हिरव्या भाज्यांसोबतच पिवळी फळं आणि भाज्या खाल तर औषधं घेणं सोडाल...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2020 03:37 PM2020-03-04T15:37:26+5:302020-03-04T16:05:11+5:30

हिरव्या भाज्याप्रमाणेच पिवळ्या भाज्या शरीराला चांगलं ठेवण्यासाठी फायदेशीर असतात.

Benefits of yellow fruits and vegetables for health myb | हिरव्या भाज्यांसोबतच पिवळी फळं आणि भाज्या खाल तर औषधं घेणं सोडाल...

हिरव्या भाज्यांसोबतच पिवळी फळं आणि भाज्या खाल तर औषधं घेणं सोडाल...

googlenewsNext

फळ आणि भाज्या शरीरासाठी खूप चांगल्या असतात. वेगवेगळ्या आजारांपासून शरीराचं रक्षण  करण्यासाठी जर तुम्ही जंक फुडचा वापर टाळून आहारात भाज्यांचं सेवन केलं तर डॉक्टरकडे जाण्याची गरज सुद्धा भासणार नाही.  हिरव्या भाज्या आरोग्यासाठी चांगल्या असतात. ते तुम्हाला माहितच असेल. तुम्ही अनेकदा ऐकलं असेल की पिवळ्या रंगाच्या भाज्यांचा आहारात समावेश केल्यास त्वचेला आणि आरोग्याला अनेक फायदे होत असतात. त्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढत असते.  चला तर मग जाणून घेऊया कोणत्या फळांचा आहारात समावेश करायला हवा. 

पिवळ्या रंगाच्या फळांच्या सेवनाने आजार दूर होतात. पिवळ्या रंगाची फळ आणि भाज्यांमध्ये बायोफ्लेनॉयड म्हणजेच व्हिटामीन P असतं. त्यामुळे कोलोजनचं शरीरातील प्रमाण व्यवस्थित होत असतं. तसंच  दीर्घकाळ त्वचा तरूण राहते. त्वचेवरील वयवाढीच्या खुणा काढून टाकण्यासाठी पिवळ्या भाज्या फायदेशीर असतात.

पिवळ्या शिमला मिर्चीत व्हिटामीन सी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत असतं. जे त्वचेला चागलं ठेवण्यासाठी आणि  रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर ठरत असतं. याशिवाय  रक्तदाबाच्या समस्या दूर करण्यासाठी तसंच  कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी पिवळ्या भाज्यांचा आणि फळांचा आहार समावेश करणं गरजेचं आहे.

तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर डाएट करण्यासाठी तुम्ही पिवळ्या फळांचा आणि भाज्यांचा आहारात समावेश करून स्वतःला मेंटेन ठेवू शकता.  चला तर मग जाणून घेऊया पिवळ्या भाज्या खाल्ल्याने शरिराला कोणते फायदे होतात. (हे पण वाचा-Cross Leg करून बसणं पडू शकतं महागात, कसं ते वाचाल तर कधीच तसं बसणार नाही!)

केळी- वजन कमी करण्यासाठी केळ्याचा आहारात समावेश केला जातो. पचण्यासाठी सुद्ध केळं चांगलं असतं. केळी सहज उपलब्ध होत असल्यामुळे तुम्ही  कोणत्याही वेळी केळ्यांचा आहारात समावेश करू शकता. 

अननस-  शरीरातील सुज दूर करण्यासाठी तसंच पचनक्रिया सुरळीत होण्यासाठी आहारात अननसाचा समावेश करणं गरजेचं आहे. 

पिवळी शिमला मिर्ची-  पिवळ्या शिमला मिर्चीत फॉलेट्स, आर्यन आणि आयरन असतात. तसंच यात असणारे एन्टीऑक्सीडंट्स शरीरासाठी पोषक असतात.  पिवळ्या भाज्यांमध्ये आणि फळांमध्ये फायबर्स आणि मिनरल्स असतात.  जे शरीराला चांगलं ठेवण्यासाठी फायदेशीर असतात.  ( हे पण वाचा- ब्रा फॅटमुळे जास्त बेढब दिसत असाल तर 'या' उपायांनी चरबी करा कमी...)

Web Title: Benefits of yellow fruits and vegetables for health myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.