ब्रेस्ट कॅन्सरची सुरूवातीची लक्षणे कशी कळणार? घरीच 'अशी' करा ब्रेस्टची तपासणी!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2020 10:33 AM2020-01-07T10:33:05+5:302020-01-07T10:42:37+5:30

भारताबाबत सांगायचं तर आपल्या देशात २५ ते ३२ टक्के महिला ब्रेस्ट कॅन्सरच्या शिकार होत आहेत.

Breast Cancer : You can Examine your breast at home | ब्रेस्ट कॅन्सरची सुरूवातीची लक्षणे कशी कळणार? घरीच 'अशी' करा ब्रेस्टची तपासणी!

ब्रेस्ट कॅन्सरची सुरूवातीची लक्षणे कशी कळणार? घरीच 'अशी' करा ब्रेस्टची तपासणी!

googlenewsNext

जगभरातील लोकांना वेगाने शिकार करणारा आजार म्हणजे कॅन्सर आणि महिलांमध्ये सर्वाच जास्त आढळणारा कॅन्सर म्हणजेच ब्रेस्ट कॅन्सर. भारताबाबत सांगायचं तर आपल्या देशात २५ ते ३२ टक्के महिला ब्रेस्ट कॅन्सरच्या शिकार होत आहेत. अशात जर वेळीच ब्रेस्टची तपासणी केली तर सुरूवातीच्या स्टेजमध्येच यावर योग्य ते उपचार करता येतील. डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करण्याआधीच तुम्ही घरीच तुमच्या ब्रेस्टचं निरीक्षण करून सुरूवातीच्या लक्षणांची माहिती मिळवू शकता. यासाठीच्या स्टेप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

सर्वात पहिली स्टेप

(Image Credit : verywellhealth.com)

आरशासमोर उभे रहा आणि यावेळी रूममध्ये भरपूर प्रकाश असावा. आता तुमचे खांदे सरळ ठेवा, हात सुद्धा रिलॅक्स ठेवा आणि नंतर ब्रेस्टमध्ये कोणत्याही प्रकारची गाठ, साईजमध्ये फरक, ब्रेस्ट शेपमध्ये फरक किंवा कोणत्याही प्रकारचा बदल दिसतो का हे तपासा.

निप्पल्सची तपासणी

(Image Credit : wikihow.com)

ब्रेस्टनंतर निप्पल्सची तपासणी करा. निप्पल्सचा रंग तर बदलत नाहीये हे याची खात्री करून घ्या किंवा त्यावर कोणत्याही प्रकारची डाग वा चट्टा नाही ना हेही बघा. तसेच निप्पल थोडं प्रेस करून बघा की, त्यातून कशाप्रकारचं द्रव्य तर येत नाही ना. 

आर्मपिटचं निरीक्षण

ब्रेस्ट कॅन्सरसाठी केवळ ब्रेस्टच नाही तर आर्मपिटचं योग्य निरीक्षण करणंही गरजेचं आहे. यासाठी दोन्ही हात वर करा आणि आर्मपिटची व्यवस्थित तपासणी करा. आर्मपिटवर कोणत्याही प्रकारची गाठ नाही ना याची खात्री करून घ्या. दोन्ही आर्मपिट आणि अंडरआर्म्सला चेक करा.

ब्रेस्ट टिशू

आपल्या ब्रेस्ट टिशूला म्हणजे संपूर्ण ब्रेस्टवर हलका दबाव टाकून हे बघा की, गाठ तर नाही ना. अंडरआर्म्सपासून ते ब्रेस्टपर्यंत सगळीकडे कुठेच गाठ नाही किंवा चट्टे नाही याची खात्री करा.

पीरियड्सच्या ३ ते ५ दिवसांनंतर चेक करा

(Image Credit : wikihow.com)

ब्रेस्ट एग्झामिनेशनचा सर्वात चांगला वेळ पीरियड्सच्या ३ ते ५ दिवसानंतरचा असतो. कारण पीरियड्सच्या ५ दिवसांनंतर ब्रेस्टमध्ये सूज नसते आणि चेक करणं सोपं जातं. दर महिन्यात १० मिनिटांचा वेळ काढून अशाप्रकारे ब्रेस्ट चेक केले पाहिजेत. याने वेळीच काही संशयास्पद आढळलं तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेता येऊ शकतो. 


Web Title: Breast Cancer : You can Examine your breast at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.