराला संतुलित करून तुमचा आत्मविश्वास वाढवतो. त्याचबरोबर मानसिक तणाव आणि डिप्रेशनच्या परिस्थितीपासून सुटका करण्यासाठही मदत करतो. 

एक्सरसाइज म्हणूनही फायदेशीर 

जर तुम्हाला दररोज वर्कआउट करायला आवडत नसेल तर तुम्ही बेलि डान्स करत एक्सरसाइज करू शकता. नियमितपणे बेलि डान्स केल्याने स्नायू बळकट होण्यास मदत होते आणि शरीराचा स्टॅमिनाही वाढतो. 

पचनक्रिया सुरळीत करतो

डान्समुळे संपूर्ण शरीराचा व्यायाम होण्यास मदत होते. तसेच शरीर लवचिक होण्यासही मदत होते. कंबर दुखीसारखे त्रास दूर होतात. एवडचं नाहीतर पचनक्रिया सुरळीत होऊन भूकही लागते. 

बॉडी स्लिम-ट्रिम होते

बेली डान्स नियमितपणे केल्याने शरीरातील कॅलरी बर्न होतात. ज्यामुळे फॅट लॉस होतं आणि तुम्हाला टोन्ड बॉडी मिळण्यासही मदत होते. 

हृदयासाठी फायदेशीर 

रेग्युलर बेलि डान्स केल्यामुळे याचा थेट परिणाम तुमच्या हृदयावर होतो. कारण बेलि डान्स करण्यासाठी संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो. त्यामुळे शरीरातील ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होतं. 

टिप : वरील सर्व उपाय आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं. 

Web Title: Celebrity fitness how to keep yourself fit with belly dance like suhana khan jhanvi kapoor shanaya kapoor know its health benfits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.